- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील बेलापूर येथील फ्रेंडस फाॕर एव्हर ग्रुप व समस्त ग्रामस्थ यांचेवतीने सालाबादप्रमाणे दिवाळीनिमित्त शहिद जवान,भारतीय सैनिक तसेच पोलिसांच्या सन्मानार्थ 'एक पणती जवानांसाठी'उपक्रम संपन्न झाला. बेलापूर-ऐनतपूर येथे गेल्या अकरा वर्षांपासून सदरचा उपक्रम राबविला जातो. सणवार विसरुन देशाचे जवान,पोलिस हे देशवासियांचे संरक्षण करीत असतात.दिवाळीसारखा महत्त्वाचा सण त्यांना त्यांचे कुटुंबासमवेत साजरा करता येत नाही.त्यांच्या या त्यागाच्या स्मरणार्थ पाडव्याच्या दिवशी पणत्या पेटवून जवान व पोलिसांचा सन्मान केला जातो. विजयस्तंभ चौकात फ्रेंडस फाॕर एव्हर ग्रुप तसेच बेलापूर-ऐनतपूर ग्रामस्थांच्या वतीने एक पणती जवानांसाठी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी आजी माजी सैनिक,पोलिस बांधव तसेच ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment