- महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुक समीकरण बदलत आहेत सुरवात झाली असुन आरोप प्रत्यारोप होतील होताहेत पण यात सामान्य जनता कोरोना महामारी काळानंतर समस्यांना समोर जात आहे अशातच मुस्लिम लोकसंख्या व मुस्लिम मतदार यावर महाराष्ट्र राज्यातील निवडणूकीत निकाल ब-यापैकी अवलंबून आहे कारण महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक विभागात बरेचसे पक्षाने एका विरुद्ध एक उमेदवार दिलेले आहेत तेव्हा उमेदवार यांची दमछाक होत आहे मुस्लिम उमेदवारांना इतर समाजाचे मत मिळत नाहीत पण मुस्लिम समाज ज्यांना ठरवतो तो विजयी ठरतो कारण मुस्लिम राजकीय दबाव गट नसल्याने किंवा नेतृत्वाची दशा आणी दिशा पाहता दगड नको विट बरी म्हणून आपल्या भागातील उमेदवार निवडून आला पाहिजे हि निती अवलंबत आहे तसे पाहता
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका आहेत. काळ वेगाने निघून जात आहे. कधी आकाशगंगेवर पाय ठेवून. कधी पर्वत ओलांडत.
कधी ब्रह्मांड ओलांडत. झारखंडमधील परिस्थिती महाराष्ट्राइतकी गुंतागुंतीची नाही. महाराष्ट्रातील अनेक लोकांना लक्षात येत नाहीये की, मतदान कोणाच्या बाजूने करावयाचे कारण कौन गद्दार व कौन खुद्दार हे कळणे कठीण आहे महायुती- महाविकास आघाडी अशी महाराष्ट्र राज्यात लढत होत आहे तिसरी व चौथी आघाडी मतदार वर प्रभाव पाडू शकली नाही अखेर जागा वाटत व बंडोबा ला थंड करण्यातच भाजपा, शिवसेना , राष्ट्रवादी, मनसे, तर कांग्रेस पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अशी लढत होत आहे निवडणूकीच्या निकालानंतर कौन कौना सोबत सत्तेत राहील हे आज तरी सांगणे कठिन आहे कारण राजकारण व सत्ता दोन्ही जमेच्या बाजू असल्याने सत्ताधारी सत्ता टिकवण्यासाठी तर विरोधक सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करताहेत
मतदार को ढूंढते रह जाओगे, अशा शैलीत, कुठे जावे, कोणाला स्वीकारावे, हे उमेदवार यांना आज तरी समजेनासे झाले आहे
अखेर मराठा आरक्षणसाठी मराठा योद्धा जरांगे पाटिल यांनी लोकसभा निवडणुकीत आपली मूक उपस्थिती नोंदवणाऱ्या जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा गनिमी कावा धोरण अवलंबले आहे. मराठा आंदोलनातून उदय झालेल्या जरांगे यांनी याआधी स्वतःचे उमेदवार उभे करून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. मराठा ,मुस्लिम, दलीत ,यांना घेऊन मौलाना सज्जाद नोमानी , आनंदराज आंबेडकर सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगीतले व मौलाना सज्जाद नोमानी , आनंदराज आंबेडकर यांनी यादी न दिल्याने मागे फिरले. आता ते म्हणत आहेत - लढणार नाही, हरवणार आहे. मराठा प्राबल्य असलेल्या जागांवर ते कोणाचे नुकसान करणार आहेत, याचे संकेत स्पष्ट आहेत ! लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट भाजपला धक्का दिला होता. या वेळी त्यांचा धक्का कोणाला असेल आणि किती दमदार असेल, हे सांगता येत नाही. तथापि, तेव्हापासून आतापर्यंत मराठवाड्याच्या गोदावरी व सिंदफनातून बरेच पाणी वाहून गेले भाजपने जरांगेंवरील उपाय शोधला आहे. 'लाडकी बहीण'च्या रूपात.
महाराष्ट्रात लाडकी बहीण, झारखंडमध्ये झामुमोच्या मैयाच्या मुकाबल्यात दीदी. मात्र, अर्ज माघारीची तारीख उलटून गेली असून निवडणूक जिंकवण्यासाठी व हरवण्यासाठी जरांगे व्यतिरिक्त अनेक रिंगणात उतरले आहेत.निवडणुकीच्या भाषेत त्यांना बंडखोर म्हणतात. हे बंडखोर निवडणुका जिंकवतात आणि हरवतातही. ते उभेही राहतात आणि उभे केलेही जातात. मतांचे विभाजन
करणे किंवा ती कापणे हे त्यांचे मुख्य काम असते. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी नेतेमंडळी ओरडत आहेत. बंडखोर शड्डू ठोकत आहेत. जशी लोहाराच्या भट्टीत आग पेटते! जसा कुंभारांचा आवा पेटू लागतो ! घोषणा जोरात गर्जू लागल्या आहेत. ढोल-ताशांच्या तालावर घोषणा दिल्या जात आहेत.
मतदाता संभ्रमात आहे कुठे जावे, कोणाला स्वीकारावे ?
कोणता उमेदवार पक्ष कोणता यावर विश्वास बसेना कारण स्वातंत्र्या नंतर प्रथमच अशा निवडणूका होताहेत राज्यातील जनतेला समजत नाहीये.
कारण बंडोबांचा लढा थांबणार नाही. ज्यांच्या शब्दांच्या खंजिराला धारदार धार असायची ते मतदारांसमोर लोटांगण घालू लागले आहेत. रबराच्या झाडांवर सूळ टांगले आहेत. कोणीही कोणापेक्षा कमी नाही. कोणाला कोणाची भीती नाही.
प्रत्येकाला सत्ता हवी आहे. सर्वांना खुर्ची हवी आहे. ती कोणाला मिळणार आणि कोणाला नाही, हे सामान्य माणसाला ठरवायचे आहे. मतदारांनी ठरवायचे आहे. मात्र, मतदार गप्प आहेत. नेहमीच. स्वतःच्या उशाशी बसून स्वतःला गाढ झोपलेले पाहणे ही त्याची सवय आहे. तो काहीच बोलत नाही. जणू त्याचं तोंड म्हणजे बंद तळघर आहे!
सोनेरी दिवस खुंटीला टांगून हँगरला लटकवलेली रात्र पांघरण्याची त्याला आवड आहे. तो स्वतःच्या हातांनी आपल्या नशिबात अंधार लिहितो. त्याला तोंड उघडू शकतो की नाही, काही बोलू शकतो का, हे निवडणूक निकालाच्या दिवशी कळेल, बोलण्यावरून आठवले निवडणूक निकालापूर्वी सांगितले जाणारे म्हणजे एक्झिट पोल, त्यांच्या विश्वासार्हतेला आग लागली आहे. आता तर सामान्य माणूसही या एक्झिट पोलला कानठळ्या बसवणारा भोंगा मानू लागला आहे. लोकसभा निवडणुकीत ते तोंडावर आपटले होते पण यात मात्र मुस्लिम मतदार यांचा सन्मान तर नाही उलट निवडणूकीत जवळ करायाचे व निवडणूक संपली की बोला कौन असा उलट सवाल करायचा या पलीकडे काहीच नाही कारण मुख्य प्रवाहात येऊच द्यायचे नाही उलट आरोपीच्या पिंज-यात उभे करायचं व मुस्लिमांना व त्यांच्या पाल्यांना नागरी समस्या पासुन अलीप्त ठेवण्याचे पाप राजकीय पक्ष व नेते करताहेत कारण राजकारणात मुस्लिम आपसातील मतभेद हे जगजाहीर करतात कारण आज मुस्लिम शिक्षणासह राजकारणात मागे असल्याने समस्या आहेत जर लोकप्रतिनिधी म्हणून जर मुस्लिम नेतृत्व विधानसभेत प्रश्न मांडले तर त्या ठिकाणी तो समाजावरील
अन्यायाचा आवा़ज बनू शकतो किमान तो शिक्षीत असावा उठोबा ,बसोबा, नसावा असो
आज विधानसभा निवडणूकीत राजकीय पक्षाचे उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले शपथपत्र हि सादर केले शपथपत्रातील संपत्ती मध्ये वाढ झाली घटली नाही मात्र सामान्य मतदार आपली तुटपुंज्य उपजिवीका भागवुन जिवन जगत आहे लोकसभेला मुस्लिम समाजाने भाजप युतीला नाकारल्याने नकारात्मक उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आ. रामदास कदमांनी मुस्लिम समाजाला "लुंगी उठाव पुंगी बजाव" चा नारा देऊन चेतावनी दिली . केद्रं शासनाने वक्फ बोर्डाच्या विरोधात कायदा आणला ,मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विरूद्ध रामगीरी महाराजने केलेली अपमानास्पद टीका ,टिपण्णी त्यावर गुन्हे दाखल होत असताना मुख्यमंत्री शिंदेंनी रामगीरीच्या समर्थनार्थ केलेले विधान, आ.नितेश राणेंनी मज्जिद मध्ये घुसून मारण्याची दिलेली धमकी तसेच केलेली शिवीगाळ व त्यावर गुन्हे दाखल होत असताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली पाठराखण. अद्याप रामगिरी व नितेश राणेंवर कारवाई नाही. बिल्कीस बानु बलात्कार प्रकरणातील आरोपींचा सत्कार. मोबलिंचींग मध्ये मारले गेलेले निरपराध मुस्लिम तरुण. गजापूर गावाचं विशालगडाशी काही संबंध नसताना मुस्लिम मोहल्ल्यातील नागरिकांना महीलांना मारहाण, मशिदीची तोडफोड, मालमत्तेची जाळपोळ. हे सगळं भाजप युतीच्या सरकार मध्ये झाले आहे. विधानसभा निवडणुक तोंडावर येवून ठेपली आहे. आता ही लोकं मुस्लिम समाजाला पैशाचे आमिष दाखवतील. व महिलांसाठी बुरखे वाटलेत व परत वाटतील ही तेव्हा येणा-या परिस्थितिला समोरे जातांना शहराचे नामकरण व होत असलेली अहवेलना व अपमानजनक वक्तव्य होत असलेली दिशा भूल याचा विचार करणे गरजेचे आहे कोणी दगडा पैक्षा विट मऊ हे धोरण स्विकारने गरजेचे आहे एकढे मात्र नक्की राजकारणातुन सत्ता सत्तेतुन संपत्ती हि निर्णायक मुस्लिम मतदार वर वाढत आहे पाहुया येणा-या काळात कळेलच. ...
=================================
-----------------------------------------------
डॉ, सलीम सिकंदर शेख 💐✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर
+९१९२७१६४००१४
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment