- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता `
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी अरुण पाटील नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्ते अविनाश आदिक यांच्या हस्ते तसेच आमदार लहू कानडे व माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत अरुण पाटील नाईक यांना
नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक मुख्तार शहा, कुरेशी समाजाचे नेते मेहबूब कुरेशी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, मल्लू शिंदे, तालुका युवक अध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, महिला तालुकाध्यक्षा मंदाताई गवारे, शहराध्यक्षा माजी नगरसेविका अर्चना पानसरे, युवती जिल्हाध्यक्षा प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण तसेच वळदगांवचे सरपंच अशोक भोसले, मूठेवडगांवचे सरपंच सागर मुठे, अँड. मधुकर भोसले, अँड. जयंत चौधरी, जयकर मगर, दीपक कदम, सागर कुऱ्हाडे, गोपाल वायनदेशकर, गुरुचरणसिंग भाटियानी, योगेश जाधव, विलास ठोंबरे, अनिरुद्ध भिंगारवाला, नयन गांधी, सुमित मुथा, दीपक निंबाळकर, प्रशांत खंडागळे, सोहेल शेख, अक्षय नाईक, सल्लाउद्दीन शेख, निरंजन भोसले, राजू साळवे, विलास ठोंबरे, राहुरी विभागाचे राजेंद्र लोंढे, अनिकेत आसने, श्रीकांत दळे, अविनाश नागरे, सुधाकर बोंबले, राहुल बोंबले आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment