राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, December 15, 2024

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरवला आनंद बाजार


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शारीरिक कलागुणांचा विकास व्हावा यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  
 शालेय विद्यार्थ्यांनी शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी विद्यालयात आनंद बाजार भरवला.
 या आनंद बाजाराचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. मीनाताई जगधने यांच्या शुभहस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी.एन. माळी यांनी केले.आनंद बाजारासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सर्वश्री सुधीर पा.कसार, थोर देणगीदार उद्धवराव पा.पवार यांनी उपस्थित राहून आनंद बाजाराची शोभा वाढवली. उपस्थित मान्यवरांचा गुलाब व स्नेहवस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. 
या आनंद बाजारातून विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत होते पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा प्रयत्न करावे असे आवाहन मा.जगधने ताई यांनी केले. आनंद बाजारात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अतिशय चविष्ट पदार्थ , खेळणी भाजीपाला, शालोपयोगी वस्तू यांची विक्री केली. इतर विद्यार्थ्यांनीही आनंद बाजाराचा मनमुराद आनंद लुटला. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग यांनीही आनंद बाजारात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आणलेला पदार्थ, विक्रीतून झालेली कमाई तसेच स्वच्छता यानुसार प्रथम तीन विजेते काढण्यात आले. त्यांना सुधीर पाटील कसार यांच्याकडून शालोपयोगी वस्तू बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी आर.बी. एन. बी. कॉलेज येथे शरद क्रीडा महोत्सव अंतर्गत झालेल्या कबड्डी स्पर्धेत विद्यालयातील इ. १० वीतील विद्यार्थी हर्षल नगरे याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मा.जगधने ताई व स्कूल कमिटी सदस्य यांनी त्याचे कौतुक केले. या आनंद बाजाराच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कसार, शितल निंभोरे, स्वेजल रसाळ, संतोष नेहुल,उषा नाईक, भास्कर सदगीर, प्रज्ञा कसार ,अविनाश लाटे, दिपाली बच्छाव ,जिजाबाई थोरात ,सुनीता बोरावके, प्रशांत बांडे ,अशोक पवार ,संदीप जाधव व भास्कर शिंगटे यांनी परिश्रम घेतले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई
वडाळा महादेव 


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment