- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदार संघातील बांधकाम कामगारांची नव्याने नाव नोंदणी, नोंदीत कामगारांचे नूतनीकरण, शिष्यवृत्ती, प्रसूती, भांडे संच आदी प्रकरणे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून सदरची प्रकरणे तात्काळ मंजूर करावी, अशी मागणी माजी आ.भानुदास मुरकुटे, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, अहिल्यानगरचे कामगार उप-आयुक्त रेवणनाथ धीसले यांचेकडे श्रीराम संघटीत बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदार संघातील बांधकाम कामगारांचे नूतनीकरण करणे हे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने रेशनकार्ड, शिष्यवृत्ती, महिलांचे प्रसूती अनुदान, भांड्यांचा संच वितरण आदी कामे रखडलेली आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच नवीन नोंदणी बंद असल्याने अनेक कामगार या योजनेपासून वंचित राहत आहे. सदर प्रकरणे तात्काळ चालू करावी, अशी मागणी युवानेते नीरज मुरकुटे, श्रीराम संघटीत बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक गणेश छल्लारे, अध्यक्ष संदीप शेरमाळे, सागर अमोलिक, संदीप कांबळे यांनी केली आहे.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
*समता मिडिया सर्व्हिसेस*
*श्रीरामपूर - 9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment