- अजीजभाई - शेख -/ राहाता -
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. उन्नती संजय वर्पे हिस नेमबाजीतील बहुमानाचा रेनॉल्ड शूटर पुरस्कार प्राप्त झाला आहे. तिची नेमबाजीमध्ये स्कीम इंडियाच्या पात्रता फेरीसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.बी.बी. अंबाडे यांनी दिली.
६७ एनसीसी राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप भोपाळ (मध्य प्रदेश) या ठिकाणी झालेल्या नेमबाजी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन नियमानुसार आय.एस. एस.एफ. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर येथील राष्ट्रीय खेळाडू कु.उन्नती संजय वर्पे या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ६० शॉटमध्ये ६११.६ स्कोर करून रेनॉल्ड शूटर हा बहुमान पटकावला आहे. यामुळे ह्या विद्यार्थिनीची इंडिया नेमबाजी संघाच्या पात्रता फेरीसाठी निवड झाली आहे. तिला प्राचार्य डॉ. अंबाडे, उपप्राचार्य के. टी. अडसूळ, पर्यवेक्षिका एम. एस. जगधने, शुभांगी रत्नपारखी व सर्व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट- श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment