काही विघ्नसंतोषी मंडळींकडून जाणिवपूर्वक समाजा - समाजात हेतू पुरस्कर द्वेष आणि गैरसमज पसरविण्याचे कुटील कारस्थान
याविषयी लेखक, साहित्यिक, कवी, शाहीरांनी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृतीपर लिहिणे गरजेचे - साहित्यिक डॉ.सलीम सिकंदर शेख
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शहरातील मिल्लतनगर येथील हजरत गुलाम रसूल उर्दू शाळेत शहा छप्परबंद एज्युकेशन अँड वेलफेयर सोसायटी व स्पंदन बहुभाषिक त्र्येमासिक यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय संयुक्त मुस्लिम - मराठी साहित्य संमेलन चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध प्रख्यात साहित्यिक डॉक्टर सलीम सिकंदर शेख यांनी आपल्या छोटेखानी संबोधनात म्हटले की,काही विघ्नसंतोषी मंडळींकडून
समाजा - समाजात जे जाणिवपूर्वक गैरसमज आणि द्वेष पसरविले जात आहेत,त्याची खरी सत्यता सर्वांसमोर आणण्याकामी सध्याच्या काळात प्रत्येक लेखक,साहित्यिक, कवी शाहिरांनी सत्य जनजागृतीपर लेखन करण्याची नितांत गरज तथा आवश्यक्ता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सदरील संमेलनाची सुरुवात रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता शाळेतील ३०० मुलांच्या ग्रंथ दिंडी ने झाली, दिंडी आजू- बाजूच्या परिसरात मिरवली जाऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रथमतः ह.गुलाम रसूल उर्दू शाळेच्या मुलांनी नात व स्वागत गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.
स्पंदन बहुभासिक त्र्येमासिकाचे संपादक व कार्यक्रमाचे कार्यवाहक महाराष्ट्रात मुस्लिम समुदायातील गोर - गरीब उपेक्षित- दुर्लक्षित आणी निराधार मुला - मुलींच्या विवाहांचे आयोजक इंतेखाब फराश यांनी संमेलनाध्यक्ष डॉ.सलीम सिकंदर शेख व स्वागताध्यक्ष अल्ताफ शाह यांना पुणेरी पगडी व शाल देऊन केली.
तसेच जिल्हा बैंकेचे संचालक तथा श्रीरामपूर न.पा.चे माजी नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या हस्ते कुंडीतील वृक्ष झाडांना पाणी टाकून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी सचिन गुजर, हाजी मुजफ्फर शेख, हाजी अंजुम शेख, बाबासाहेब दिघे, मुख्तार ताहेर शहा, विद्रोही चे डॉ. जालिंदर घिघे, वैजापूर चे शमीम सौदागर, कुमार भिंगारे, इक्बाल इस्माईल काकर सर, सलीमखान पठाण, नजीर शेख,अकबर शेख, मुख्यध्यापक जाकीर शहा, मुख्यध्यापक सलीम (दारुवाले) बारुदवाले, संगमनेर येथील असिफ शेख, सिराज शेख. स्वागताध्यक्ष अल्ताफ शहा (सचिव - शहा छप्परबंद एज्युकेशन अँड वेलफेयर सोसायटी श्रीरामपूर) यांनी प्रत्येक पाहुण्यांचा परिचय करुन देत स्वागत केले.
स्पंदन बहुभाषिक त्र्येमासिकाचे रौप्यमहोत्सवी
वर्षे अर्थातच २५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल या त्र्येमासिकाचे मान्यवरांच्या व स्पंदन चे उप संपादक दौंड, फातिमा च्या लेकी चे अनिसा सिकंदर यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्काराचे देखील वितरण करण्यात आले ते पुढील प्रमाणे- पनवेल चे प्रसिद्ध साहित्यिक कवी गझलकार प्रोफेसर ऐ. के. शेख सर, फक्र -ए -मिल्लत सांगलीचे अर्शद म. इसहाक खान, व सोलापूरचे प्रोफेसर डॉ. शकील शेख, उद्योग रत्न सोलापूरचे अरमान जहागीरदार व कोल्हापूरचे शफी बाला शेख यांना पुणेरी पगडी, शाल, सम्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते सोलापूरचे प्रिन्सिपॉल डॉ. इ. ज. तांबोळी, औरंगाबादचे डीन,समाजसेवक, कवी, साहित्यिक डॉ.इक्बाल मिंन्नी सर व संगमनेरचे प्रोफेसर डॉ. हेमंत कुरकुटे यांनी अतिशय खास शैलीत व्याख्यान दिले.
सोलापूरचे प्रसिद्ध कॅरियर काउन्सिलर योगीन गुज्जर यांनी संबोधन केले. पनवेल चे कवी,साहित्यिक प्रिन्सिपॉल डॉ.ऐ.के शेख, पुणे प्रवाह,मखदूम अहमदनगर चे सुभाष सोनावणे, ग्रामीण कवी आनंदा साळवे, हास्य कवी रज्जाक शेख सर, दौंड च्या कवियत्री अनिसा सिकंदर, लातूर च्या कवियत्री तहेसीन सय्यद, देहू च्या मेहमूदा शेख, कवियत्री शाहीन पठाण बाजी, नेवासा च्या कवियत्री डॉ. बेनझिर शेख, ज्येष्ठ कवियत्री,प्रोफेसर हेमलता गिते, कवी, ऍडवोकेट अण्णासाहेब मोहन, गोरक्षनाथ पवार,
संगमनेर चे निवृत्ती कानावडे यांनी वृद्धाचा फाटक्या - तुटक्या वेषात येवून श्रोत्यांना वृद्ध बापाच्या हाल अपेष्ठा काय असतात यावर कविता सादर करून श्रोत्यांचे नेत्र आसवांनी भिजवीले ही ऐक रोमांचित अनुभवाची प्रचिती, तर पारनेर चे गीताराम नरवडे यांनी शेतकरी कसा असतो, याविषयी कविता सादर करून शेतकऱ्यांचे जीणे हे कसे असते याचे सादरीकरण सादर करत वाह वाह मिळवीली. तर अनेक कवीं कवियत्रींनी कधी धीर गंभीर तर कधी भावनिक वातावरण निर्माण करून श्रोत्यांना हसवलं तर कधी रडवून कवी संमेलनाला ऐक वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातून असंख्य कवी, कवियत्री, साहित्यिकांनी या संयुक्त मराठी- मुस्लिम साहित्य संमेलनाला आपली हजेरी नोंदवून उपकृत केले.
या कार्यक्रमात पुणे येथील संदेश लायब्ररी च्या माध्यमातून समीर शेख यांच्याद्वारे सायन्स म्यूझियम प्रदर्शन भरवण्यात आले होते, त्यामध्ये प्रेक्षकांना इस्लाम व सायंटिफिक काय याची मेजवानी भेटली.
ह.गुलाम रसूल उर्दू शाळेच्या सर्व स्टाफ, कर्मचारी, विद्यार्थी मुलं, मुलींनी अतिशय विशेष परिश्रम घेतले तसेच विद्रोही साहित्यिक चळवळ श्रीरामपूर, बैतुशशिफा मेडिकल फौंडेशन, फैझान ए जमील फौंडेशन ने मोठ्या मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर चे कवी इंजिनीर ख्वाजाभाई बागवान व लातूरचे कवियत्री तेहसीन सय्यद यांनी केले.
शेवटी इक्बाल इस्माईल काकर (सर) यांच्या जोरदार शेरो - शायरी ने आभार मानत संमेलनाची सांगता करण्यात आली.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment