- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेती- व्यवस्थापन व उत्पादन या विषयाच्या अध्ययन- अध्यापनाच्या दृष्टीने डेंगळे कृषी फार्म हाऊस,खंडाळा येथे नुकतीच क्षेत्रभेट दिली. क्षेत्रभेटी दरम्यान इ.पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांना शालेय ज्ञान, मैदानी खेळ, व्यवहारीक ज्ञान या दैनंदिन घटकांबरोबरच आधुनिक कृषी विषयक ज्ञान होणे तितकेच महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्राशी निगडित तत्सम उद्योग-व्यवसाय तसेच आले,हळद,ऊस, शेवगा, गहू,हरभरा,मका अशी विविध पिके,अवजारे, पाळीव प्राणी पालन व्यवसाय व पिकांवर केलेल्या वैज्ञानिक संशोधनांची माहिती व्हावी,या हेतूने क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान विद्यार्थ्यांनी तालुक्यातील खंडाळा येथील जागृत देवस्थान श्री गणपती मंदिर येथे भेट देऊन वनभोजन केले. तसेच डेंगळे फार्म हाऊसचे सर्वेसर्वा सुजित पाटील डेंगळे यांना कृषी विषयक प्रश्न विचारात सेंद्रिय व आधुनिक शेती विषयक महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत सहशिक्षिका योगिता गवारे, साक्षी भनगे,ज्योती खंडागळे,कोमल पारखे, राजश्री व्हटकर, सोनाली म्हसे,ज्योती गाढे,कावेरी लोखंडे,शंकर बाहुले,मयूर जाधव उपस्थित होते.
प्रसंगी क्षेत्रभेटीस विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके,व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment