राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, March 8, 2025

रमजान मुबारक 2025रोजा नं. 08, रविवार दिनांक 09-03-2025 - विषय :- रोजा :- मधुमेही रोजदारांनी नियोजन करणं गरजेचे आहेत....



रमजान मुबारक 2025
रोजा नं. 08, रविवार दिनांक 09-03-2025
विषय :- रोजा :- मधुमेही रोजदारांनी नियोजन करणं गरजेचे आहेत....

" हें आज्ञाधारक ( श्रद्धांवान )लोकांनो!तुमच्या साठी रोजे (उपवास ) अनिवार्य करण्यात आलेले आहेत जसे, तुमच्या पूर्वजांवर अनिवार्य केले होते, हें यासाठीच कीं, तुम्ही सदाचरणीं बनावेत ( पवित्र कुरआन आद्याय नं 02सुरह बकराह (स्लोक आ. नं :-183).
उपवासाचे (रोजाचे ) काहीच ठराविक (मोजकेच )दिवस आहेत, तरीही आणखीन तुमच्या साठी एक सोपी गोष्ट ही आहेत कीं, तुमच्यापैकी एखादी व्यक्ती आजारी आहेत तर तिला उपवास करणं कठीण असेल, हानिकारक असेल, किंवा प्रवासात असेल, तर इतर दिवशी ( राहून गेलेले )रोजा करून उपवासा ( रोजा ) ची संख्या पूर्ण करावी, आणि ज्या लोकांना उपवास करतांना अतिशय कठीण प्रवास करावे लागते असतील तर त्यांच्या साठीदुसरी सोपी गोस्ट ही आहेत कीं, ज्यांची कुवत ( एपत ) आहेत त्यांनी एका गरीबाला जेवण द्यावे, आणि एखाद्यानें यापेक्षा जास्त पुण्य कमावले तर त्याच्या साठी ही चांगलीच गोस्ट असेल, तरीही उपवास करणे तुमच्यासाठी चांगलेच आहेत, जर तुम्हाला उपवास केल्याणे फायद्याचे ज्ञान असेल. (" पवित्र कुर आन आद्यय नं. 02 सुरह बकराह आ. नं. 184).
या आयतीत आजारी व प्रवासात असणाऱ्या लोकांना अल्लाह णे सवलत दिलेली आहेत ती पण फारच आजारी किंवा कठीण प्रवासात.
सध्या मार्च महिना चालू आहेत, वातावरना मध्ये कधी एक्दम उष्णता तर थोडं थंड तर कधी वेगवेगळ्या हवामान चालू आहेत, वातावरणाच्या या बदला मुळे लोकांना सर्दी खोकला, घसा तडतड करतोय तर कधी भरपूर खोकला येतोय. काहींना चक्कर येत आहेत तर काहीच होतं नाहीं. वातावरणातील काही दिवस असेच चालू राहणारे आहेत दहा पंधरा दिवसांनतर लोकांना वातावरणाची सवय होईल तर रोजची ही सवय होईल,
परंतु काही लोकांना काहीतरी बहाणा लागतो म्हणून सूल्लक कारणाने पवित्र रोजे सोडतात त्यांच्या साठी 
हजरत अबू हुरेरा रजि. सांगतात कीं, आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व. नी सांगितलं कीं, ज्या व्यक्तीनें जाणूनबुजून रमजान मुबारक मधील रोजे सोडले त्यानं नंन्तर कितीही रोजे ठेवलं तरी त्या रमजान मधील एका रोजाची किंमत जन्मभर कधीच चुकवू शकणार नाहीत ( तिर्मिझी शरीफ ).
मार्च च्या विविध ढंगी वातावरणामुळे बरेच रोजदार आजारी पडू राहिले आहेत, त्यामध्येच जे विविध प्रकारच्या आजाराने त्रस्त आहेत उदाहरण म्हणून आम्ही मधुमेही, हृदय विकार, थयोरॉईड, संधिवात किडनी आजार व त्याबरोबर होणारे इतर आजार. व वयोरुद्ध व्यक्ती, वरील सर्व आजार हें बाराही महिने औषधं द्यावे लागतातच. अशा रोजदारांनी आपल्या रोजा व दैनंदिन औषधं यांच्या नियोजन करण्याची गरजेचं आहेत. काही काही आजार हें काही वेळा सिरीयस आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्या वरच लक्षात येते. म्हणून वयोंदृद्ध लोकांनी वेळोवेळी आपल्या फॅमिली डॉक्टर कडून तपासनी करणं गरजेचे आहेत.
जागतिक आरोग्य संघटना च्या 2003च्या सर्वे नुसार, जगातील एकूण, 19 कोटी मधुमेह रुग्णा पैकी एकट्या भारतात 5 पांच कोटी फक्त्त भारतातच आहेत.. भारत देश हा मधुमेही ची राजधानी झाली आहेत. पूर्वी भारत देश हा साथीच्या आजाराचे माहेरघर समजलं जायचं परुंतु सध्या प्रत्येक घरोघरी म्हणा किंवा प्रत्येक एक घरा आड एक मधुमेह रुग्ण आढळत आहेत.. अगदी लहानलहान मुलांना सुद्धा मधुमेह, हृदय विकार, ब्लड प्रेशर, असे विविध आजार बघवयास मिळत आहेत. परंतु यातील खूप आजार हें नियंत्रणात आणता येतात त्यासाठी नियोजन करणं गरजेचे आहेत, 
या मधुमेही रुग्णांनी रोजा ठेवताना पहिल्या प्रथम आपल्या सर्व रिपोर्ट केली पाहिजे उदाहरणं,:- मधुमेहीचे रक्तातील साखरेचं प्रमाण तपासणं गरजेचे आहेत उपाशी पोटी ( Fasting p- 60 ते 90/100 असणं व post prandl( खाल्यावर दोन तासाने 90-ते 140/160 मिलिग्राम, असणं गरजेचे आहेत, कधीकधी HbA1c ही टेस्ट करणं ही गरजेचे आहेत, मधुमेही चे रोजा मध्ये कधी कधी रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं, कधीकधी शरीररातील साखरे व्यवस्था कोलंडून पडते व त्या बरोबरच बहुतेक मधुमेहीना Blood presser ही असतो किंवा थयोरॉईड thyoroid, ही असतात म्हणून अशा रुग्णांनी सेहरी करतांना सर्व अन्न घटक मर्यादित व योग्य प्रमाणात घेणं उचित असेल, त्या बरोबर च आपल्या दैनंदिन रोजच्या औषधं घेणं गरजेचे आहेत परुंतु रोजा ठवायचा असेल तर आपल्या डोस ( मात्रा ) dos चे प्रमाण थोडं कमी करावे, आपल्या Injection इन्सुलिन घेणाऱ्यानं आपल्या कायमच्या डॉक्टर कडून dos ची व्यवस्थित adjustment करूनच injection घावी आपल्या स्वतः च्या मनाने कृपया dos adjust करू नयेत. माझ्या मते मधुमेही रुग्णांनी आपल्या dos चे प्रमाण थोडेच ठेवावे कारण संपूर्ण महिना भर रोजे ठेवायचं आहेत.
शक्यतो आपल्या प्रकृती नुसार आपल्या रोज्यांच नियोजन करणं गरजेचे आहेत.. मी म्हणतो भिऊ नका... नियोजन करा.
इस्लाम मध्ये कोणत्याही प्रकारची सक्ती नाहीं अल्लाह नें यासाठीच काही पर्याय देखील सुचवलेले आहेत.त्या पर्यायचा ही लाभ घ्यायला हवा.
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह सांगतात कीं, तुमच्या पैकी एखादी व्यक्ती आजारी असतील, तर त्यांना उपवास करणं कठीण असेल, तर, अशा लोकांनी इतर दिवशी उपवास करून आणि उपवासाची संख्या पूर्ण करावी, तरीही तुमच्या साठी उपवास करणं तुमच्या साठी अधिक चांगलेच आहेत, जर तुम्हाला उपवासाचे होणारे फायद्याचे ज्ञान ( माहिती ) असेल तर. ( अद्याय नंबर 02, आयात नं. 184)..
उपवासाच्या काय काय फायदे आहेत हें जाणून आपल्याला जे योग्य नियोजन करून रोजा ठेवता आले तर तसं नियोजन करा.
अल्लाह सर्व काही बघतच असतो.. शेवटी तोच दयाळू कृपाळू व क्षमा माफी करणारा आहेत...
(मित्रांनो लेख आवडल्यास जरूर आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवा याचा फायदा सर्वाना जरूर होणार आहेत..)

=================================
-----------------------------------------------
लेखक डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
###9271640014
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment