रमजान मुबारक 2025,
रोजा नं. 13 वा, शुक्रवार दिनांक 14-03-2025,
" रोजा :- इस्लाम :-हलाल - हराम -झटका -शास्त्र..
!! " हलाल पद्धतीने खाणे शरीरासाठी सर्वोत्तम च,"!"
(1),हें श्रद्धांवांतांनो! आम्ही तुमच्यासाठी ज्या पवित्र वस्तूंचे तुम्हाला पुरवठा -(बहाल )केलेल्या आहेत, त्याचे सेवन ( खावे ) करावे, आणि अल्लाह ( ईश्वर ) चे आभार माना. ( पवित्र कुरआन पारा नं. 01, सुरह नं. 2, अल - बकराह, आ. नं. 172 वी )
(2), आणि, अल्लाह ज्या आरोग्यदायी चांगल्या वास्तू दिलेल्या(काही वैध व विशुदध अन्न अल्लाह नें दिलेले )आहेत ते सर्व खा, आणि अल्लाह चे भय बाळगा, ज्याच्यावर तुम्हीं विश्वास ठेवता.( सुरह अल- माईदा आ. नं. 88 वी ).
पुन्हा अल्लाह म्हणतात कीं," हें पैगंबरांनो! स्वच्छ व शुद्ध ( आरोग्यदायी ) वास्तूपैकी खा, आणि चांगले कामे करा, आणि हें लक्षात असू दया कीं तुम्ही जे काही करता त्याची मला पूर्ण जाणीव आहेत..". पवित्र कुरआन सुरह नं 23 अल - मोमीनन आ. नं. 51वी ).
इस्लाम मध्ये प्रत्येक घटनेला फार काळजीपुर्वक घेतलं व केलं जातं, मग ती खाणे पिन का असेना, त्यात" हलाल "व "हराम "या गोष्टीला फार महत्व, हलाल म्हणजे कष्ट, घाम गाळून, प्रामाणिक पने केलेल्या व्यवहार, व्यवसाय करून आणलेल्या कमाईतुन खाणे, व्यवसाय केला तर सत्य बोलून, आपल्या कोणत्याही गिर्हाईक बरोबर फसवा फस्वी न करता, खरं खरं बोलून, तराजू व्यवस्थित तोलून मापून मिळवलेल्या पैसा तुन आणलेलं अन्न म्हणजे हलाल कमायी..
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं, जो व्यवसायिक जी तुमच्या दुकानात वास्तू खराब भेसळ युक्त असेल तर ती त्या गिर्हाईकला सांगून तशीच विका परुंतु तुम्हीं ती वास्तू चांगलीच सांगून गिर्हाईकला फसवलं तर तुम्हीं अल्लाह च्या निराशेच्या गरतेत सापडला म्हणून समजा, त्यावर फारिश्तेय त्या व्यक्तीचा धिक्कार करतील ( हदिस इब्न माझा 2247).
पवित्र कुरआन नुसार समुद्रात अठरा( 18000) हजार पेक्षा ही जास्त जीव राहतात, समुद्रातील जलचर प्राणी उदा. बेडूक, कासव, खेकडे, मगर खाण्यासाठी इस्लाम मनायी( हराम,)निशिद्ध केलेली आहेत.
त्या व्यतिरिक्त मासे व इतर सर्व समुद्री पदार्थ खाण्यासाठी अनुमती दिली आहेत.तसेच ज्या ज्या प्राण्याच्या, पाक्षिणा लांब अंकुचिदार नखें आहेत अशा प्राण्याचे मास खाण्यासाठी मनायी केलेली आहेत . उदा. वाघ, सिंह, कुत्रा, मांजर इत्यादी, व चिल, घार इत्यादी, परुंतु का??.याचं शास्त्रीय कारण...???.
पवित्र कुरआन म्हणते कीं, " निसंशय अल्लाहकडून तुमच्या वर जर कोणता प्रतिबंध असेल तर, तो म्हणजेच, तुम्हीं मृत प्राण्यांचे मास- रक्त, डुकराचं मास आणि त्या गोष्टी ही ज्यावर अल्लाह व्यतिरिक्त अन्य कुणाचं नांव घेतलेलं असेल त्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी वर्ज्य ( मनाई - मना - हराम ) आहेत. ( सुरह 02, अल - बकराह ).
इस्लाम मध्ये काय खावं व काय खाऊ नयेत म्हणून पवित्र कुरआन मध्ये वारंवार आदेश आलेले आहेत.. इस्लाम मध्ये कोणत्याही गोष्टी कार्य करतांना काही मार्गदर्शन मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्या शास्र शुद्ध अशाच आहेत.. बघू.
स्वच्छता फार म्हहत्वाची असते म्हणून स्वच्छ पाण्याने (वजु ) हातपाय घेऊन ज्या पशु वा प्राण्याची कुर्बानी ( कापणार ) आहेत त्या अगोदर संबंधीत प्राणी व पशुला व्यवस्थित पोटभर खाऊपिऊ घालून त्याला शांत व समाधानी करून नंतरच त्याला कापण्यासाठी आडवं पाडलं जावून, सुऱ्याला व्यवस्थित धार करून घेणं गरजेचे असतं कारण त्या प्राण्याला कापताना जास्त त्रास झाला नाहीं पाहिजे, त्या प्राण्यांसमोर सुरा न आणता
एक फार महत्वाची गोस्ट म्हणजेच 👍त्याला तीन विभागात कापणे गरजेचे असतं 👌अल्लाह चं नामस्मरण करून पहिल्या प्रथम मानेच्या शिरा नंतर श्वास नलिका, व तिसऱ्या हिस्सात बाकीचे सर्व मान कापणे यालाच ' हलाल " कापणे संबोध तात.
इस्लाम मध्ये हाल हाल करून मारणं हें क्रूर-निर्दयी समजलं जातं व निषधं समजलं जातं. अर्थातच प्राणी हें मनुष्यासाठी च खाद्य आहेत परुंतु कापताना सन्मान पुर्वक व जास्त निर्दयी न होता हळू हळू कापणे आणि याच सर्व प्रक्रियेला हलाल म्हटले जाते.अगर असं नाहीं कापले तर शेवटी अल्लाहला जाब दयावा लागणार आहेत..
याच हलाल प्रक्रियेत तीन विभागात हळू हळू कापल्या मुळे प्राणी व पशु ची हृदय जवळ जवळ दीड (1-2/2) ते अडीच 2-1/2) मिनिटं हृदयाची पंपिंग सिस्टिम चालू असते व ती पंपिंग सिस्टिम चालू राहिल्यामुळे रक्ताभिसरण सिस्टिम चालू असल्यामुळे शरीरातील रक्त शरीरात व शिरामध्ये सकाळळे ( clot घट्ट - thrombing ) न राहता संपूर्ण पने बाहेर फेकलं जाते. व काही वेळाने शरीरामध्ये विविध अपायकारक अर्थात शरीराला घातक जिवाणू, ( bacteria ) व विषाणू ( virus)चे आक्रमन होते व ते खाण्यासाठी अयोग्य असतं... काही आजार जडण्याची शक्यता असते..हेच शास्त्रीय कारण...
याच्या उलट झटका मटण पद्धती असते.. कापणारे स्वच्छ न राहता जाणवरला घेऊन एका झटक्यात त्या प्राण्याची मान कापली जाते.. यामुळे तो प्राणी एकदम कार्डीयाक अरेरेस्ट म्हणजेच हृदय विकार होउन collapse होतो व मरून जातो हृदयाची रक्ताभिसरण सिस्टिम पूर्ण बंद होतं त्यामुळे शरीरातील रक्त बाहेर न येता शरीरातच गोठलेलं असतं म्हणून त्यावर अपायकारक जीवानु ( bactetia ) विषाणू (virus ) अतिक्रमण करतात व आतच असतात त्यामुळे काही आजार होण्याची शक्यता असते..
झटका पद्धतीने कापणे म्हणजे फार निर्दयी, क्रूर पद्धत इस्लाम मध्ये मानतात, ही पद्धत इस्लाम मध्ये निशिद्ध हराम म्हणून मानली जाते. झटका पद्धतीने कापून खाणे हें शारीरिक दृष्टीने अपाय कारक समजलं जाते, एखाद्या रोगाला आमंत्रण दिल्या सारखं होतं म्हणून इस्लाम नें मान्यता दिली नाहीं.
तसेंच, तिक्षण नखें असणारे प्राणी व पक्षी, उदा. द्यायाचं झालं तर वाघ, सिंह, बिबटया, चित्ता, कुत्रा किंवा हिंसर, हिंसक प्राणी पशु, गिधाड, चिल, इत्यादी, कारण कीं हें सर्व प्राणी जंगलात राहतात भांडखोर वृत्ती चे सतत भांडण करतात म्हणून कायम जखमी अवस्थेत असतात त्यांच्या दातांना व नखानांना कायम काहीतरी चिकटलेलं असतं त्यामध्ये घातक जिवाणू व विषाणू असतात म्हणून ते मानवासाठी जास्त घातक असतात व काही गंभीर स्वरूपाचे आजार उदा. धनुर्वात, रब्बीज Tetanus, Rabbies, इत्यादी आजार होण्याची शक्यता असतं.
तसेच डुक्कर खाणे, पाळणे ही इस्लाम नें निशिद्ध मनाई केली आहेत कारण डुक्कर किंवा तत्सम प्राणी हें खूप केसाळ असतात व त्यांची मानसिकता हें घाणेरड्या, गच्याळ, दूषित पाण्यात बसने व त्यातील खाण्याची असते, म्हणून त्यामध्ये असंख्य प्रकारचे जीव जंतू असतात त्यामुळे काही भयानक आजार होण्याची शक्यता असतं म्हणून इस्लाम नें या सर्व अपाय कारक गोष्टी णा खाणे पाळणे हराम केलं आहेत.
सृष्ठीच्या निर्माण करत्याने नैसर्गिक रित्या ज्यांच पालनपोषण होते त्यांची पैदास ही जास्त प्रमाणात होतं असते म्हणून असेच पदार्थ खाण्यास परवानगी दिली आहेत...
(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.)
=================================
-----------------------------------------------
लेखक डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल 🌹मिल्लतनगर.✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर
मोबाईल :- 9271640014.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment