राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, March 16, 2025

रमजान मुबारक 2025,रोजा नं. 16 वा , सोमवार दिनांक, 17-03-2025

रमजान मुबारक 2025,
रोजा नं. 16 वा , सोमवार दिनांक, 17-03-2025
रोजा :!! फुकटात असंख्य आरोग्यदायी फायदे उचला!!"

आज रमजान मुबारक अनिवार्य चा 15 वा रोजा. उन्हाळा चालू होण्याच्या काहीच दिवस अगोदर व आज तर उन्हामध्ये रोजे शारीरिक व मानसिक दृष्टीने खडतर परीक्षा घेत 15 पूर्णतवास जात आहेत , कुठेतरी माध्यन्य झाले म्हणून हायसे वाटत असणार, काही बांधूनी विचार केला असेल कीं आपण विविध आजारांनी अगदी पोकळ होऊन गेलेलो आहेत आपल्याच्यान होनार का नाहीं? लोकांचं विविध प्रश्न - समस्या पण शेवटी तर अनिवार्य!! करणे ही करणं आहेत. काहीं काही बांधूनी चंद्र कोर बघून च स्वतः बरोबर मित्रांचे, बायकोच weight वजन बघतील असतील - काहींनी आपली शारीरिक चाचणी, शुगर रेकॉर्ड, ब्लड प्रेशर तपासून, थायरॉईड रिपोर्ट, केले असतील, आज बाजारात वजन कमी करण्यासाठी विविध नाना प्रकारच्या जाहिराती, विविध मल्टिनेशन कंपनीचे वजन weight reducing कमी करण्याचं आमिष दाखवणारे व 100%गॅरंटीड प्रॉडक्ट, सांगतांना हमखास वजन कमी करण्याची हमी. हो हमी नंतर त्यातूनच आपलं व्यवहार इस्पित सध्य करणारे हुशार बुद्धी मान व्यवसायिक व तीन मेंबर्स च्या चैन सिस्टिम च्या अनेक स्किम्स... यातून काय साध्य होतं.. माझ्या सह अनेकानेक लोकांना पडलेलं एक कोडं.. हो कोडं च..
परंतु उत्तम उत्तर तर, रमजान महिनातील रोजे अगदी प्रामाणिक पने केलं तर, ज्यांना ज्यांना वजन कमी करण्याची ओढ लागलेली आहेत किंवा healthy हेल्दी conscious लोकं, किंवा गले लठ्ठ माणसांनी पंधराह दिवसात थोडया फार फरकाने कमीत कमी 3 किलो वजन कमी झालं असेलच, फार चांगलीच बाब म्हणावी लागेल. 
 दिवसभर शारीराला पुरेल व उत्साह वाटेल इतकं संतुलित आहार घेणं गरजेचं असतं. आजचा जमाना फास्टफूड चा, इन्स्टंट सह चविष्ट खाण्याचा, परुंतु त्याचं नुकसान तर कायिक पटीनें, त्यामध्ये फॅट्स, चरबी अति प्रमाण, स्वादिष्ट मिठाचं जास्त प्रमाण, त्यात पुन्हा शिजवण्याची पद्धती वेगळ्याच,त्यामध्ये सिनथेंटीक केमिकॅल चे प्रमाण ही जास्त, काही म्हणतात कीं चवी साठी घातलेल डुकराच्या चरबी व हाडानी बनवलेले अगदी आरोग्यासाठी घातक अझीनो मोटो, म्हणून त्याचा परिणाम अर्थात आपल्याच शरीरावर हृदय रोग, मधुमेह (डायबेटिस,) पुन्हा वजन वाढत, वजन वाढल्या मुळे गुढग्यावर दवाब येऊन संधिवातचा त्रास, कमरेचा त्रास व मनके, हाडंचा त्रास, वजन वाढलं मुळे पुन्हा मधुमेह आलाच ब्लड प्रेशर आलं,अशा बऱ्याच आजरांना स्वतः हुन आमंत्रण निमंत्रण देण्याच.
सध्याच्या काळातीलइंटरनेट जमाना, I आय T टी सेक्टर मधील करियर करणाऱ्या IT इंजिनीरचं राहणीमान हें 14 तास कॉम्प्युटर समोर सतत काम चालू असतं -सतत मिटींगा सतत, कोणी बॉस तुकडून वारंवार मीटिंग साठी कॉल करतोय, काहीतरी नवीनच खूळपत काढून काहींना काही प्रॉब्लेमस उकरून काढतोय, असे अनेक प्रॉबलेम, काही जण work from Home घरात राहून काम करतात,घरामध्ये काम करणाऱ्या IT इंजिनीर घरी असून देखील पारखे असतात, आपल्या घरातील एका बंदिस्त खोलीत आडवं -तिडवं -खुर्चीवर काम करतात,त्यांना सतत काहींना काही इन्स्टंट चटपटीत खायची सवय असते, ती त्यांची गरज ही असतं नाईलाज असतो म्हणून ते जरा जास्तच फास्टफूड खातात..त्यामुळे बहुतेक IT इंजिनीर हें आपल्या कामाच्या व्यस्तते मुळे जास्तच लठ्ठ झालेले असतात कारण फास्टफूड व शारीरिक हालचाल ही होतं च नाहीं. म्हणून त्यांचा पोटाचे घेर जास्तच वाढलेला असतोस, विविध आजार होण्याचे प्रमाण जास्तअसतात.
अशा काम करणाऱ्या मित्र बांधूनी कायमच आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी आरोग्य दायी ठेवणं गरजेचं असतं. 
रोजीदरांनी फास्टफूड खाण्याचे प्रमाण कमीत कमीच ठेवलं तर उत्तम आरोग्य राहील, उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक अन्न जस फळ,टरबूज, काकडी, खरबूज, केळी, पेरू पपई, द्राक्षे, नारळ पाणी लिंबू पाणी सरबत, कड धन्य, शिजवलेलं पदार्थ, कमी मिठाचं प्रमाण अर्थात तुम्हाला उत्साही वाटेल असा संतुलित, पोषक तत्वाणी युक्त आहार जे नं करून दिवस भर तुम्हाला दिवस भर उत्साही व थकवा जाणवणार नाहीं व पच न संस्था चांगलीच राहिली पाहिजेत नाहीतर पोट दुःखी, ऍसिडिटी, दिवस भर ढेकर देत बसतात काही काही, तुमच्या किडनी वर, पोटावर, हृदयावर जादा लोड येणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचे आहेत. व तळलेलं पदार्थ जास्त प्रमाणात कधीच घेऊ नयेत..Healthy फूड चा वापर जास्त करून आपलं आरोग्य व आपलं वजन कमीत कमी करण्याचं ध्येय ही पूर्ण करण्यासाठी एवढ्या आटापिटा करण्याची गरजच आहेत.
सतत एक महिना नियमितपने 13-14 तास उपाशी राहिल्या मुळे नैसर्गिक रित्या वजन कमी होते हें अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटी च्या संशोधकानी केलेल्या "रोज़े व त्या रोजेचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम "यावर संशोधनावर शोधून काढलं आहेत.. बऱ्याच काळ किंवा सतत उपाशीपोटी राहिल्यानें किंवा कमी खाल्याने शरीरातील पेशीवर तान येऊन त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
आपल्या दैनंदिन कामाच्या व्यस्तते मुळे आपण कायम अपयकारक पद्धतीने तयार केलेले अन्न खातोय, काहीतरी खुरमुरीत -चटपटीट -सटरबटर - जंक फूड खायची सवय लागलेली असते समजत असतं पण उमजत नाहीं हाच प्रकार सर्वत्र बघवयास मिळतो फक्त्त आत्ताची भूक कशी घालवायची एवढंच डोक्यात असतं, म्हणून कसलेही पदार्थ खाऊन स्वतःच स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून विविध आजार लावून घेत असतो. येवढया सगळ्या गोष्टीचा दुष्परिणाम म्हणजे पचन संस्था बघडलेली असते वारंवार बिघलेली असते म्हणून, bad cholesterol चे प्रमाण ही वाढल्या मुळे हृदय रोग वाचण्याची शक्यता वाढलेली असते..
हें सर्व व्यवस्थित करण्यासाठी वर्षातील एक महिना रमजान चे रोजे ठेवून bad cholesterol चे प्रमाण कमी होऊन हृदयाची क्षमता वाढून स्ट्रोक्र, कार्डीयस्क diases कमी होतात, व पचन संस्था ( digestive system ) व्यवस्थित होण्यास मदत होते, बहुतेक संशोधकानी विविध प्रयोग करून बघितलं तर त्यांच्या लक्षात आले कीं, 12-14 तासाचे काही देशात 16-18 तासाचे रोजे आहेत म्हणून सतत रोजे ठेवल्यास पचन संस्थेला काही प्रमाणात अराम भेटून Adiponectin Hormone चे प्रमाण जास्त होते, आणि हेच Hormones अन्नातील पौष्टिक घटक पाचवीण्यास मदत करते.
सध्याच्या काळातील एक नवीनच संशोधन जपान च्या शरीर शास्त्र चे संशोधक योशिनोरो ओसुनी "AUTO FEGO" चा सिद्धांत मांडला, " ऑटो फॅगो "हा ग्रीक शब्द म्हणजेच "स्वतः ला खाऊन टाकणं " सतत उपाशी पोटी राहिल्याने शरीरातील नॉर्मल पेशी ह्या शरीरातील अतिरिक्त वाढलेल्या चरबी ( fats )ना खाऊन टाकून नष्ट करतात, यालाच ऑटो फेगो म्हणतात. आपल्या शरीरातील घातक अपाय कारक पेशी cell ज्यामध्ये कॅन्सर सारख्या कदाचित असू शकतात तर अशा पेशी ही नष्ट होतात. ही प्रक्रिया रामजानुल मुबारक रोज्या मध्ये घडून येत असते. संशोधन तर आजच्या युगात झालं परुंतु याचे फायदे अल्लाह व प्रेषित मुहम्मद स्व. यांनी 1450 वर्षांपूर्वीच सांगितलं होतं, असो.
एवढ्या मोठया मानवी कल्याण कारी संशोधन करणाऱ्या जपान च्या योशिनोरी ओसुनी यांना 2016 मध्ये नोबेल पारितोषिक देवून गौरव करण्यात आलं.
म्हणून श्रद्धावंतानी आपल्या कामाचं योग्य नियोजन करून सतत रोजे ठेवून आपलं इस्पित वजन व आरोग्याचे फायदे उचला.. आज महिना भर तर करणारच आहोत परंतु हेच नियोजन कदाचित वर्षे भर आठवड्यात फक्त्त एकच किंवा आपल्या कुवतीप्रमाणे रोजे उपवास ठेवून, व्यवस्थित नियोजन करून आपल्या वजन कमी करून पुन्हा वाढणार नाहीत याची वर्षभर काळजी घेतली तर वजना बरोबर असंख्य आरोग्यदायी फायदे होतील .
    दहा पाच वर्षा पासून राज्यात काही लोकांचे diet plan डाएट प्लॅन चालू आहेत, कोणी म्हणतं दोन वेळा जेवा, तर कोणी म्हणतं दिवसात दोन दोन तासाला थोडं थोडं जेवा, कोणाचं डाएट प्लॅन फोल्लोवेर्स करायचं, त्याला राग्गड पैसे लागतात तरी गॅरंटी तर नाहीच, देव भरोसे, परुंतु आत्ता सध्या फुकटात चालू असलेल्या नैसर्गिक अल्लाह च डाएट प्लॅन कधी ही सर्वोत्तम च राहील. अल्लाच्या फुकटात मिळालेल्या संधीचा फायदा उचलून असंख्य आरोग्यदायी लाभ मिळवा ऑफर चालू आहेत..
(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा, ते ही फायदा उचलतील, कृपया प्रतिक्रिया अवश्य कळवा )

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(<^>)(<^>(<π>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)
लेखक डॉक्टर,:- सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लत नगर.
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
9271640014
👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍.
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)

No comments:

Post a Comment