जिल्हा पर्यटन विकास आराखड्यात समावेश करण्याची इतिहास प्रेमी मंडळाची मागणी
- अ,नगर - प्रतिनिधी - / प्रतिनिधी - वार्ता -
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला अहमदनगरच्या जनतेने मोठे सहकार्य केले होते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून येथील जनता त्यांच्यासोबत होती. डॉ. बाबासाहेब अनेकदा अहमदनगर परिसरात आले होते. त्यांनी प्रत्यक्ष भेटून येथील जनतेला न्याय दिला. त्यांनी आपला थॉटस ऑन पाकिस्तान हा ग्रंथ सावेडी- भिस्तबाग परिसरातील पटवर्धन बंगला येथे लिहला होता. माळीवाडा महालक्ष्मी मंदिर येथे त्यांनी व्यापक बैठक घेतली होती. त्यांनी येथील आयुर्वेदिक डॉक्टर गुणे यांच्याकडून मधुमेहावर औषध घेतले होते. आजच्या सिध्दार्थनगर येथील सोमवंशी बोर्डींग येथे भेट देवून कामकाजाची माहिती घेतली तसेच येथील शेरेबुकात नोंद केली होती. या व अशा अनेक आठवणी जुनी जाणती मंडळी सांगत असतात. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी या सर्व ठिकाणांचे स्मृतीफलक येथे लावून त्यांच्या स्मृती जतन कराव्यात तसेच जिल्हा पर्यटन विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणी अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाच्या संध्या मेढे यांनी केली.
अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करताना त्या बोलत होत्या. यावेळी इंजि.अभिजीत एकनाथ वाघ, ॲड.संतोष गायकवाड, आबीद दुल्हेखान, पंकज गुंदेचा, भैरवनाथ वाकळे, ऍड. विद्या जाधव आदी उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment