शैक्षणिक गुणवत्ता ही सात्त्विक ज्ञान व संस्कारात दिसली पाहिजे - प्राचार्य टी. ई.शेळके
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शैक्षणिक गुणवत्ता ही आपल्या वागण्या - बोलण्यात, सात्त्विक ज्ञान आणि संस्कारात सदैव दिसली पाहिजे अशी अपेक्षा वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केली.
येथील बोरावके नगरमधील कु.भक्ती भागवत शिंदे हिने रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी परीक्षेत १०० पैकी ९२ गुण संपादन करून संस्थेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिचा वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी प्राचार्य शेळके बोलत होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कु. भक्ती भागवत शिंदे हिचे कौतुक करून प्रास्ताविक केले. यावेळी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ, प्रा.डॉ. भागवत शिंदे, सौ. अश्विनीताई शिंदे यांनी कु. भक्तीच्या गुणवत्तेचे विशेष सांगून तिच्यामुळे रयतच्या अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे सांगून तिच्या कौटुंबिक आणि शैक्षणिक संस्काराचे आदर्श सांगितले.
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
सौ.अश्विनी शिंदे यांचा सत्कार
यावेळी डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले,आई म्हणजे घराचा पाया असतो. तो भक्कम आणि संस्कारी असेल तरच संसाराची प्रतिष्ठ वाढते आणि घराचे मंदिर होते, हाच ऋणात्मक भाव मातृदिनाप्रसंगाच्या मुळाशी आहे, ससे सांगून एक आदर्श माता म्हणून सौ. अश्विनी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
<^>
कु.भक्तीसारख्या विद्यार्थिनीमुळे रयत चे संस्कार केंद्र अधिक प्रतिष्ठित - प्राचार्य शेळके
याप्रसंगी प्राचार्य टी.ई.शेळके म्हणाले, आपली ओळख आपले कुटुंब, शाळा, संस्था यांच्यामुळे अधिक होते. प्रा.डॉ. भागवत शिंदे परिवार हा मराठवाड्यातील आहे. रयत शिक्षण संस्थेत त्यांनी आपल्या गुणवत्तेने चांगल्या वागण्यातून प्रतिष्ठा निर्माण केली. श्रीरामपूर मधील रयतचे संस्कारकेंद्र हे कु.भक्तीसारख्या विद्यार्थिनीमुळे अधिक प्रतिष्ठित होते, तिचे आई, वडील यांचे चांगले मार्गदर्शन तिला लाभले, आजच्या काळात मुली उत्कृष्ट गुणवत्ता मिळवितात हा आनंद असल्याचे सांगून त्यांनी स्वानुभाव सांगितले
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
माता- पिता आणी गुरुजनांमुळे यश प्राप्ती कु.भक्ती भागवत शिंदे
कु.भक्ती भागवत शिंदे म्हणाली, रयतचे संस्कारकेंद्र खूपच छान आहे, पहिली ते पाचवीपर्यंत मला शिक्षिका अनिता चेडे मॅडम यांनी खूपच परिश्रम घेत शिक्षणाची गोडी लावली. शिस्त आणि ज्ञानशीलता यामुळे मला शाळा प्रिय वाटली. आई, वडील मनापासून अभ्यास घेतात. आईचे संस्कार मला सर्वांगीणदृष्टया सक्षम करणारे आहे वाटतात. मी जशी अभ्यासात हुशार आहे,तशीच घरकामात तरबेज होणार आहे, हे सर्व आईचे देणे असल्याचे सांगून वडिलांचे मार्गदर्शन दिशादर्शक ठरल्याचे सांगून, माझा असा सत्कार होणे हा खूपच प्रेरणादायी प्रसंग असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मानले.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे
शिरसगांव ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment