राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, May 20, 2025

श्रीरामपूरात निघाली भव्य तिरंगा महारॅली


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारतीय जवानांच्या सन्मानार्थ आणि ऑपरेशन सिंन्दूर मोहिमेत शहीद झालेल्या शुर विरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रीरामपूरात नुकतीच भव्य तिरंगा महारॅली निघाली होती.
ऑपरेशन सिन्दुंर मोहिमेच्या माध्यमातून आपल्या भारताने पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर दिले,भारतीय जवानांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी या तिरंगा महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय जवानांच्या पराक्रमाने पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले.मात्र या मोहिमेत काही भारतीय शुर वीर जवानांनी वीरमरण पत्कारले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना आपण त्यांच्या पाठीशी आहोत असा संदेश देण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती, श्रीरामपूर मधील व्यापारी असोसिएशन,डॉक्टर,वकील, इंजीनियर याच्यांसह सर्व
क्षेत्रातील मान्यवरांनी व पक्षांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

मंगळवार दि.२० मे रोजी सकाळी श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्टेशन मारूती मंदिरापासून या रॅलीला सुरूवात झाली.
या रॅली मध्ये माजी आ.भाऊसाहेब कांबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,माजी नगराध्यक्ष संजय फंड,माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, भाजपाचे जितेंद्र छाजेड, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, भाजपाचे 
तालुकाध्यक्ष दिपक (आण्णा) पटारे, डॉ. शंकरराव मुठे, गिरीधर आसने, नानासाहेब पवार, रामभाऊ तरस, आशिष धनवटे, शशांक रासकर, संजय छल्लारे, सुभाष त्रिभुवन, अर्जुन दाभाडे सागर भोसले, शामल शिंदे, कैलास दुब्बैय्या, संजय गांगड, विठ्ठल राऊत, गौतम उपाध्ये, मारूती बिंगले, पढेगांवचे सरपंच किशोर बनकर, बाळासाहेब हरदास, कैलास बोर्डे, रवि पाटील, केतन खोरे, कुणाल करंडे, मनोज लबडे, रूपेश हरकल, शेटे, सौ.पुष्पलता हरदास, पूजा चव्हाण,सौ.मंजुषा ढोकचौळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
सदर रॅली ही रेल्वे स्टेशन मारूती मंदिराहून मेनरोड मार्गे, छत्रपती शिवाजी महाराज रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. प्रसंगी सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत या तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी पिंकीगुरू यांच्यासह तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोप प्रसंगी सेनेच्या तिन्ही दलातील निवृत्त सैनिक उपस्थित होते.त्यांच्या उपस्थितीत यावेळी भारत मातेला वंदन करत,शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत, राष्ट्रगीत म्हणत या तिरंगा महारॅलीचा समारोप करण्यात आला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment