राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, May 27, 2025

अहमदनगर स्थापना दिनानिमित्त संग्राहक सचिन डागा यांच्या दुर्मिळ नाणी, नोटा, स्टॅम्प प्रदर्शनास भरभरून प्रतिसाद


दुर्मिळ वस्तू स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा योग येतो त्या उत्साहला व आनंदाला सीमा नसते- युनूसभाई तांबटकर 

- अहिल्यानगर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
शिक्षण घेत असतांना सर्व आपल्या शिक्षकांकडून इतिहासाबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकत असतात. तसेच त्या काळातील दैनंदिन जीवनात वापरल्या जाणारे नाणी, तसेच सनदी, वस्तू, त्या काळातील बोल्या जाणाऱ्या वेगळ्या भाषा व त्यातील व्यवहार अशा अनेक बाबीबद्दल सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. जेव्हा या सर्व दुर्मिळ वस्तू स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा योग येतो तर उत्साहला व आनंदाला सीमा नसते, असे प्रतिपादन रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी केले.
मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, रहेमत सुलतान फाउंडेशन, इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने अहमदनगर शहराच्या 535 व्या स्थापना दिनानिमित्त रहमत सुलतान हाॅल सर्जेपुरा मध्ये दुर्मिळ नाणी, नोटा, पोस्टल तिकिट व नवीन चलनातील नाणी व नोटांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ कमर सुरुर,उर्जिता फाऊंडेशनच्या सौ. संध्या मेढे, क्वाईन संग्राहक सचिन डागा, गडकिल्ले
अभ्यासक ठाकूरदास परदेशी,एमआयएम जिल्हा अध्यक्ष डॉ. परवेज अशरफी, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद शफकत,क्वाईन संग्राहक पंकज मेहेर, आर्किटेक्ट फिरोज शेख, जावेद मास्टर, जीवन फाऊंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, फिरोज शेख आदी उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनास नगरमधील सर्व इतिहास प्रेमी तसेच शहरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साह व कुतुहलाने प्रदर्शन पाहून संग्राहक सचिन डागा यांच्यावर या दुर्मिळ वस्तूंबद्दल प्रश्नांची बरसात केली. दोन दिवस मोफत प्रदर्शन लावल्याबद्दल सचिन डागा यांचा मखदुम सोसायटी व रहेमत सुलतान फाउंडेशन च्यावतीने सत्कार करण्यात आला.या प्रदर्शनात भारतीय संस्थानिक राजांचे स्टॅम्प पेपर, कोर्ट फी स्टॅम्प, स्वतंत्र भारतातील चलनी नाणी,स्मारके, शिक्के,ब्रिटीशकालीन शिके, मुगल राजांची नाणी, काश्मिरी राजांची नाणी, छत्रपती
शिवाजी महाराजांची नाणी, अहमदनगर शहराच्या राजांची नाणी, खोटी नाणी, तांत्रिक चुकीची नाणी, ब्रिटीशकालीन नोटा, संस्थानिक राजांच्या नोटा, पोर्तुगीत नोटा, हैद्राबाद निजामाच्या नोटा, खादी हंडी नोटस्, स्वतंत्र भारतातील जुन्या व नवीन चलनातील एक-ते दोन हजारपर्यंतच्या नोटा, बगीनर स्टॅम्प संग्रह, पोस्टल स्टॅम्प संग्रह, सिट लेटस्, मिनिएचर शिटस् आदी ठेवण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार शफकत सय्यद यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर💐✅🇮🇳... -9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment