राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, May 26, 2025

*महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात**गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातील विद्यालय, कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने शालांत परीक्षा २०२५ मध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संकुलाचे प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, संजय ठाकरे, माधुरी वडघुले, अनिल जाधव हे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी जगदीश आहेर, आदित्य वाघचौरे, युवराज काळे, कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी तनुजा भालेराव, गौरी नन्नवरे, दिव्या भोंगाळे, कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान विभागातील विद्यार्थी समर्थ दळे, सोहन पवार, निकिता पगारे तर कला विभागातील विद्यार्थी अनुप्रिया बनकर, प्रणित मकासरे, सोहेल पठाण यांचा पालक व शिक्षकांसह मान्यवर व पालकांच्या हस्ते बुके देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य विनायक मेथवडे यांनी कर्मवीरांच्या निस्सीम त्याग व समर्पणाची आठवण करून देत संकुलात आणि रयत शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांनी निर्माण केल्या उत्तुंग यशाबद्दल कौतुक केले. यावेळी महेश वाघचौरे, विलास आहेर, सौ.आहेर, सुभाष दळे, वसंत पवार, महेंद्र पगार, शरद भालेराव, धनंजय भोंगाळे, राहुल बनकर, देवेश आहेर, जवाहरलाल पांडे, ज्ञानदेव दवंगे, विश्वास मोहिते, विठ्ठल म्हसे, दीपक धोत्रे, बाबासाहेब अंत्रे, योगिता निघुते, प्रतिभा ठोकळ, शाहिस्ता शेख आदींसह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट यांनी केले. तर उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी शैक्षणिक संकुलातील गुणवत्तेविषयी समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment