*अल करम हॉस्पिटल ला शिक्षकांचे*
*वतीने रु. साडे सहा लाखाची देणगी*
रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे - सलीमखान पठाण
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
आजारी व पिढीत रुग्णांची सेवा करून मनाला शांती प्राप्त होते त्यामुळे रुग्णसेवा ही एक प्रकारची ईश्वर सेवा आहे. प्रत्येक शिक्षकाने आपल्या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही आपल्या परीने योगदान द्यावे.आपण मशिदी व मदरसे यांना नेहमीच दान देत असतो परंतु रुग्णसेवेसाठी कार्य करणाऱ्या रुग्णालयांना देखील मदत करण्याची आवश्यकता आहे. त्यातून देखील पुण्य प्राप्त होते असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण यांनी केले.
नगर शहरातील अल करम हॉस्पिटल या सेवाभावी वृत्तीने चालविल्या जाणाऱ्या हॉस्पिटलसाठी जिल्ह्यातील उर्दू शिक्षकांच्या वतीने ५ लाख ९० हजार रुपये तसेच उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष के.के. खान यांचे तर्फे ७५ हजार रुपये असे एकूण ६ लाख ६५ हजार रुपयाची देणगी नुकतीच देण्यात आली.त्यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून पठाण बोलत होते.
जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी दिवंगत रमजान पठाण साहेब यांच्या पुढाकारातून कोरोना काळामध्ये जिल्ह्यातील उर्दू शिक्षकांनी एक निधी गोळा केला होता. वैद्यकीय क्षेत्र साठीच त्याचा वापर व्हावा ही भावना त्यासाठी होती. कोरोना पूर्ण संपला परंतु काही कारणास्तव हा निधी खर्च करता आला नाही. अल करम हॉस्पिटलमध्ये उभारण्यात येणाऱ्या आयसीयु सेंटर साठी आता हा निधी देण्यात आला आहे.
रमजान पठाण यांच्या पुढाकारातून उपक्रम झाल्याने सदर आयसीयू सेंटरला 'रमजान पठाण आयसीयु सेंटर' असे नाव देण्याचे देखील यावेळी जाहीर करण्यात आले. भविष्यातही जिल्ह्यातील शिक्षक या हॉस्पिटलला निश्चितपणे मदत करतील असे आश्वासन देखील पठाण यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, निसार बागवान,उर्दू साहित्य परिषदेचे सचिव आबिद दुल्हेखान, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष शरफुद्दीन शेख,माजी शिक्षण विस्तार अधिकारी नवेद मिर्झा,अलीम शेख, अश्फाक शेख,सहेली ग्रुपच्या प्रमुख नर्गिस इनामदार,समीना शेख, शिक्षक नेते बदर शेख, शाकीर शेख,हनीफ शेख, इमाम सय्यद,अनिस शेख, हारुण कुरेशी, साजिद कुरेशी, तौसिफ शेख, सदाकत हुसेन, सलीम शेख, संस्थेचे डॉ.जहीर मुजावर, डॉ. अशपाक पटेल, तौफिक तांबोळी, शेर अली शेख, शाहनवाज तांबोली, इमरान भाईजान, समीर सय्यद, शाहिद सय्यद, एजाज तांबोळी, अर्शद सय्यद, राजीक खान आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रस्ताविक भाषणात फयाज शेख यांनी या कार्यक्रमा मागचा उद्देश विशद केला. डॉ. जहीर मुजावर व डॉ. अशपाक पटेल यांनी हॉस्पिटलच्या कामकाजाची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना हॉस्पिटलला भविष्यात पण असेच प्रकारे सहकार्य करत राहू असे आश्वासित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फय्याज सर यांनी केले. तर आभार हनिफ सर यांनी मानले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान✍️✅🇮🇳
अहमदनगर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment