राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, May 27, 2025

क.जे.सोमैया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार... विद्यालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील क.जे. सोमैया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तसेच या निमित्ताने विद्यालयाचा ६१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाहिद शेख (९५.६०%) प्रथम, तर तेजस शिरसाट(९२.८०%) द्वितीय, जियान शेख(९२.२०%) गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. ९०% पेक्षा अधिक गुण मिळवणारे चार तर ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे नऊ विद्यार्थी आहेत. विद्यालयाचा निकाल ८०.६० लागला.तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला विभागात त्रिभुवन चंद्रकांत परदेशी(६४.१० %) प्रथम, शेख मोहसीन रमजान(६०.१७%) द्वितीय, नन्नवरे अश्विनी जालिंदर (५०.६७%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
वाणिज्य विभागात जावळकर कावेरी सुधीर(६८.६७%) प्रथम, जाधव तुषार बन्सी(६७.१७%) द्वितीय, उदावंत समर्थ बापूसाहेब (५७.६७ %) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ५१.६१ % लागला.
या सत्कार प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन श्री रणजीत श्रीगोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री जितेंद्र अग्रवाल, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासनाधिकारी श्री कांबळे सर,
पालकांमध्ये श्री शिरसाठ श्री शिंपी, सौ. वाव्हळ,श्री आलाटे, श्री पीडीयार, श्री फैरोज शेख, श्री इकबाल शेख आदी उपस्थित होते.

विद्यालयाच्या या उपक्रमाचे परिसरातील शिक्षण प्रेमी नागरिक व पालक यांनी कौतुक केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
अशोकराव खैरे (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳....
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment