- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
मराठा समाजातील विचारवंतांनी एकत्र येऊन समाजात नवीन विवाह समारंभ करण्याबाबत एक आचारसंहिता नियमावली तयार केली आहे, त्या आचारसंहिता नियमावलीचे समर्थन करण्यासाठी मंगळवार दिनांक १० जून २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता शासकीय विश्रामगृह श्रीरामपूर या ठिकाणी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, पुणे येथील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण समाजासमोर आल्यामुळे मराठा समाजातील विचारवंत जागृत झाले असून हुंडा घेणार नाही देणार नाही या संदर्भात जनजागृती करण्यासाठी नियमावली तयार केली आहे. त्या नियमावली मध्ये हुंडा घेऊ अगर देऊ नये, कर्ज काढून विवाह समारंभ करू नये, विवाह समारंभास १०० ते २०० लोकांनाच निमंत्रित करावे, विवाह समारंभात डीजे न लावता पारंपारिक वाद्य लावण्यात यावे, जेवणाचे मेनू पाचच प्रकारचे असावे, हळद,साखरपुडा विवाह एकाच दिवशी करावे, प्री वेडिंग फोटोशूट करू नये, केल्यास त्याचा सगळ्यासमोर देखावा करू नये, भेटवस्तू ऐवजी पुस्तके, झाडे किंवा रोख रक्कम द्यावी, हार घालताना नवरदेवाने नवरीला उचलून घेऊ नये, नवरदेवासमोर दारू पिणाऱ्यांनी नाचू नये अशी समाजहिताची नियमावली तयार करण्यात आलेली आहे, तरी या अचार संहिता नियमावलीचे प्रत्येक समाजातील घटकांनी या आचारसंहिताचे पालन व जनजागृती आणी समर्थन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासोबतच सदरील मिटींगला विविध पक्ष संघटना, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार सामाजिक संस्था,संघटना पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हानही सुभाष दादा त्रिभूवन, गौतम उपाध्ये, तेजस गायकवाड, बाबासाहेब पवार यांनी केले आहे. तसेच या कार्यक्रमासाठी विविध समाजातील लग्न लावणाऱ्या सर्व धर्मगुरूंना आमंत्रित केले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment