कोल्हार येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील शिवाजीनगर भागात शिवाजीनगर मित्र मंडळ यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष कैलास चिंधे सर होते. प्रमुख उपस्थिती कोल्हारेश्वर पतसंस्थेचे चेअरमन आबासाहेब सयाजी खर्डे पाटील, रयत चे माजी प्राचार्य सोनवणे सर, अहिल्यानगर गोल्ड व्हॅल्यूवर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बेंद्रे,पत्रकार प्रमोद कुंभकर्ण, रामदास वडीतके, उपसरपंच कडीत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रस्ताविक जयश्री रोडे/ मिडगे यांनी केले. आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते निलेश वडीतके यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन चरित्र आपल्या सुमधुर वाणीतून शब्दांकित केले. त्यांच्या जीवनातील प्रसंग व त्यांची दूरदृष्टी, राज्यकारभाराची प्रशासन व्यवस्था आपल्या उत्कृष्ट शब्दात मांडली.
या कार्यक्रमाप्रसंगी कैलास चिंधे सर, सोनवणे सर, डॉ.श्रीकांत बेंद्रे,प्रमोद कुंभकर्ण, सचिन बुचुडे, रामदास वडीतके, अर्चनाताई कुंभकर्ण, जयश्री रोडे, राजश्री बुचुडे, उत्तमराव धट, इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी राजेंद्र दातीर, रावण काकडे, राहुल रिठे, चित्ते साहेब, सयाजी राजभोज, एकनाथ येवले, बेंद्रे गुरुजी, लक्ष्मण मेनगर, रावसाहेब लोखंडे, निवृत्ती लोखंडे, उत्तम दातीर, रंभाजी बोरुडे, दिनेश लोढा, देशपांडे मॅडम, सीमा वैष्णव, जनाबाई मेनगर, मनीषा येवले, सविता मेनगर, अनिता पगारे, बेंद्रे मॅडम, चित्ते मॅडम, इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर रोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन फॉरेस्ट ऑफिसर निलेश रोडे यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार हाजी राजमोहम्मद शेख - कोल्हार
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment