कर्तव्य समजून गरजूंना मदत
करायला हवी- फिरोज तांबोली
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
समाजामध्ये गरजूंना मदत करणाऱ्यांची संख्या वाढली आहे परंतु मदत करणे म्हणजे लोकं उपकार समजून करायला लागले आह, ही मानसिकता बदलून कोणतेही मदत कार्य हे कर्तव्य समजून करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राईम कन्स्ट्रक्शनचे संचालक फिरोज तांबोली यांनी केले.
नगर येथील मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी आणी रहेमत सुलतान फाऊंडेशन च्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील कुष्ठधामरोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैदुवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना शफी हज उमरा टुर्स, राजकुमार गुरनानी, मुस्कान वेल्फेअर असोसिएशन, ऍड.अमीन धाराणी, निशांत दातीर, किरण उजागरे, सुनील वाघमारे, दिनेश मंजरतकर, प्रा. महबूब सय्यद, नंदकिशोर आढाव आदी दानशूरांच्या विशेष सहकार्याने फिरोज तांबोली यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, शाळेच्या शिक्षिका मिनाक्षी धामणे, जाधव आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना फिरोज तांबोली म्हणाले की, समाजामध्ये स्वार्थीपणा फार वाढत चाललेला आहे. कोणतेही समाजकार्य करतांना बहुतांश संघटनांचा त्यामागे काही ना काही हेतू असतो,असे समाजकार्य किंवा पुण्यकार्य परमेश्वरालाही नकोय. नि:स्वार्थीपणाने आज कार्य करण्याची खरी गरज असून, त्यासाठी बौद्धीक प्रबोधन होण्याचीही आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद खान यांनी केले. तर आभार मिनाक्षी जाधव यांनी मानले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान अ.नगर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment