राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, July 29, 2025

चर्मकार समाजाच्या विविध प्रश्‍नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन


सामाजातील युवा व्यावसायिकांसाठी व विविध योजनांसाठी निधी मिळावा - साळवे

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता - 
चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने चर्मकार समाजाच्या विविध प्रश्‍नांचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांना निवेदन देण्यात आले. समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांनी शासनाच्या विविध जन कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांना मिळण्यासाठी निधी उपलब्ध होण्याबाबत उपमुख्यमंत्री ना. पवार यांचे लक्ष वेधले. 
महाराष्ट्र शासनाकडून चर्मकार समाजातील होतकरू व्यावसायिकांसाठी १ हजार कोटीची तरतूद आहे, मात्र ही रक्कम कमी पडत असून समाजाला न्याय मिळत नाही. कर्ज प्रकरण मंजूर होऊनही लाभार्थ्यांना रकमेचा धनादेश मिळत नाही. महामंडळाचे अनेक चांगल्या योजना असून, निधी नसल्या कारणाने त्याचा फायदा चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. 
 चर्मकार समाजातील होतकरू व्यावसायिकांसाठी असलेला निधी दुप्पट करावा, लाभार्थ्यांना मिळालेले कर्ज एका महिन्याच्या आत मिळावीत, कर्ज प्रकरणे मंजूर करुन तात्काळ धनादेश द्यावे, कोरोना काळामध्ये अनेक व्यवसायिकांचे व्यवसाय डबघाईला आले असून, सन २०१९ ते २०२४ पर्यंत लाभार्थ्यांचे व्याज माफ करावे, तसेच शासनाच्या विविध जन कल्याणकारी योजनांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment