राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, July 5, 2025

आषाढी एकादशी निमित्त क.जे. सोमैयाची वृक्ष दिंडी, ग्रंथ दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न


  - श्रीरामपूर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
 येथील हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूलची बाल वारक-यांची दिंडी मोठ्या भक्तीमय वातावरण संपन्न झाली . हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल, जेष्ठ मार्गदर्शक संजय छल्लारे, सहसचिव अशोक उपाध्ये, शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, सुर्यकांत कर्नावट, अरुण धर्माधिकारी, मुख्याध्यापक भूषण गोपाळे, पर्यवेक्षक कल्याण लकडे आदि मान्यवरांच्या हस्ते वृक्षदिंडी, ग्रंथ दिंडी पालखीचे पुजन करण्यात आले . प्रमुख मान्यवरांच्या समवेत विद्यालयातुन दिंडी शहारात प्रस्थान झाली . दिंडीचे श्रीराम मंदिर चौक, आझाद मैदान या ठिकाणी रिंगण सोहळा संपन्न झाला . दिंडीचे दैनिक सार्वमतचे उपसंपादक अशोक गाडेकर, नविन मराठी शाळेचे चेअरमन ऋषिकेश जोशी, बालवाडी विभागाचे चेअरमन सुशील गांधी, विजय सेवक,वैशाली जोशी, प्रशासनाधिकारी बी . एस . कांबळे आदि नागरिकांनी स्वागत पालखीचे पुजन केले . श्री विठ्ठल रक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, विविध संत व वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. पर्यावरण रक्षण व वाचनाचे महत्व याविषयीचा संदेश विविध घोषणांच्या द्वारे विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थी व पालकांचा दिंडीत मोठा सहभाग व उत्साह होता . दिंडीची सांगता विद्यालयात आरती होऊन झाली . त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले . दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख उर्मिला कसार, स्मिता पुजारी, शरयु यरगटीकर, सुरेंद्र पाटील, बाबा वाघ, संकेत गंधे, रमेश धोंडलकर,विनायक चितळकर, राजेंद्र क्षीरसागर यांसह सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदी प्रयत्नशील होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
अशोकराव खैरे (सर) श्रीरामपूर ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment