-:अहिल्यानगर - प्रतिनिधी - वार्ता -
सामाजसेवेस अधिक बळकटी मिळून अधिकाधिक समाजसेवा करता यावी याकरिता अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील चांदा येथील ३५ युवकांनी मिळून शनीसेवा सोशल फाउंडेशन ची स्थापना केली आहे. आणि याच माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक देवस्थान मधे मोफत सेवा देत आहेत तसेच सध्या आषाढी एकादशी च्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक गावातून पंढरपूर येथे जाण्यासाठी दिंडी निघत आहे याचे औचित्य साधून शनीसेवा सोशल फाउंडेशन चे संपर्कप्रमुख व मार्गदर्शक डॉ. सुधाकर निकाळजे यांना एक कल्पना सुचली ती अशी की, दैनंदिन कामांचा व्याप आणी महत्त्वाची जबाबदारी मुळे आपण जरी दिंडी ला जावू शकत नसलो तरी कमीतकमी आपण दिंडीतील प्रत्येक वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देवू असे मत व्यक्त केले. त्यानंतर लगेचच फाऊंडेशनचे खजिनदार वृषभ गांधी व जय माता दी मेडिकल चे संचालक निरज मनोचा यांनी आम्ही दोघे मोफत औषधे पुरवठा करु असे जाहीर केले आणि यानंतर जो काही प्रवास सुरू झाला तो कालपर्यंत येवून पोहचला. आतापर्यंत शनीसेवा सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून डॉ. सुधाकर निकाळजे यांनी पंढरपूर येथे जाण्यासाठी निघालेल्या वारीतील २८ जुन ते २ जुलै पर्यंत अनेक दिंड्यातील ३४६ वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा दिली आहे. आणि याच सेवेसाठी शनी सेवा सोशल फाउंडेशन चे डॉ. सुधाकर निकाळजे यांचा सत्कार स्वराज्य पोलीस मित्र तथा पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. सौ.ज्योती शेटे व पंढरपूर तालुकाध्यक्षा सौ. शोभाताई बडवे यांनी पंढरपूर येथे केला. तसेच टेंभुर्णी परते येथे खासदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री शिवाजी मोतीराम दहातोंडे, चंद्रकांत जावळे, बंडू साहेबराव दहातोंडे, संजय वैरागर, भाऊसाहेब दहातोंडे, बाळासाहेब जावळे, शशिकांत कर्डिले, नंदकुमार दहातोंडे, विजय भोपे, शिवा दहातोंडे, शहाजी धुमाळ, योगेश जावळे यांनी अथक परिश्रम घेतले.
सेवेकरीता महाराष्ट्रातील अनेक देवस्थानात संपर्क झालेला आहे तसेच संपर्क न झालेल्या देवस्थान मध्ये संपर्क साधून निशुल्क सेवा देण्यात येईल व कार्तिकी एकादशी साठी नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान येथे सेवेसाठी जाणार आहोत असे शनीसेवा सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष कमलेश शेवाळे यांनी सांगितले आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment