राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, September 6, 2025

उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी जात असलेल्या जड वाहनामुळे व्यंकटेश नगर परिसरातील रस्ता खचला


नागरीकांची नगर परिषदेला
रस्ता दुरुस्तीची मागणी

- वरुड - प्रतिनिधी -/ वार्ता -
वरुड शहरातील व्यंकटेश नगर भागात नवीन उपजिल्हा रुग्णालयाचे काम सध्या सुरू असून, त्या अनुषंगाने बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. या वाहनांमुळे परिसरातील मुख्य रस्ता मोठया प्रमाणात खचला आहे , त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
व्यंकटेश नगर ही एक शांत वसाहत असून, येथे दररोज शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि सर्वसामान्य रहिवासी यांची सतत वर्दळ असते. अशा ठिकाणी बांधकामासाठी आलेल्या ट्रक व डंपर सारख्या जड वाहनांनी रस्त्याचे मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी याबाबत नगर परिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदाराने (कॉन्ट्रॅक्टर) यांनी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. "सरकारी कामासाठी रस्ता वापरणे समजण्यासारखे आहे, पण रत्यांच्या क्षमते पेक्षा जड वाहणा द्ववारे बिल्डींग मटेरियलची वाहतुक होत असल्या मुळे परिसराती रस्ता खराब झाला हा रस्ता दुरूस्त करण्याची जबाबदारी घेणे हे संबंधित ठेकेदाराचे कर्तव्य आहे," असे मत परिसरातील अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

*रस्त्याच्या खचण्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढण्याची शक्यता असून, शाळकरी मुलांसाठी ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे. स्थानिक नगरपरिषद व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित ठेकेदाराला त्वरित दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. - प्रा. सुरेंद्र सिनकर, व्यंकटेश नगर - वरुड*


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार प्रविण सावरकर - वरुड 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर -9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment