राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, September 18, 2025

आजी - माजी सैनिकांच्या वतीने विंग कमांडर देवेंद्र अवताडे यांचा सन्मान


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्याचे भूमिपुत्र आणि माळेवाडी अशा एका छोट्याशा गावात जन्मलेले सुपुत्र,झेडपी शाळेत शिक्षण घेऊन आपल्या भारत मातेच्या सुरक्षेसाठी हवाई दलात भरती होऊन राष्ट्राच्या रक्षणासाठी अत्यंत हिंमत व धैर्याने ऑपरेशन सिंदूर मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेले अधिकारी एअर फोर्सचे फायटर पायलेट विंग कमांडर मा.देवेंद्र औताडे यांनी आपल्या मातृभूमीसाठी आणि राष्ट्रासाठी जीवाची बाजी लावून ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रचंड धैर्य ,कौशल्य आणि जबाबदारीने कामगिरी बजावली आहे.याप्रसंगी अशा धैर्यवान आणि जांबाज अधिकाऱ्यांनी व जवानांनी आपल्या जीवाची व परिवाराची पर्वा न करता खऱ्या निष्ठेने देशसेवेचा उच्च आदर्श प्रस्थापित केल्याने भारत सरकारने त्यांना शौर्यपदक देऊन गौरविले आहे.
त्यांच्या या उतुंग कामगीरी बद्दल तालुक्यातील सर्व माजी सैनिक आणी माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने येथील शहीद स्मारकास त्यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून भारत मातेचा जयघोष करून त्यांचे अभिनंदन व स्वागत करण्यात आले.
त्यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये दाखवलेले धैर्य आणि निष्ठा आम्हा सर्व देशवासीयांना प्रेरणादायी आहे, त्यांच्या या अथक परिश्रमामुळे भारत देशाच्या सुरक्षेत अनमोल योगदान दिल्याने आपल्या माता - पितांचे तसेच माळेवाडी या गावाबरोबरच श्रीरामपूर तालुक्याचे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे नांव देशाच्या पटलावर नेण्याचे मोठे कार्य वींग कामांडर देवेंद्र औताडे यांनी केले आहे. याचा आम्हा सर्व माजी सैनिकांना, श्रीरामपूरकरांना सार्थ अभिमान आहे व त्यांनी आपल्या क्षेत्रात ज्या प्रकारे फायटर उडवले आहे त्याच प्रकारे उंच भरारी घेऊन भविष्यात सेवेत फक्त विंग कमांडर न राहता एअर फोर्स चे एअर चिफ मार्शल होऊन आपल्या भारत देशाचे नाव उंच शिखरावर पोहोचवण्याचे काम करावे अशी सदिच्छा तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या व सर्व नागरिकांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. श्रीरामपूर तालुक्यात आणि माळेवाडी मध्ये विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचा न भुतो ना भविष्य झालेला हा सत्कार होता, सत्कार समारंभामध्ये आपल्या केलेल्या कार्याचा थरार आपल्या शैलीत विशद करत असतांना काही काळासाठी सर्व उपस्थित जनसमुदाय स्तब्ध झाला, याप्रसंगी अनेकांचे डोळे पाणावले होते. विंग कमांडर देवेंद्र औताडे आणि माळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सर्व माजी सैनिकांचा, वीर पत्नींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
 या कार्यक्रमास मेजर कृष्णा सरदार, बाळासाहेब भागडे, बाळासाहेब बनकर, संग्रामजीत यादव, संजय बनकर, अशोक कायगुडे, अशोक साबळे,सुधाकर हरदास, भगिरथ पवार, चांगदेव धाकतोडे,माधव ढवळे, बाळासाहेब लांडे,, मिनिनाथ गुलदगड, राजेंद्र कांदे, विजय तोडमल, आर. एन. माळी, सतीश सांडभोर, असलम शेख ,रामदास वाणी,मच्छिंद्र शेळके, विजय शिंदे, घनश्याम निसळ, राजेंद्र शिंदे ,जी. बी. बनकर , अनील लगड,वीर पत्नी वैशालीताई देशमुख , पार्वताबाई देसाई, रविंद्र सुलताने,राजेंद्र देसाई, विलास खर्डे, माजी पोलीस संघटना पदाधिकारी सदस्य तसेच माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन केतन औताडे यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment