- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंती निमित्त येथील डी. डी. काचोळे माध्य. विद्यालयाच्या वतीने काढण्यात आलेली कर्मवीर अण्णांची सवाद्य मिरवणूक अभूतपूर्व ठरली. मिरवणूकीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजींग कौन्सील सदस्या मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम पाटील यांच्या शुभ हस्ते झाले. जवळपास चार किमी लांबीच्या मिरवणुकीने शहरात विक्रम केला आहे.
मिरवणुकीमध्ये जवळपास १४३० पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, पालक व नागरिक होते . सवाद्य मिरवणुकीमध्ये भव्य रथ, बँड पथक, झांज पथक, लेझिम पथक, लाठीकाठी प्रात्यक्षिक आदी मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शहरांमधील चौका चौकात विविध पथकांचे सादरीकरण आकर्षक रित्या करण्यात आले.
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रदर्शन दर्शविणारे राजस्थान, कोळी, शेतकरी, पंजाबी, आदिवासी, दक्षिणात्य संस्कृती, वारकरी आदी वेशभूषा अविष्कार सादर करण्यात आला.
शहरात ठिकठिकाणी महिलांनी अण्णांच्या पुतळ्याचं औक्षण केलं. श्रीरामपूर - येथील नागरिकांनी कर्मवीर जयंतीच्या मिरवणुकीचे विशेष कौतुक केले. तसेच प्राचार्य पी. व्ही. बडदे, प्राचार्य डॉ. संजय कांबळे, प्राचार्य डॉ. एम. एस.पोंधे, मुख्याध्यापक सुनिल साळवे, मुखाध्यापिका सोनाली पैठणे आदींनी मिरवणूकीत व कॉलेज रोडवरील कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.
यावेळी डी डी काचोळे विद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेले संस्कृतिक कार्यक्रमासह लेझिम लाठी, काठी, झांज पथकाचे सादरीकरण लक्षणीय ठरले.
मिरवणुकीमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव, संस्कृती व संस्कृतिक वारसा, महापुरुषांचा आदर्श , महाराष्ट्राची लोकधारा, पर्यावरण रक्षण, विविध राज्यांची संस्कृती, दर्शवणारी मिरवणूक होती. तसेच एस.के.सोमैय्या प्राथ. विद्यामंदिर विद्यालयाची कर्मवीर अण्णांची सवाद्य मिरवणूक, रा.ब.ना.बोरावके कॉलेज, सी.डी.जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालय व डी. डी काचोळे विद्यालय आदिंच्या मिरवणुकींचा समारोप येथील कर्मवीर चौकातील कर्मवीर पुतळ्या जवळ झाला.
यावेळी श्रीरामपूर रयत संकुलाच्या वतीने व मान्यवरांच्या वतीने कर्मवीर अण्णांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे, पर्यवेक्षक सूर्यकांत सराटे, डी. डी. काचोळे माध्य. विद्यालय स्टाफ, एनसीसी विद्यार्थी, विद्यार्थी वस्तीगृह, व पालक आदींनी विशेष परिश्रम घेतले. श्रीरामपूर पोलीस स्टेशनाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ट्रॅफिक पोलीस आदींनी मिरवणुकीचा चोख बंदोबस्त ठेवला.
कर्मवीर जयंतीचे औचित्य साधून विद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन दिले. मिरवणूक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment