राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, September 30, 2025

सामान्य नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा


- श्रीरामपूर,- प्रतिनिधी -/ वार्ता -
सामान्य नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा या उद्देशाने एसएमबिटी हॉस्पिटल, जय मातादी मित्र मंडळ व जय मातादी फाउंडेशन, एकता महिला मंच श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर शनिवार, दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत जय मातादी सांस्कृतिक भवन, आदर्श नगर, दत्त मंदिरासमोर, दशमेश नगर, श्रीरामपूर येथे भरविण्यात येणार आहे.

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली खालील आजारांची तपासणी व उपचार केले जातील :

हृदयरोग व मोफत ईसीजी तपासणी – छातीत दुखणे, चालताना दम लागणे, हृदयाशी संबंधित आजार

मधुमेह व रक्तदाब तपासणी

श्वसन विकार, दमा व ऍलर्जी तपासणी

हाडांचे व संधिवाताचे विकार – सांधेदुखी, पाठदुखी, हाड मोडणे

स्त्रीरोग व अस्थिरोग तपासणी

मेंदूविकार – उचक्या, थरथरणे, लकवा, स्मृतिभ्रंश

सर्जरी – हर्निया, हायड्रोसिल, मूळव्याध, पित्ताशयातील खडे

सर्वसाधारण आरोग्य तपासणी – शुगर, ब्लड प्रेशर, ब्लड ऑक्सिजन, ईसीजी


शिबिरादरम्यान आवश्यक रुग्णांना पुढील उपचारांसाठी विशेष मार्गदर्शनही दिले जाईल.

हा उपक्रम महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत रुग्णांसाठी मोफत असून, सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुला आहे.
शिबिरासाठी नोंदणी शिबिराच्या दिवशी जय मातादी सांस्कृतिक भवन, आदर्श नगर, दत्त मंदिरासमोर, दशमेश नगर, श्रीरामपूर येथे होईल

SMBT हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांची टीम येणार आहे

नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन या शिबिराचे आयोजक जय मातादी मित्र मंडळ व जय मातादी फाउंडेशन एकता महिला मंच श्रीरामपूर यांचे कडून करण्यात आले आहे.


<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

वृत्त - सहयोग प्रसारण -/...
आयोजक =- रवींद्र गुलाटी ✍️✅🇮🇳
 जय, मातादी मित्र मंडळ - श्रीरामपूर 
🌹🥀🌺🌸🌷

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

No comments:

Post a Comment