राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, September 17, 2025

श्रीरामपूर बाजार समिती वसंतदादा पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित


श्रीरामपूर बाजार समिती वसंतदादा 
पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित 

श्रीरामपूर बाजार समितीच्या पारदर्शक कारभारानेच राज्यात नवलौकिक - बाळासाहेब नाहाटा 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बाजार समित्यांना वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात नाशिक विभागातून अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीने उत्कृष्ट कामगिरीचा मान पटकावत नाशिक विभागातून अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार मिळवून आपल्या कार्याचा राज्यभर ठसा उमटविला असून बाजार समितीच्या पारदर्शक कारभारानेच बाजार समितीचा नावलौकिक झाला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी केले.
         उत्कृष्ट कामगिरी, पारदर्शक कारभार आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारी योजना यांचा सखोल आढावा घेऊन हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, उपाध्यक्ष सुर्यवंशी, संचालक ॲड. सुधीर कोठारी, मानकर तसेच महिला संचालिका यांच्या शुभहस्ते हा सन्मान श्रीरामपूर बाजार समितीला प्रदान करण्यात आला.
     या वेळी श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सुधीर वेणुनाथ नवले, समितीचे संचालक सचिन गुजर, सोन्याबापू शिंदे, दशरथ पिसे, राजेंद्र पाऊलबुद्धे, मयुर पटारे , राजूभाऊ चक्रनारायण, विलासभाऊ दाभाडे यांच्यासह सचिव साहेबराव वाबळे आदि उपस्थित होते.
     पुरस्कारानंतर बाजार समितीचे सभापती सुधीर नवले बोलताना म्हणाले की, माजी आमदार भानुदास मुरकुटे, आमदार हेमंत ओगले आणि जिल्हा बँकेचे संचालक करणदादा ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर बाजार समितीने मागील काही वर्षांत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा, शेतमालाची आधुनिक बाजारपेठ उभारणी, डिजिटल बोली प्रणाली, शेतकऱ्यांना त्वरित देयकांची हमी, स्वच्छ आणि सुव्यवस्थित बाजार परिसर अशा अनेक उपक्रमांद्वारे आदर्श कामगिरी बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील बाजार समित्यांमध्ये श्रीरामपूर समितीने आपले वेगळेपण सिद्ध करून नाशिक विभागात अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा हा मानाचा बहुमान मिळवला असून हा पुरस्कार मिळविण्यात बाजार समितीचे हमाल मापाडी व्यापारी व कर्मचारी यांचे देखील योगदान असल्याचे यावेळी सभापती सुधीर नवले व सचिव साहेबराव वाबळे म्हणाले.

हा पुरस्कार श्रीरामपूर बाजार समितीच्या कार्यक्षम नेतृत्वाची आणि शेतकरी कल्याणासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची राज्यस्तरावर दखल घेणारा ठरला असून यामुळे बाजार समिती अधिकृत जोमाने काम करणाऱ्या पुढील काळात देखील शेतकऱ्यांना विविध योजना शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सभापती सुधीर नवले व सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
 पत्रकार संदीप आसने, श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment