राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, September 8, 2025

सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेतशिक्षक दिन उत्साहात साजरा


शिक्षक हे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, जबाबदारी आणि आत्मविश्वास निर्माण करतात - आबीद खान 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शिक्षक दिन हा दिवस फक्त औपचारिक नाही, तर आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
सावित्रीबाई फुले यांचे नाव या शाळेला लाभले आहे, आणि त्यांच्यासारख्या समाज सुधारक स्त्रीने शिक्षणाची मशाल पेटवली, त्यामुळं आज आपण इथं ज्ञानाच्या प्रकाशात आहोत.
शिक्षक म्हणजे केवळ धडे शिकवणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, जबाबदारी आणि आत्मविश्वास निर्माण करतात. आजच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या पाहून मनाला अपार आनंद झाला.
विद्यार्थ्यांनी केलेला शिक्षकांचा सन्मान ही खरी मोठी कमाई आहे. तुमचे प्रेम, आदर आणि विश्वास हाच शिक्षकांना नेहमी प्रेरणा देतो असे प्रतिपादन मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले.
मोहम्मदिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित नगर शहरातील सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, हसीब शेख, मुख्याध्यापक सय्यद नौशाद, शिक्षक शेख फरजाना दिलावर, शेख अस्लम पटेल, शेख शाहिन, शेख हिना, पठाण फरहान उज़मा, शेख यास्मीन व शेख सुलताना आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थिनींनी शिक्षकांविषयी आपली भावना मनोगतातून व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्व वक्तृत्व सादर करणाऱ्या विद्यार्थिनींना बक्षिसे प्रदान केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम पटेल यांनी केले. तर प्रास्ताविक मुख्याध्यापक नौशाद सय्यद यांनी केले. आभार शेख सुलताना यांनी मांनले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment