राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, October 11, 2025

क.जे.सोमैया शालेय व्यवस्थापन समन्वय समितीची सभा मोठ्या उत्साहात संपन्न


-  श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 हिंद सेवा मंडळाच्या करमशी जेठाभाई सोमैया हायस्कूल मध्ये शालेय शिक्षण विभाग, व शासकिय विभागांनी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या शाळा स्तरावरील विविध समित्यांची एकत्रित सभा घेण्यात आली. शाळा व्यवस्थापन सामिती, परिवहन समिती, माता पालक संघ, शालेय पोषण आहार योजना सामिती, पालक शिक्षक संघ, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, तक्रार पेटी, महिला तक्रार निवारण समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती, तंबाखु सनियंत्रण समिती या समित्यांची एकत्रित सभा अतिशय उत्साहात व खेळीवमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . या सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेशशेठ ओझा होते . प्रमुख पाहुणे विद्यालयाचे चेअरमन रणजीत श्रीगोड,कनिष्ठ महाविघालयाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल शालेय समिती सदस्य किशोर फुणगे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे, सुर्यकांत कर्नावट उपस्थित होते . विद्यालयाचे मुख्याध्यापक भूषण गोपाळे यांनी सर्व समित्यांचे पदाधिकारी यांचे स्वागत करून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला . सर्व समिती प्रमुख यांनी समितीचे कार्य व माहिती सर्व सदस्यांना दिली . विद्यालयाचे चेअरमन यांनी या सभेत आपले विचार प्रकट केले . त्यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गुणवता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे अवाहन केले . या सभेला सामिती सदस्य अशोक दिवे, उमेश तांबडे, आशीष कर्नावट, डॉ. गोरख बारहाते, दिप्ती आमले, प्राची फरगडे, डॉ. प्रशांत खैरनार, पद्माताई भुतडा, रोहीणी पवार,, अमोल धाडगे, रंजना धनगे आदी उपास्थित होते . या सभेचे सुत्रसंचालन रमेश धोंडलकर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक कल्याण लकडे यांनी मानले.सभेची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================



No comments:

Post a Comment