- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
स्वातंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन ॲंण्ड वेलफेअर सोसायटी,रहमत सुलतान फाऊंडेशन व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्यावतीने ६ ते ११ नोव्हेंबर २०२५ पर्यंत "राष्ट्रीय एकता सप्ताह"चे आयोजन करण्यात आले असून, यासाठी "मौलाना अबुल कलाम आझाद महोत्सव समिती"चे गठन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वानुमते या समितीच्या अध्यक्षपदी भैरवनाथ वाकळे यांची तर सचिवपदी युनुस तांबटकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
समितीतील इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष इंजि. इकबाल सय्यद, संजय झिंजे, राजुभाई शेख सहसचिव डॉ. शमा फारुकी, तन्वीर चष्मावाला, आरिफ सैय्यद, खजिनदार शफकत सैय्यद, जावेद अब्बास तांबोळी, सदस्य शेख अयाज गफुर, अतिक शेख, शेख फैय्याज (मा.नगरसेवक), सय्यद आरिफ, शाहनवाज तांबोली, तौफिक तांबोली, शेख इकबाल मुबारक, नईम सरदार,शेख आदिल रियाज, जावेद मास्टर, आर्कि. फिरोज शेख, सल्लागार हाजी शौकतभाई तांबोली, सैय्यद खलील, प्रा.डॉ. सलाम सर, इंजि.अभिजित एकनाथ वाघ, प्रा.डॉ.महेबुब सय्यद,निसार बागवान, शरफुद्दीन सर,अबरार शेख यांची निवड करण्यात आली असल्याचे मखदुम सोसायटीच्या सचिव डॉ. कमर सुरुर यांनी सांगितले.
या संपूर्ण सप्ताहा मध्ये सर्व शाळांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेचे व्यसनमुक्ती अभियान, गडकिल्ले प्रदर्शन, आरोग्य शिबिर व निवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार असून व्याख्यानही घेतले जाणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यां व्यतिरिक्त पालकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी केले आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment