शेडगाव येथील लहानगा श्रीराज फड याच्यावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून तो गंभीर जखमी झाला होता. या भीषण प्रसंगात श्रीराजच्या आईने आणि आजीने दाखवलेले अद्भुत धैर्य खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्या त्वरित प्रतिकारामुळे श्रीराजचा जीव वाचला, हा त्यांच्या साहसाचा मोठा पुरावा आहे.
दवाखान्यातील उपचारानंतर श्रीराज आता सुखरूप घरी परतला असून, आज त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. तसेच, श्रीराजच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पुढील काळात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वन विभागाकडून मदतीचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी श्रीराज लवकर पूर्णपणे ठणठणीत बरा व्हावा, ही सदिच्छा व्यक्त केली. तसेच, याप्रसंगी वनविभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment