कृष्णा खोरे पूर नियंत्रण प्रकल्पाच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, आतापर्यंत झालेली प्रगती आणि पुढील टप्प्यात करावयाची कामे यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.
यासोबतच नाबार्डच्या सहकार्याने राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रक्रियेचेही परीक्षण करण्यात आले. जलसंपत्तीचा योग्य वापर, प्रलंबित कामांची गती आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. दीपक कपूर यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment