राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, March 13, 2023

श्रीरामपूर पोलिसांचा छापा तीन वाहनांवर कारवाई प्रवरा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त ?

( श्रीरामपूर ) - प्रतिनिधि - वार्ता - उक्कलगाव प्रवरा नदीपात्रातून होत असलेल्या बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या चार चाकी वाहनांवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करून साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध वाळू वाहतूक करणारी तीन वाहने बेलापूर पोलिस चौकीत आणली आहेत. सायंकाळी अचानक झालेल्या कारवाईने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.उक्कलगाव परिसरात नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची श्रीरामपूर शहर पोलिसांना  उक्कल गावातील नागरिकांचे चर्चा ऐकण्यात अस्थांना तात्काळ बेलापूर पोलिस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके, पोलिस नाईक गणेश भिंगारदे पोलिस नाईक रामेश्वर ढोकणे, पोलिस कॉन्स्टेबल हरिष पानसंबळ, नंदू लोखंडे यांना सोबत घेऊन छापा टाकला. यावेळी ३ वाहने वेगवेगळ्या याठिकाणी
बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना पोलिसांना आढळून आली. त्या संदर्भ.या कारवाईत रमेश धनवटे व अभिषेक किशोर गायकवाड (रा. उक्कलगाव) हे प्रवरा नदीपात्रात नावघाटाजवळ टाटा झेनॉन गाडी क्रमांक एमएच ४१ जी ९०७९ मध्ये अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना •आढळून आले. पोलिसांनी २ लाख ५० हजार रुपये किमतीची वाळू वाहतूक करणारी गाड़ी व त्यातील ५ हजाररुपये किमतीची वाळू असा २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. - दुसऱ्या कारवाईत गणेश फुलपगार (रा. उक्कलगाव) व सागर साळवे (रा. बेलापूर) हे उक्कलगाव शिवारात झेनॉन क्रमांक एम.एच. १९ एस ७३९४ मध्ये अवैधरीत्या वाळू वाहतूक
करताना • आढळून आले. पोलिसांनी २ लाख • ५० हजार रुपये किमतीची वाळू वाहतूक करणारी गाडी व त्यातील ५ हजार रुपयांची वाळू असा दोन लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिसऱ्या कारवाईत नाना बाळू गुंजाळ (रा. उक्कलगाव) हा एका पांढऱ्या रंगाचा टाटा झेनॉन क्रमांक एमएच १४ ईजी १७० किंमत २ लाख ५० हजार व त्यातील ५ हजार रुपयांची वाळू असा २ लाख ४५ हजार रुपयांचा असा एकूण ७ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी वरील तिनही वाहने व त्यांचे चालक मालक यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती यांच्या मार्गदर्शनाखाली भीर यांच्या उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलिस नाईक रामेश्वर ढोकणे हे अधिक तपास करीत आहेत. असल्याचे समजते.
-----------------------------------------------------
====================================














दीड कोटी रूपयांचा गुटखा ने भरलेल्याले ट्रक पकडला गुटखा आणि गांजा तस्करीचे मोठे केंद्र बनल्याचा आरोप ?

( मुक्ताई नगर तालुका ) - वार्ता -
तालुका गुटखा आणि गांजा तस्करीचे मोठे केंद्र बनल्याचा आरोप आ : एकनाथ खडसे
तालुक्यातून जिल्हाभरात येत असल्याचा आरोप आ.एकनाथराव खडसे करत आहेत. पोलिसांनी यावर अनेकदा कारवाई केली असली तरी देखील हा गोरख धंदा दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार एकनाथराव खडसे यांनी याच विषयावर विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता.
आज मुक्ताईनगर शहरात गुटख्याने भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे. या ट्रकमध्ये पूर्णपणे गुटखा भरलेला होता, त्याची किंमत ५६ लाख असून बाजारभाव तब्बल एक कोटी रूपये असल्याची माहिती आ.एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. हा ट्रक मुक्ताईनगर पोलीस स्थानकात जमा करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच आ.खडसेंनी त्याठिकाणी जाऊन माहिती घेत कारवाई करणाऱ्यांचेही अभिनंदन केले.
त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या एक महिन्यातच दीड कोटी रूपयांचा गुटखा पकडण्यात आला असून मुक्ताईनगर तालुका गुटखा आणि गांजा तस्करीचे मोठे केंद्र बनले असल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला. आज अन्न व औषध प्रशासनाने गुटख्याचा मोठा साठा जप्त केल्यानंतर त्यांनी प्रशासनावर जोरदार टिका करत गंभीर आरोप केले.

----------------------------------------------------
===================================
























Sunday, March 12, 2023

दूधात व्हे पावडर, गोठ्यातच लिक्वीड पॅराफिन टाकून भेसळ प्रकिया सुरू असल्याचा प्रकार धरण्यात आला आहे ?

( नगर ) - राहुरी - वार्ता -   अन्न, औषध प्रशासन विभागाच्या पथकाने भेसळ करताना दोन शेतकऱ्यांना रंगेहाथ पकडले. राहुरी तालुक्यातील तालुक्यातील तांदूळवाडी परिसरातील छापेमारीत 50 लिटर कृत्रिम दूध आणि 80 किलो  व्हे व्पावडर जप्त करण्यात आली आहे. तांदूळवाडीत (ता. राहुरी) शेतकऱ्यांकडून दूध भेसळ केली जात असल्याची माहिती नगर येथील अन्न,औषध प्रशासन विभागाला झिरो गुप्त शुभ चिंतक
मार्फत मिळाली. सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रदिप पवार, प्रदिप कुटे, नमना 
सहाय्यक प्रसाद कसबेकर यांचे पथक शुक्रवारी भल्या पहाटे राहुरी हद्दीत दाखल झाले. पथकाने सकाळी 6.15 वाजेच्या दरम्यान तांदूळवाडी-मांजरी रस्त्यावर रेल्वे स्टेशनलगत संदीप सूर्यभान म्हसे यांच्या गायींच्या गोठ्यावर छापा टाकला. तेथे लाईट लिक्वीड पॅराफिन 120 किलो, कृत्रीम दूध 38 लिटर, गायीचे दूध 30 लिटर व व्हे पावडर 50 किलो असे साहित्य आढळले. या ठिकाणी पथकाला दूध भेसळ सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने कारवाई करण्यात आली.
नवनाथ सबाजी खाटेकर (अष्टविनायक शाळेजवळ, तांदूळवाडी, ता. राहुरी) यांच्या जनावरांच्या गोठ्यामध्येही पथकाने छापा टाकला. तेथेही लाईट लिक्वीड पॅराफिन 2 किलो, कृत्रीम दूध 10 लिटर, गायी दूध 40 लिटर, व्हे पावडर 30 किलो आढळली. दोन्ही गोठ्यांमधील रसायनांचे नमूने घेत तपासणीस पाठविल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शिंदे यांनी दिली. छापा पडल्यानंतर दोन्ही गोठ्यांचे मालक पसार झाले. सायंकाळी उशिरा फिर्याद दाखल होऊन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पसार झाल्याने पोलिसांवर तपास करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. अन्न, औषध प्रशासन पथकाने लिक्वीड पॅराफिन व व्हे पावडर नमुने ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडे या तपासाची सुत्रे देण्यात आली आहेत. आरोपींचा शोध लावताना दूध भेसळीस लागणारे साहित्य कोठून उपलब्ध होत होते, याचा शोधही होणे गरजेचे आहे. दूध भेसळीची पाळेमुळे शोधण्यात पोलिस प्रशासन यशस्वी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले  असल्याचे समजते.

-----------------------------------------------------
====================================





















Saturday, March 11, 2023

सावधान राज्यात सतर्कचे निर्देश एच ३ एन २ इन्फ्लुएन्झा मुळे देशात पहिल्यांदाच २ मृत्यू सर्व राज्यांना आज नीती आयोगाची बैठक ?

( नवी दिल्ली ) - वृत्तसंस्था - विशेष - समाचार -
एच३एन२ इन्फ्लुएन्झामुळे (विषाणूवर) हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे मृत्यू ओढावल्याचे प्रकार पहिल्यांदाच समोर आले आहेत.
दोन महिन्यांपासून देशभरात या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी तातडीची बैठक बोलावून सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश जारी केले आहेत. शनिवारी यासंदर्भात निती आयोगाची बैठक होणार आहे.
हरियाणातील रुग्णाबाबत अद्याप संपूर्ण तपशील हाती आलेला नाही, मात्र कर्नाटकमधील रुग्णाबाबतची माहिती प्राप्त झाली आहे. हिरा गौडा (८२) असे मृताचे नाव असून, ते १ मार्च रोजी मरण पावले, मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा त्रासही त्यांना होता.
तपासणीदरम्यान घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल ६ मार्च रोजी प्राप्त झाला. त्यानुसार हिरा यांना एच३एन२ इन्फ्लुएन्झाची लागण झाली होती, ही बाब समोर आली.
६७ दिवसांनंतर कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्याही पहिल्यांदाच ३ हजारांवर
नमुने तपासणीअंती आजवर देशभरात ९० रुग्ण प्रत्यक्षात रुग्णांची संख्या प्रचंड असणे शक्य
एन ३एन२ इन्फ्लुएन्झाची रुग्णसंख्या फार मोठी असणे शक्य आहे. त्याचा फैलावही झपाट्याने होत असल्याने ही चिंतेची बाब आहेच. सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. कोरोनाप्रमाणेच राज्यांसोबत या आजाराचा मुकाबलाही केंद्र सरकार ताकदीने करेल.

मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्यमंत्री

गेली आहे. केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यात एच३एन२ विषाणूच्या रुग्णसंख्येतील वाढ आरोग्य विभागाचा ताण वाढविणारी आहे. एच३एन२ची लागण झालेले ९० रुग्ण आजवर देशभरात नोंदविले गेले आहेत. प्रत्यक्षात ही संख्या कितीतरी जास्त असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी एच३एन२

विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात तातडीची बैठक बोलावली. बैठकीनंतर सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवारी निती आयोगाच्या बैठकीत एच३एन२ तसेच मौसमी इन्फ्लुएन्झाबाबत धोरण ठरवले जाईल.



------------------------------------------------
=================================






































अनुदान. घोषित करा तातडीने. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना.नामदार भुजबळ ?


( नाशिक ) - प्रतिनिधी - वार्ता -
एकीकडे होळी  साजरी होत असतांना राज्यात अवकाळी पावसाने  शेतकऱ्यांच्या पिकांची होळी झाली तर धुळवडीचे रंग खेळले जात असतांना शेतकऱ्यांचे जीवनच बेरंग झालं.
त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत घोषित करण्याची गरज आहे. गुजरात  सारख्या राज्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येताच ३५० कोटी रुपयांची मदत घोषित केली. 
महाराष्ट्रात तर सर्वाधिक कांदा उप्तादक शेतकरी असतांना अद्याप महाराष्ट्र सरकारकडून  शेतकऱ्यांना मदत का नाही असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला.
यावेळी भुजबळ म्हणाले की, अवकाळी पावसामुळे प्रचंड असे नुकसान झाले असून काही ठिकाणी
द्राक्षाच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने या बागा उभ्या करावे लागणार आहे. त्यामुळे हे द्राक्ष शेतकरी आता पाच वर्ष मागे गेला आहे. कांदा, गहू, हरबरा, आंबा, भाजीपाला यासह अनेक शेती पिकाचे मोठ नुकसान झालं आहे. कांदा उत्पादक शेतकरी अडचणी आला असून अद्यापही शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही.
अद्यापही नाफेड (Nafed) प्रत्यक्ष मार्केटमध्ये कांदा खरेदी न करता बाहेरच कांदा खरेदी करत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, नाशिक
जिल्ह्यात तर शेतकऱ्यांनी कांद्याला भाव न मिळत असल्याने चक्क गाव विकायला काढले आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. गुजरात सारखे छोट राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० कोटी रुपयांची मदत करतंय.
आपल्या राज्यातील शेतकरी अवकाळी व शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत आला आहे. ही परिस्थिती आता हाताबाहेर चालली असून शासनाने तातडीने कारवाई करत मदतीची घोषणा करावी. सभागृहात यावर चर्चा करून आजच्या आज निर्णय
घ्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी बोलतांना केली. दरम्यान शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. तात्काळ मदत करण्यात येऊन आजच सभागृहात सविस्तर निवेदन करण्यात येईल अशी माहिती भुजबळ यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

-------------------------------------------------
==================================





Friday, March 10, 2023

रस्ते सिमेंटचे कोणाक्रिन्ट करण करणार- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची माहिती ?


( मुंबई ) - समाचार - एजन्सी - राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत  येणारे रस्ते सिमेंटचे करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan )यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या
तासात दिली .भाजपचे आमदार सुनील राणे यांनी पंतप्रधान योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत केलेल्या कामांचे कंत्राटदारांकडून वस्तू व सेवाकराची रक्कम कपात न केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नाला उत्तर देताना महाजन
म्हणाले, पंतप्रधान ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणाऱ्या कामाबाबत संबंधित
कंत्राटदाराचे अंतिम देयक अदा करताना नियमानुसार वस्तू आणि सेवाकराची कपात करून कंत्राटदाराला देयके अदा केली जातात. कंत्राटदारांना काम
देण्याअगोदर त्यांची बीड कॅपॅसिटी किती आहे हे तपासली जाते.यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, सर्वश्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ बागडे, नारायण कुचे, प्रशांत बंब, आशीष जयस्वाल यांनी उपप्रश्न विचारले.


















भूमीअभिलेख त्र्यंबकेश्वर कार्यालयातील लाच घेताना ए सी बी च्या अधिकाऱ्याने रंगे हात पकडले ?

( नासिक ) - प्रतिनिधि - समाचार - त्र्यंबकेश्वर  येथील भूमीअभिलेख कार्यालयातील दोघांसह एका खासगी व्यक्तीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने तीन लाख रुपयांची लाच (Bribe) घेतांना सापळा रचून शिताफिने अटक (Arrest) केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांना त्यांच्या जागेतील फायनल लेआउटमध्ये त्रुटी दाखवून शेजारील गटातील क्षेत्र त्यांच्या  गटात सरकून न देण्याच्या
मोबदल्यात दौलत नथू समशेर (४३,व्यवसाय- नोकरी, शिरस्तेदार, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय त्रंबकेश्वर, वर्ग 3  रा. फ्लॅट नं 6, चैत्र चंद्र अपार्टमेंट, समर्थ नगर, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरा नगर, गोकुळ
हॉस्पिटल जवळ, नाशिक), भास्कर प्रकाश राऊत (56,व्यवसाय- नोकरी, (भू  करमापक), उप अधीक्षक भूमि अभिलेख, कार्यालय, त्रंबकेश्वर.रा.रो हाऊस नं 3,4, रामकुंज अपार्टमेंट, रामकृष्ण नगर, राम मंदिर जवळ, चुंचाळे  शिवार, अंबड नाशिक),
वैजनाथ नाना पिंपळे (34, धंदा खाजगी मोजणी व बांधकाम व्यवसाय, राहणार रो हाऊस नंबर १, ऋषिराज रो हाऊस, शांतीनगर, मखमलाबाद रोड, नाशिक) यांनी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती प्रथम सहा लाख व नंतर तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून पोलीस अधीक्षक  शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,अप्पर पोलीस अधीक्षक .नारायण
न्याहाळदे,उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गायत्री मधुकर जाधव, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक अनिल बागुल, सापळा पथक प्रकाश महाजन, किरण अहिरराव, अजय गरुड ,परशुराम जाधव यांच्या पथकाने सापळा रचून तीन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.