राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, November 3, 2023

*डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे 'फिरत्या चाकावरती'ला पुरस्कार म्हणजे अनाथांचा गौरव =ह.भ.प. कृष्णानंद महाराज*💐✅🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव दत्तात्रय उपाध्ये यांच्या 'फिरत्या चाकावरती 'आत्मचरित्रास चंद्रपूर येथील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनंता सूर यांनी प्रदान केला ही भीषणावह बाबा आहे, उपाध्येसर यांनी पोरके दुःख सोसले, पोरके जीवन अनुभवले त्यामुळे त्यांना मिळालेला हा पुरस्कार. म्हणजे अनाथांचा गौरवच आहे असे मत गोखलेवाडी येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे प्रमुख ह.भ. प. कृष्णानंद महाराज यांनी व्यक्त केले.
  गोखलेवाडी श्री साई विठ्ठल आश्रमामध्ये पत्रकार, कवी आणि गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई साहित्य मित्र परिवारातर्फे डॉ.बाबुराव उपाध्ये यांना चंद्रपूरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कृष्णानंद महाराज यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कडा येथील संघर्ष ग्रुपचे राज्य सहसचिव सुभाषराव देशमुख,सौ. अनिता देशमुख, दत्तात्रय देशमुख, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील सांस्कृतिक उपक्रमाचे संयोजक सुमित देशमुख,भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेले मेजर नंदकुमार सैंदोरे,संत गोरा कुंभार युवा मंचचे अध्यक्ष नितीन जोर्वेकर,वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये,सचिव सौ.आरती उपाध्ये, कु.ग्रन्था उपाध्ये, इंदिरानगर बचत गटाच्या सौ. सुनंदा वाघमाऱे, सौ सविता उपाध्ये, पवन उपाध्ये आदी उपस्थित होते.यावेळी गणेशानंद व सौ. आरती उपाध्ये यांनी आश्रमासाठी तीन हजाराचा चेकआणि अनाथ मुलांना भरपूर अल्पोहार दिला.अगोदर सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी एकवीसशे रुपये रोख, सुभाषराव देशमुख व सौ. अनिता देशमुख यांनी बंद पाकिटात देणगी प्रदान केली. कृष्णानंद महाराज म्हणाले,
हा आश्रम सर्वांच्या मदतीने चालू आहे,ज्यांना कुणी नाही, ती मुले, मुली सुखाने राहतात, शिक्षण घेतात, असे सांगून ते म्हणाले, डॉ. उपाध्ये, राजेंद्र देसाई, मेजर नंदकुमार सैंदोरे यांच्यासारखी दानशूर मंडळी सतत मदत करतात. ही त्यांची संतवृत्ती आहे, २४/२५ मुलांना सांभाळायचे, शिक्षण द्यायचे हीं एक संयमी तपश्यर्या आहे, ती सर्वांच्या योगदानामुळे होत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. कु. ग्रन्था उपाध्ये ही पुण्यशील कुटुंबाची सुकन्या आहे,असे कौतुक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये, सुभाषराव देशमुख,नितीन जोर्वेकर, मेजर सैंदोरे यांनी आश्रमाचे हॆ कार्य म्हणजे वाळवंटातील अनाथांची हिरवळ असल्याचे गौरवोद्गार काढले. राजेंद्र देसाई यांनी नियोजन केले.गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

Thursday, November 2, 2023

*डाकजीवन विम्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत विशेष सवलत*

अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा
डाक विभागामध्ये 'डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा अंतर्गत खंडित पॉलिसी पुनरुज्जीवीत करण्यासाठी विशेष सवलत सुरु केली असुन खंडित झालेल्या पॉलिसी ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पुनरुज्जीवीत करुन घेण्याचे आवाहन अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक सुरेश बन्सोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
ज्या पॉलिसी खंडित झालेल्या असतील तसेच ज्या पॉलिसी सुरु केल्यापासून सतत ५ वर्ष भरणा न केल्याने खंडित पडल्या असतील तर त्यांना पुनरुज्जीवीत करून सर्वसामान्य विमाधारकांना विमा लाभ मिळू शकतो. पॉलिसीचे पुनरुज्जीवन करताना विमाधारकांचे स्वास्थ्य चांगले असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती साठी दीपक नागपुरे, डाकजीवन विमा विकास अधिकारी भ्रमणध्वनी क्रमांक 7020360729 या क्रमांकावर किंवा आपल्या जवळच्या टपाल कार्यालयात संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*जायकवाडीसाठी भंडारदरा- निळवंडे धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत आ.लहू कानडे मौन बाळगून; हिंमतराव धुमाळ* ?


श्रीरामपूर - प्रतिनिधि -  वार्ता -
समन्यायी पाणी वाटप कायदा तसेच जायकवाडीसाठी भंडारदरा-निळवंडे धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आ.लहू कानडे हे एक अवाक्षरही न बोलता मौन बाळगून आहेत.वास्तविक आपल्या मतदारसंघाचे हितरक्षण करणे हे आमदाराचे कर्तव्य असते.यात आ.कानडे कसूर करीत असल्याची टिका लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ यांनी केली आहे.       
जायकवाडीसाठी भंडारदरा -निळवंडे धरणांमधून पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत चर्चा करणेसाठी आयोजित लोकसेवा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे बैठकीत श्री.धुमाळ बोलत होते.श्री.धुमाळ म्हणाले की,समन्यायी पाणी वाटप कायद्याबाबत उत्तर नगर जिल्ह्यात तिव्र असंतोष निर्माण झालेला आहे.त्यात भांडारदरा व निळवंडे धरणांमधून जायकवाडीसाठी ३.३६ टी.एम.सी.पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात संतापाची लाट उसळली आहे.असे असताना मतदार संघाचे हितरक्षणाची जबाबदारी असणारे आणि स्वतःला अभ्यासू म्हणविणारे आ.कानडे माञ गप्प आहेत.याचा अर्थ मतदार संघातील जनतेने काय घ्यायचा असा सवाल श्री.धुमाळ यांनी केला. 
माजी आ.भानुदास मुरकुटे आमदार असेपर्यन्त पाटपाण्याचे हितरक्षण दक्ष राहून केले जात असे. पाटपाण्यासाठी संघर्ष, आंदोलने वेळप्रसंगी जेलभरो केले जात. त्यामुळे श्रीरामपूर, राहुरी व नेवासा तालुक्यांना हक्काचे पाटपाणी मिळायचे. सन १९९९ मध्ये आमदारकीची सत्ता बदलली आणि पाटपाण्याचा खेळखंडोबा झाला.सर्व प्रकारचे ब्लाॕक रद्द् झाले,शेतीमहामंडळाच्या हरेगाव व टीळकनगर शेतमळ्यांचे पाणी गेले.आता निळवंडेचे ८.५ पाणी तसेच समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार भंडारदरा धरणाचे २ टी.एम.सी असे एकुण १०.५ टी.एम.सी. पाणी जाणार. तरी देखील आ.कानडे एक शब्दही बोलत नाहित. ज्यांचेवर हितरक्षणाची जबाबदारी आहे तेच गप्प राहाणार असतील तर या श्रीरामपूर मतदार संघाला कोणी वाली उरलेला नाही असेच समजावे लागेल, अशी टिपणी श्री.धुमाळ यांनी केली.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*सामाजिक कार्यकर्ते जोएफ जमादार समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत !*🌹🥀🌺🌷🌸 🙏❤️ ✅ 🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
 येथील जे.जे. फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष, समाजवादी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जोएफभाई जमादार यांचा पुणे येथील जनशक्ती विकास मंच या सामाजिक संस्थेकडून समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.
समाजातील विविध ज्वलंत समस्या प्रश्नी सातत्याने आवाज उठवून उपेक्षित आणि दुर्लक्षितांबरोबरच जनसामान्यांना त्यांचे न्याय,हक्क मिळवून देण्याकामी श्री.जमादार यांचा सदैव नेहमीच सिंहांचा वाटा असतो,समाजातील अनेक ज्वलंत समस्यांप्रकरणी धरणे आंदोलने,उपोषणे आदि मार्गाने संघर्ष करत जनसामान्यांना त्यांचे न्याय, हक्क मिळवून देण्याकामी ते सदैव कार्यरत असतात,त्यांच्या अशा या परोपकारी निर्पेक्ष कार्याची दखल घेऊन पुणे येथील जनशक्ती विकास मंच या सेवाभावी संस्थेकडून श्री.जमादार यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या सन्मानबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाची जिम्नॅस्ट इशिता रेवाळे हीची ३७ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*🌹🥀🌺🌷🌸 ❤️ ✅ 🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
---------------------------------------------------
*या दैदिप्यमान उत्कृष्ट कामगिरीबद्दल*
*इशितावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव*
===================================

*ज्येष्ठ पत्रकार नारायण सावंत मुंबई*
प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथे प्रशिक्षण घेणारी इशिता सुनिल रेवाळे हिने नुकत्याच पार पडलेल्या मापसा, गोवा येथील ३७ व्या नॅशनल गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत फ्लोअर एक्सरसाईज व व्हॉल्टिंग टेबल या क्रिडा प्रकारात कांस्य पदकांची कमाई करत वैयक्तीक पाचवा क्रमांक मिळवत मुलींच्या महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवण्यास हातभार लावला. श्री. अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स विभाग प्रमुख) यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रशिक्षक विशाल कटकदौंड यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवल्याबद्दल इशिता वर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
*फोटो ओळी*
(डावीकडून) प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक विशाल कटकदौंड, अध्यक्ष श्री.अरविंद प्रभू , पदकविजेती इशिता सुनिल रेवाळे.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

Wednesday, November 1, 2023

फिर्यादीच्या आधार कार्डसह सव्वापाच लाखाचा मुद्देमाल जप्तप्रवाशांना लुटणार्‍या टोळीतील तिघे सराईत आरोपी गजाआड


नेवासा - प्रतिनिधि - वार्ता
प्रवाशांकडून चाकूचा धाक दाखवून सव्वादोन लाख रुपये किमतीचा माल लुटणार्‍या टोळीतील तिघा सराईत आरोपींना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने जेरबंद  खडका फाटा ते नेवासा दरम्यान असून त्यांच्या ताब्यातून फिर्यादीच्या आधारकार्डसह सव्वापाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत माहिती अशी की, तुषार हरीभाऊ राहिंज (वय 21), रा. शिरापूर आर्वी, ता. शिरुरकासार (जि. बीड) व साक्षीदार हे पैसे घेवून त्यांचे नातेवाईकांकडे जाताना खडका फाटा ते नेवासा रोडवर लघुशंकेसाठी थांबलेले असताना अनोळखी 8 ते 9 पुरुष व एका महिला आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचेकडील 2 लाख 24 हजार 200 रुपये किंमतीचा माल दरोडा चोरी करुन घेवून गेले होते. सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल  करण्यात आला होता.
पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे तपास सोपवला असता पथकाने रेकॉर्डवरील आरोपींचे फोटो फिर्यादीला दाखवले असता दोघांना ओळखले. त्यानंतर सदर आरोपी प्रशांत ऊर्फ पप्पु रजनीकांत भोसले (वय 29), विक्रांत रजनीकांत भोसले (वय 27), सतिष विनायक तांबे (वय 39) सर्व रा. बुरुडगाव रोड, ता. नगर या तिघांना जेरबंद करण्यात आले. त्यांनी त्यांचे इतर साथीदार जनक चव्हाण (फरार), रमेश चव्हाण (फरार), शिवम शिवाजी चव्हाण रा. वाळकी ता. नगर (फरार), कविता पप्पु ऊर्फ प्रशांत भोसले रा. बुरुडगाव (फरार), निलेश बाबुशा पवार (फरार), लखन कांतीलाल पवार (फरार), धिरज कांतीलाल पवार अशांनी मिळुन गुन्हा केल्याची कबुली दिली.
ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन 5 लाख रुपये किंमतीची शेव्हरलेट कंपनीची कॅप्टीव्हा ही गुन्हा करताना वापरलेली कार, 5 हजार रुपये रोख, 22 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन व फिर्यादी यांचे आधारकार्ड  असा एकुण 5 लाख 27 हजार रुपये किंमतचा मुद्देमालताब्यात घेवून नेवासा पोलीस ठण्यात  हजर केले.पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी प्रशांत ऊर्फ पप्पु रजनीकांत ऊर्फ रजिकर्‍या भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द अहमदनगर, बीड, ठाणे, पुणे, हिंगोली व वाशिम जिल्ह्यात खुनासह दरोडा, दरोडा तयारी, मोक्कयासह दरोडा व खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे एकुण 11 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसा कडून समजते

===================================
---------------------------------------------------
: - सह,संपादक रंजित बतरा शब्द...✍️✅🇮🇳...रचना संकलन...वार्ता
---------------------------------------------------
===================================





















*अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी मोफत पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन*


*अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:*
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर, या कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता. अकोले, जि.अहमदनगर येथे अहमदनगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी ४ महिने कालावीधचे पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणाचे निवासी व भोजन व्यवस्थेसह मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रशिक्षण केंद्रात ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 
दि. १ डिसेंबर २०२३ ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित प्रशिक्षणात अहमदनगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांनाच सहभागी होता येणार आहे. प्रशिक्षणासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवाशी दाखला किंवा रेशन कार्ड, डोमीसाईल दाखला, चार पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आवश्यक आहेत. प्रशिक्षणसाठी उमेदवाराचे वजन किमान ५० कि.ग्रॅ. असावे तसेच वय १८ ते २५ वर्ष व उंची कमीत कमी १६५ सें.मी. असावी. शारीरिक क्षमता चाचणी ८०० मिटर रनींग (मार्क-५०), लेखी परीक्षा (मार्क-५०) एकूण १०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांची निवड मेरीटनुसार करण्यात येईल.
दिनांक ०१ ते २५ नोव्हेंबर, २०२३ पर्यंतच उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज स्विकारले जातील. त्यानंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी. प्रशिक्षणसाठीचे अर्ज पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता. अकोले, जि.अहमदनगर या ठिकाणी भरता येतील. अर्ज भरलेल्या इच्छुक उमेदवारांनी दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी परीक्षेसाठी पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता. अकोले, जि. अहमदनगर येथे सकाळी ठिक १०.०० वाजता मुळ व झेरॉक्स कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================