श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
समन्यायी पाणी वाटप कायदा तसेच जायकवाडीसाठी भंडारदरा-निळवंडे धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आ.लहू कानडे हे एक अवाक्षरही न बोलता मौन बाळगून आहेत.वास्तविक आपल्या मतदारसंघाचे हितरक्षण करणे हे आमदाराचे कर्तव्य असते.यात आ.कानडे कसूर करीत असल्याची टिका लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ यांनी केली आहे.
जायकवाडीसाठी भंडारदरा -निळवंडे धरणांमधून पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत चर्चा करणेसाठी आयोजित लोकसेवा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे बैठकीत श्री.धुमाळ बोलत होते.श्री.धुमाळ म्हणाले की,समन्यायी पाणी वाटप कायद्याबाबत उत्तर नगर जिल्ह्यात तिव्र असंतोष निर्माण झालेला आहे.त्यात भांडारदरा व निळवंडे धरणांमधून जायकवाडीसाठी ३.३६ टी.एम.सी.पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात संतापाची लाट उसळली आहे.असे असताना मतदार संघाचे हितरक्षणाची जबाबदारी असणारे आणि स्वतःला अभ्यासू म्हणविणारे आ.कानडे माञ गप्प आहेत.याचा अर्थ मतदार संघातील जनतेने काय घ्यायचा असा सवाल श्री.धुमाळ यांनी केला.
माजी आ.भानुदास मुरकुटे आमदार असेपर्यन्त पाटपाण्याचे हितरक्षण दक्ष राहून केले जात असे. पाटपाण्यासाठी संघर्ष, आंदोलने वेळप्रसंगी जेलभरो केले जात. त्यामुळे श्रीरामपूर, राहुरी व नेवासा तालुक्यांना हक्काचे पाटपाणी मिळायचे. सन १९९९ मध्ये आमदारकीची सत्ता बदलली आणि पाटपाण्याचा खेळखंडोबा झाला.सर्व प्रकारचे ब्लाॕक रद्द् झाले,शेतीमहामंडळाच्या हरेगाव व टीळकनगर शेतमळ्यांचे पाणी गेले.आता निळवंडेचे ८.५ पाणी तसेच समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार भंडारदरा धरणाचे २ टी.एम.सी असे एकुण १०.५ टी.एम.सी. पाणी जाणार. तरी देखील आ.कानडे एक शब्दही बोलत नाहित. ज्यांचेवर हितरक्षणाची जबाबदारी आहे तेच गप्प राहाणार असतील तर या श्रीरामपूर मतदार संघाला कोणी वाली उरलेला नाही असेच समजावे लागेल, अशी टिपणी श्री.धुमाळ यांनी केली.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment