अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा
डाक विभागामध्ये 'डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा अंतर्गत खंडित पॉलिसी पुनरुज्जीवीत करण्यासाठी विशेष सवलत सुरु केली असुन खंडित झालेल्या पॉलिसी ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पुनरुज्जीवीत करुन घेण्याचे आवाहन अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक सुरेश बन्सोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
ज्या पॉलिसी खंडित झालेल्या असतील तसेच ज्या पॉलिसी सुरु केल्यापासून सतत ५ वर्ष भरणा न केल्याने खंडित पडल्या असतील तर त्यांना पुनरुज्जीवीत करून सर्वसामान्य विमाधारकांना विमा लाभ मिळू शकतो. पॉलिसीचे पुनरुज्जीवन करताना विमाधारकांचे स्वास्थ्य चांगले असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती साठी दीपक नागपुरे, डाकजीवन विमा विकास अधिकारी भ्रमणध्वनी क्रमांक 7020360729 या क्रमांकावर किंवा आपल्या जवळच्या टपाल कार्यालयात संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment