राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, November 14, 2023

*स्व.वसंतदादा पाटील जलक्रांती व शैक्षणिक क्रांतीचे जनकः माजी आ. भानुदास मुरकुटे*


श्रीरामपूर -  प्रतिनिधि - / वार्ता -
राज्याचे माजी मुख्यमंञी स्व.वसंतदादा पाटील हे ख-या अर्थाने लोकनेते होते. त्यांच्या काळात सहकार क्षेञाचे बळकटीकरण झाले तसेच ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती घडली.पाणी आडवा पाणी जीरवा कार्यक्रम तसेच राज्यातील नद्यांवर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे संकल्पनेचे स्व.वसंतदादां प्रवर्तक होते. आपल्या व्यक्तिगत राजकीय वाटचालित स्व.दादा आधारस्तंभ होते, असे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
            राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांची भारत राष्ट्र समिती व लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना श्री.मुरकुटे म्हणाले की, स्व.दादा हे ख-या अर्थाने लोकनेते होते. राज्यातील सर्वसामान्यांशी त्यांची नाळ जुळलेली होती. शेती व सहकार क्षेत्रासाठी त्यांचे योगदान अविस्मरणिय आहे. मी आमदार असताना ते मुख्यमंत्री होते. ते खंबीरपणे माझ्या पाठीशी राहिले. त्यामुळे तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी लागले. विशेषतः पाणी आडवा पाणी जीरवा कार्यक्रमाबाबत स्व.दादा आग्रही होते. त्यांचे पासून आपणास जलसंवर्धन कार्यक्रमाची प्रेरणा मिळाली. प्रवरा व गोदावरी नद्यांवरील बहुतांश को.प. बंधा-यांचे प्रस्तावांना त्यांचेच काळात मंजुरी मिळाली. संघर्स्वषमयी राजकारणाच्या कालखंडात स्व.दादा हे राजकारणातले आपले आधारस्तंभ होते, असे सांगत श्री.मुरकुटे यांनी स्व.दादांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी रोहन डावखर यांनी मनोगत व्यक्त केले.
            यावेळी ॲड्.पृथ्वीराज चव्हाण, भगवान सोनवणे, अमोल कोलते, संदीप डावखर, संकेत संचेती, जगदीश भावसार, कैलास बनसोडे, नवाब सय्यद, राम सिंधवाणी, मनोज दिवे, जयेश परमार, कचरू वाघ, प्रमोद करंडे, संजय मोरगे, सोहम मुळे, पंकज देवकर आदी उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर*
*सहयोगी:*स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १६ नोव्हेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक*💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११,०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पं.जवाहरलाल नेहरु सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यां
नी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) - अहमदनगर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


Monday, November 13, 2023

*ग्रामपंचायत मध्ये दिव्यांगाकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करणार - सौ. सारिका कुंकलोळ*🌹🥀🌺🌷🌸🙏 ❤️ ✅ 🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दिव्यांग व्यक्ती करिता सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र दिव्यांग सुविधा कक्ष स्थापन करण्यात येईल.दिव्यांगाकरिता विशेष घरकुल योजना राबविण्यासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांच्या संकल्पनेनुसार प्रकल्प नियोजन करण्यात येईल. महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे त्याची पुर्तता तातडीने करण्यात येईल असे प्रतिपादन दत्तनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.सारिका कुंकलोळ यांनी केले.
               अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने दत्तनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी सौ.सारिका कुंकलोळ, सदस्यपदी श्री. प्रेमचंद कुंकलोळ, सौ.नयना शेवाळे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे,सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, उपाध्यक्ष सुनिल कानडे, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, दत्तनगर शाखेच्या अध्यक्षा सौ. विमल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
           याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांनी दिव्यांग व्यक्ती करिता संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना,अंत्योदय योजना,स्वतंत्र रेशनकार्ड,५% राखीव निधी,वैद्यकीय सुविधा इ.योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र दिव्यांग सुविधा कक्ष स्थापन करावा अशी मागणी केली त्याचबरोबर दिव्यांग महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे या मागणीबरोबरच भावी कार्यकाळासाठी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी यांनी केले तर सुत्रसंचलन संजय साळवे यांनी केले शेवटी आभार सौ. अंजनाबाई रंधे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र दिवे,सौ.प्रमिला कानडे,सौ. संगिता वाघ,ढोणे मावशी,श्री. अंतोन धिवर,सुरेखा वाघ,यांनी विशेष परिश्रम घेतले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
---------------------------------------------------
===================================


Sunday, November 12, 2023

*त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने**एक दिवा शहिदांसाठी कार्यक्रम संपन्न*⭐⭐⚡⭐⭐

🎇🎇🎇🎆🎖️🎆🎇🎇🎇

श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
दिपावली हा सण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा करत असतांना ज्या सैनिकांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाचे बलिदान केले त्यांची आठवण म्हणुन आज आपण या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा श्रीरामपूर च्या वतीने शाखा पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते एक दिवा शहिदांसाठी लावून शहिदांचे स्मरण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ माजी सैनिक माजी नायब तहसीलदार आर. टी. कांदे व परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर हजर असलेल्या सर्वच माजी सैनिकांनी दिवे प्रज्वलित करून शहिदांना नमन केले. याप्रसंगी अहमदनगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार,तालुका अध्यक्ष संग्रामजीत यादव,भगिरथ पवार, विलास खर्डे, श्रीराम ट्रेडर्स चे मालक रामचंद्र सुगुर,सुनील गवळी,मिनीनाथ गुलदगड, रवींद्र कुलकर्णी, अमित देशमुख, दत्तात्रय सोनवणे, कैलास कोठुळे, बाळासाहेब भागडे, सोमनाथ ताके, सुनील भालेराव इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

==============================-=====
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳..
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*आहे दीपप्रज्वलन* 🎆🎇✨✨✨⭐✨✨✨...

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡

दीपावलीचा प्रकाश
आहे दीपप्रज्वलन,
अंतरंगी उजळले
हे जीवन संजीवन !

माणुसकीचे संदर्भ
आहेत प्रकाशरात्री,
अमावसेच्या अंधारी
 दान असावं सत्पात्री !

दिन दिन दिवाळी ही
गायवासरांना जपू ,
नरकासूर मनात
त्यालाच आधी संपवू !

 दिवाळीचा गोडवा हा
  जनमनात रुजावा,
  ज्योतीने ज्योत लावू ही
  माणूस मात्र पूजावा  !

माणुसकीचा उजेड
आहे अर्थ दिवाळीचा ,
संकटात हात देऊ
 क्षण हा देवदर्शनाचा !

   लक्ष्मीचे पूजन घरी
धनधान्य सोबतीला
  शेती मातीचे स्तोत्र हे
  सार्थ करी मानवाला !

तेजोमय दिवाळीचे
सामर्थ्य माणुसकीला ,
जीवन म्हणजे गती
अनुभवी प्रवाहाला !

आनंदाचे,सुखाचे हे
   प्रकाशपर्व नात्यांचे ,
  आकाशकंदील दारी
 मोल सांगे संस्कृतीचे

दारोदारीच्या पणत्या
सांगतात स्त्रीसन्मान ,

रांगोळीच्या रेषा रंगी
अंगणाला देई मान !

 मानवी संस्कृती आहे
   सत्य, शिव, सुंदराची ,

   दिवाळी सांगते अर्थ
   पूजा करू निसर्गाची
आहे दीपप्रज्वलन
ज्ञानदीप जगी लावू

माणसाला माणसाचे
अंतरात देव पाहू !
दिवाळी पाडवा गोड
भाऊबीज आनंदाची,
पावित्र्य आणि चारित्र्य
दिवाळी आहे प्रेमाची !

-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^
***********************************************
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
= *डॉ. बाबुराव उपाध्ये*, श्रीरामपूर - 9270087640
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-{-}-
---------------------------------------------------
===================================

*अनाथांची दिवाळी माणुसकीच्या नात्याने* *गोड झाली = ह.भ.प. कृष्णानंद महाराज* 🌹🥀🌺🌷🌸 🙏❤️ ✅ 🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
सण,उत्सव, उपक्रम हे मानवी संस्कृतीचे आनंदपर्व असते. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि सेवाभावी स्नेही मान्यवरांच्या दिवाळी फराळ, किराणा माल,देणगी इत्यादी माध्यमातून आमच्या अनाथ आश्रमाची दिवाळी गोड झाली असल्याचे आनंद उदगार ह. भ. प. कृष्णानंद महाराज यांनी व्यक्त केले.
  श्रीरामपूर जवळील गोखलेवाडी येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमात विविध व्यक्ती, संस्था यांच्यातर्फे देण्यात आलेल्या मदतीबद्दल कृष्णानंद महाराज बोलत होते.रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कृष्णानंद महाराज म्हणजे आजच्या काळातील गोरगरीब, दुर्लक्षित,अनाथ गोपाळरूपी सवंगड्याचे कृष्णरूप आहे.त्या कृष्णाकडे सत्ता, वैभव होते, पण आजच्या कृष्णानंद महाराजांकडे फक्त सेवाधर्म आहे.आकाश फाटलेले तर माळावरचे दुर्ललक्षित जगणे जगविणे हाती आहे. त्यांनी जो देईल तो भगवंत ह्या भूमिकेतून पाहिल्यामुळे त्यांना हजारो हात लाभले आहेत,असे सांगून ही गोपालनगरी ज्ञानाची आणि माणुसकीची कार्यशाळा असल्याचे सांगितले. या उपक्रमात विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सुखदेव सुकळे यांनी फराळ दिला. वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी किराणा सामान दिले, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी केळी आणि इतर मदत केली.अरुण व्यवहारे आणि बेलापूरच्या शिक्षिका कवयित्री सौ.अनिता व्यवहारे यांनी दोन हजार रुपये आणि इतर देणगी दिली. सुरेश ताके, सौ. अंजली ताके, कु. प्रज्ञा ताके यांनीही मदत दिली. त्याप्रसंगी बोलताना कृष्णानंद महाराज पुढे म्हणाले की,डॉ. बाबुराव उपाध्ये, सुखदेव सुकळे, पत्रकार राजेंद्र देसाई इत्यादी साहित्यिकांमुळे आम्हाला विविध मदतीचे हात लाभले आहेत.ही माणुसकीच्या सेवेची साखळी आहे, त्यातूनच आमच्या दुर्लक्षित आश्रमाला सतत गरजेपुरते देणे लाभत आहे. माणसात देव पाहण्याची संस्कृती अशा माणसात दिसते, असे सांगून कृष्णानंद महाराज यांनी प्रा. शिवाजीराव बारगळ, सौ.अनिता अनिल व्यवहारे आदिंचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केले. यावेळी प्रा.बारगळ म्हणाले, कृष्णानंद महाराज यांनी आपल्या वीस वर्ष वय असलेल्या अवस्थेतच सेवेचा आदर्श निर्माण केला आहे, ही सेवेची पंढरी आणि अनाथांची शिर्डी आहे.येथे विठ्ठल रुक्मिणी, श्री साईबाबा मंदिर फार सुंदर आहे.हे स्थळ म्हणजे पुण्यशील असल्याचे सांगून आपण प्रथमच आल्याचा आनंद व्यक्त केला.सुयोग बुरकुले यांनी नियोजन केले तर दिवाळीचा आनंद अनाथासमवेत साजरा करीत सुखदेव सुकळे यांनी आभार मानले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------===================================

Saturday, November 11, 2023

*" ओझर टाऊनशीप लुंबिनी बुध्दविहारात वर्षावास करणाऱ्या बौध्दाचार्य व उपासकांचा तसेच संविधान बचाव रैलीचे स्वागत व सत्कार संपन्न...!*💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*ओझर (नाशिक) प्रतिनिधी:*
ओझर टाऊनशीप : वर्षावास म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे निवास. म्हणजेच पुर्वी पावसाळ्याच्या तीन महिने भिक्खूंना पावसांत हिंस्रपशुपासुन विषारी प्राण्यांपासून त्रास इजा होऊ नये म्हणून त्यांनी स्थानिक बुद्धविहारात अथवा स्तूपात राहून तेथील उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश देण्याची परंपरा असून त्याचे अनुकरण म्हणजेच या पावसाळ्यात भं.बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे वाचन केले अशा उपासक व बौध्दाचार्य यांचा अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे हस्ते फेटा शाल गुलाबपुष्प देवून लुंबिनी बुध्दविहार ओझर टाऊनशीप येथे सत्कार करून उपोसथ व्रताची सांगता करण्यात आली. या प्रसंगी रिपब्लिकन नेते काकासाहेब खंबाळकर यांचे नेतृत्वाखाली दिक्षाभुमी नागपूर हुन प्रारंभ झालेल्या संविधान बचाव रैलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी काकासाहेब खंबाळकर यांचा फेटा शाल गुलाबपुष्प देवुन रविंद्रदादा जाधव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात काकासाहेब खंबाळकर म्हणाले की डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दीलेले संविधान हे देशाला समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, न्याय या संविधानिक तत्त्वांना जपत वाटचाल करणारे आहे. मात्र आजची देशातील परिस्थिती पाहता या मूलभूत तत्त्वांची पायमल्ली होताना दिसत आहे. त्यासाठीच संविधान बचाव - देश बचाव चा नारा संपुर्ण राज्यात या रॅलीच्या माध्यमातून पोचवत असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी बौध्दाचार्य वाय डी लोखंडे गुरुजी, वैशालीताई जाधव, शामभाऊ पगारे, शिरीष जाधव, त्रिभुवन गुरुजी, भारतभाऊ गवई, दिगंबर वाघ आदींनी त्रिशरण पंचशील देवुन तर वसंतराव वाघ यांचे हस्ते भं.बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी आशाताई जाधव, रंजनाताई जाधव, शारदाताई जाधव, शिलाताई जाधव, यांनी मनोगत व्यक्त केले. शाहीर दिगंबर वाघ, अशोकराव पगारे, मायाताई मोहीते, गाडेकर, मंगलताई पगारे यांनी गितगायन केले. या कार्यक्रमास राजनंदीनी आहीरे, संगिता पवार, वर्षा बोरसे, संजय मोहीते, शशीभाऊ जाधव, वनिताताई जाधव, ऊतम जाधव, बाबुराव प्रधान, नानासाहेब वाघमारे, कोमल जाधव, असलम शेख, शनशोद्दीन आझाद, कमलेश डांगळे, राजेंद्र जाधव, अमर डोगले, शरिफ खाटीक. प्रदीप पगारे, संदीप साबळे, प्रिती म्हसदे, निर्मला गायकवाड, संगिता गायकवाड, अजय शेजुळ, सुधाकर गायकवाड, विनोद हिरे, संतोष शेजवळ, सागर जाधव, चार्वाक जाधव, शशांक जाधव, राणी जाधव, किशोर गवई, लीलाताई प्रधान, करण सोनवणे, उषाताई डांगळे, राजु भुतेकर, कृणाल जाधव, लताबाई केदारे, शालिनी गवई, नितल गवई, द्रोपताताई सु.गायकवाड, रंजनाताई पगारे, सोमनाथ गांगुर्डे, दुर्योधन इंगोले, ताईबाई पवार, बेबीताई आहीरे, आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सुत्रासंचालन शामभाऊ पगारे तर शेवटी आभार ओझर शहराध्यक्ष वर्षाताई बोरसे यांनी मानले. अन्नदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार वजीरभाई शेख -पाथर्डी*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================