श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
राज्याचे माजी मुख्यमंञी स्व.वसंतदादा पाटील हे ख-या अर्थाने लोकनेते होते. त्यांच्या काळात सहकार क्षेञाचे बळकटीकरण झाले तसेच ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती घडली.पाणी आडवा पाणी जीरवा कार्यक्रम तसेच राज्यातील नद्यांवर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे संकल्पनेचे स्व.वसंतदादां प्रवर्तक होते. आपल्या व्यक्तिगत राजकीय वाटचालित स्व.दादा आधारस्तंभ होते, असे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांची भारत राष्ट्र समिती व लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना श्री.मुरकुटे म्हणाले की, स्व.दादा हे ख-या अर्थाने लोकनेते होते. राज्यातील सर्वसामान्यांशी त्यांची नाळ जुळलेली होती. शेती व सहकार क्षेत्रासाठी त्यांचे योगदान अविस्मरणिय आहे. मी आमदार असताना ते मुख्यमंत्री होते. ते खंबीरपणे माझ्या पाठीशी राहिले. त्यामुळे तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी लागले. विशेषतः पाणी आडवा पाणी जीरवा कार्यक्रमाबाबत स्व.दादा आग्रही होते. त्यांचे पासून आपणास जलसंवर्धन कार्यक्रमाची प्रेरणा मिळाली. प्रवरा व गोदावरी नद्यांवरील बहुतांश को.प. बंधा-यांचे प्रस्तावांना त्यांचेच काळात मंजुरी मिळाली. संघर्स्वषमयी राजकारणाच्या कालखंडात स्व.दादा हे राजकारणातले आपले आधारस्तंभ होते, असे सांगत श्री.मुरकुटे यांनी स्व.दादांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी रोहन डावखर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ॲड्.पृथ्वीराज चव्हाण, भगवान सोनवणे, अमोल कोलते, संदीप डावखर, संकेत संचेती, जगदीश भावसार, कैलास बनसोडे, नवाब सय्यद, राम सिंधवाणी, मनोज दिवे, जयेश परमार, कचरू वाघ, प्रमोद करंडे, संजय मोरगे, सोहम मुळे, पंकज देवकर आदी उपस्थित होते.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर*
*सहयोगी:*स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment