💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी*
*भिमराज भालेराव यांची नियुक्ती*
भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश संयोजक प्रमोद वाकोडकर यांनी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. नवीन कार्यकारिणीत १२ विभाग संयोजक ५ , सहसंयोजक ,७ समन्वयक यांचा समावेश आहे.यात उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी शिर्डी येथील सामाजिक कार्येकर्ते भीमराज भालेराव तसेच उत्कर्ष रवंदले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिर्डीतील सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असणारे भीमराज पुंजाजी भालेराव यांची उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी नियुक्ती होताच शिर्डीसह पंचक्रोशीतुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एक तळागळातील कार्यकर्ता व सर्वसामान्य घटकातील तरुणाला भारतीय जनता पार्टी तसेच राज्याचे महसूलमंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील , खा. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाल्याने या निवडीबद्दल मोठे समाधान व्यक्त होत आहे. तर भीमराज भालेराव यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योग व्यवसायातील प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी एका सामान्य कार्येकर्त्याची निवड होणे हे ही कौतुकाची बाब असुन या संधीतुन भीमराज भालेराव हे नक्कीच यशस्वी कार्य करतील अशा शुभेच्छा देत आपल्या भावना शिर्डीतील सत्कार समारंभात कार्येकर्त्यांनी व्यक्त केल्या.
*शिर्डीसह उत्तर महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायातील अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य निर्णय घेऊन त्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असुन शिर्डीतील अडचणीत आलेल्या हॉटेल व्यवसायाला तसेच छोट्या-मोठ्या व्यायसायिकांना उभारी मिळण्यासाठी तसेच गती देण्याचे काम करणार आहे, त्यांच्या अडचनी समजून घेऊन त्यावर काम करणार आहे.सामान्य कार्येकर्त्याला मोठे पद देऊन सन्मान केला यामुळे या नियुक्तीच संधीच सोनं करुन धोरणात्मक कार्य करणार. खा.सुजय विखे पा यांनी शिर्डीत एम.आय.डि.सी. ची घोषणा केली असून या मुळे शिर्डीत उद्योग व्यवसायाला चालना मिळणार असून बेरोजगारीचा प्रश्न ही मिटणार असल्याने याबाबत पाठपुरावा करणार आहे.सामान्य कार्येकर्त्याला मोठे पद देऊन सन्मान केला, संधी दिली या संधीच सोनं करुन धोरणात्मक कार्य करणार - भीमराज भालेराव*
===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️💐🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment