राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, December 29, 2023

बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी अर्थार्जन करून स्वावलंबी बनावे; माजी आ.मुरकुटे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
महिला बचत गटांना विविध स्तरावरुन अर्थसहाय्य मिळते. याचा लाभ घेवून महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून गृहोद्योग, व्यवसाय सुरु करावेत. यातून आर्थिक सक्षम बनून स्वावलंबी व्हावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी
 आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
शहरातील महिला बचत गटांना विविध व्यवसायासाठी अ.नगर जिल्हा बँकेचे संचालक माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे सहकार्यातून १३ महिला बचत गटांना सुमारे १७ लाखाचे कर्ज वितरण श्री.मुरकुटे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील म्हणाले की, अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार व जिल्हा बँकेचे संचालक माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच अशोक सह.साखर कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या प्रयत्नाने श्रीरामपूर शहरात यापुर्वी ४६ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आलेली असून सुमारे ५१ लाख रुपयाचे कर्ज वितरण करण्यात आलेले आहे. महिलांनी बचत गटाचे माध्यमातून विविध व्यवसाय सुरु करून आपले कुटूंबाचा विकास करावा. भविष्यातही अशा प्रकारच्या योजना राबविण्यात येणार असून स्थापन झालेल्या बचत गटाच्या महिलांना यात प्राधान्य देण्यात येणार आहे असे ते
 म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे कार्यालय अधिक्षक बाबासाहेब खर्डे यांनी महिला बचत गटाविषयी सविस्तर माहिती दिली व बचत गटाचे आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने करावे, आर्थिक व्यवहार करतांना काय काळजी घ्यावी, यावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश छल्लारे, जिल्हा बँकेचे शाखाधिकारी राजेंद्र जगधने, शाखाधिकारी अशोक पटारे, प्रमोद करंडे, बाळासाहेब शिंदे, शंकरराव डहाळे, बाबासाहेब थोरात, सौ.शालिनी कोलते, सौ.संगीता शिंदे, सौ. अनिता सुर्यवंशी यांचेसह महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. शेवटी नाना पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

जळगाव (जामोद) येथे आयोजन राज्यभरातील..... पत्रकार होणार सहभागीअनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
माश्री.यदुजी जोशी
 (सहयोगी संपादक दैनिक लोकमत मुंबई) तथा अध्यक्ष पत्रकार अधिस्कृती समीती महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मा.श्री.खा.प्रतापराव जाधव
अध्यक्ष: केंद्रीय संवाद व माहिती
 तंत्रज्ञान समिती भारत सरकार
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मा.श्री.आ.डॉ.संजयजी कुटे
(माजी मंत्री महाराष्ट्र राज्य)

जळगाव (जामोद) येथे आयोजन
 राज्यभरातील पत्रकार होणार सहभागी
अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती

जळगांव - जामोद - / प्रतिनिधी -
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे एकदिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी जळगाव (जामोद) येथील बऱ्हाणपूर रोडवर असलेल्या देवाशिष लॉन्स याठिकाणी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 
या अधिवेशनाचे आयोजक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ (भारत) असुन संयोजक आम्ही
जळगांवकर पत्रकार आहे.
या अधिवेशनाच्या प्रथम सत्रात सकाळी १० ते दुपारी १ वाजतापर्यंत उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री, आमदार डॉ. संजय कुटे हे असणार आहे,
 तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संवाद व माहिती तंत्रज्ञ समिती भारत सरकार चे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव,तसेच
प्रमुख उपस्थिती म्हणून खामगांंव विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर, राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष तथा दै. लोकमत मुंबई चे सहयोगी संपादक यदु जोशी, विशेष उपस्थिती म्हणून आय.एन.एस. समितीचे कार्यकारी सदस्य तथा दै. हिन्दुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य तथा दै. वृत्तकेसरी अमरावतीचे संपादक जयराम आहुजा आदींची उपस्थिती राहणार आहे. 
तर व्दितीय सत्र दुपारी २.३० वाजता ते ४ वाजतापर्यंत होणार आहे. या सत्राला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. स्वाती संदिप वाकेकर, कृ.उ.बा.स. जळगावचे सभापती प्रसेनजीत पाटील, राजर्षी शाहु परिवार तथा संकल्पक वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदिप शेळके, दै. महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक, अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे, नागपूर विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष रमेश कुळकर्णी, अमरावती विभागीय अधिस्विकृती समिती सदस्य राजेंद्र काळे बुलढाणा, सुरेंद्रकुमार आकोडे, गोपाल हरणे यांची उपस्थिती राहणार आहे.
 तर समारोपीय सत्र हे दुपारी ४ ते दु. ५ वाजतापर्यंत राहणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने राहणार असुन प्रमुख उपस्थिती म्हणून अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान यांची उपस्थिती राहणार आहे. यादरम्यान अधिस्विकृती बाबत मार्गदर्शन व आजची पत्रकारीता या विषयावर राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी हे मार्गदर्शन करणार आहे.
तरी या अधिवेशनाला राज्यातील सर्व पत्रकार बंधुनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, केंद्रीय सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, महिला मंच प्रदेश अध्यक्षा जयश्री पंडागडे, केंद्रीय उपध्यक्ष राजेंद्र भुरे , केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक यावूल, केंद्रीय सदस्य माणिक ठाकरे, प्रदीप जोशी, केंद्रीय विधी सल्लागार ॲड. किरण भुते, केंद्रीय संपर्क प्रमुख प्रा. रवींद्र मेंढे, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर, संजय कदम , मीना राहिज, जोशीला पगारीया, वर्षा घाडगे, कांचन मुरके , भावना सरनाईक , अनुप गवळी , प्रताप मोरे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व अ. भा. ग्रा. पत्रकार संघ, जळगाव (जामोद) तालुका कार्यकारीणी , जळगांवकर पत्रकार यांनी केले आहे. 
सदर अधिवेशनामध्ये राज्यभरातील पत्रकार बांधव सहभागी होणार असल्याची माहिती अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे प्रसिध्दी प्रमुख शहजाद खान व सागर सवळे
 यांनी दिली.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Thursday, December 28, 2023

फेथ गॉस्पेल सेंटर ए जी चर्च मध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता
येथील फेथ गॉस्पेल सेंटर ए जी चर्च आदर्शनगर,श्रीरामपूर ह्या चर्च मध्ये ख्रिस्तजयंती ख्रिसमस नाताळ सण चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह विजय केदारी यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, नाताळ सणानिमित्त शहरातील अनेक मान्यवरांनी चर्चला भेट देऊन उपस्थित सर्व ख्रिस्ती बांधवाना नाताळच्या शुभेच्छा दिल्या,त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर चे आमदार लहुजी कानडे, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व माजी उपनगराध्यक्ष करणदादा ससाणे,
माजी उपनगराध्यक्ष दिलीप नागरे,राष्ट्रवादीचे लकी सेठी, सामाजिक कार्यकर्ते विजय शेलार,श्री. भांड, डॉ.जमदाडे,
डॉ.विवेक मकासरे आदिनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. 
यावेळी सर्व मान्यवरांचा चर्चेचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह विजय मार्टिन केदारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्का
केला.नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये विविध
 कार्यक्रमांच नियोजन करण्यात आले होते.
यावेळी महिला,पुरुषांसाठी व लहान मुलांसाठी ख्रिस्तजयंती निमित्त गीतगायन स्पर्धा, नृत्यस्पर्धा,चमचालिंबू स्पर्धा, संगीतखुर्ची स्पर्धा तसेच बायबल सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सर्व स्पर्धकांना चर्चच्यावतीने बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभीजीत केदारी, सुयश मकासरे,आशुतोष केदारी, निलेश वेव्हारे,अभिषेक पडघलमल,विकास मकासरे, छाया घोरपडे,संगीता मकासरे,श्री. तांबे, ग्याब्रिएल केदारी,सुनील शिंगाडे,स्वप्नील वाघमारे,सनी वाघमारे,सिस्टर ठोंबरे,मंगल औटी,मीना लबडे, प्रीती कांबळे, तृप्ती मकासरे, श्रद्धा केदारी,वैशाली केदारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एस. कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विश्वरंजन मकासरे यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर*
=============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

अन्याय अत्याचार निर्मुलन समितीतर्फे विविध नागरी समस्यांप्रश्नी कळवण तहसीलदारांना निवेदन


वजीर - शेख - / पाथर्डी -
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती तर्फे महागाई व बेरोजगारीच्या विरोधात तसेच गायरान जमीनी आदिवासींना मिळावीत व निराधार वृध्दापकाळ योजनेची प्रलंबित अर्ज मंजूर व्हावेत या मागणीकरीता कळवण तहसील कार्यालया समोर निदर्शने आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत असलेली अन्याय अत्याचार निर्मुलन समितीतर्फे विविध सामाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जातात, तथा अन्याय अत्याचार निर्मूलनाप्रश्नी सातत्याने आवाज उठविला जातो.
करीता या सामाजिक संघटनेमार्फत कळवण तहसील कार्यालया समोर महागाई व बेरोजगारीच्या विरोधात तसेच भेंडी येथील गायरान जमीनी साठ वर्षापासून ताब्यात व करणाऱ्या मागासवर्गीय आदीवासींच्या नावावर करण्यात यावीत तसेच शिधापत्रिका आणि वृध्दापकाळ व संजयगांधी निराधार योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करण्यात यावेत आदी मागण्यांबाबत समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया चे राज्य उपाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे नेतृत्वाखाली तर जिल्हाध्यक्ष संजयबाबा गायकवाड यांचे उपस्थितीत निदर्शने आंदोलन करण्यात येवुन तहसीलदार रोहीदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येवून घोषणाबाजी करण्यात आली तर लक्ष वेधण्यासाठी रॅलीने जावून तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. या निदर्शनात समितीचे पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष दिनेशभाऊ आहीरे, जिल्हा संघटक संतोषभाऊ शेजवळ, तालुकाध्यक्षा शर्मिलाताई गांगुर्डे, भेंडी सरपंच व शाखाध्यक्ष कुसुमताई वाघ, हौसाबाई पवार, शिला वाघ, वामन बागुल, चिंधा वाघ,गोरख पवार, इंदुबाई बागुल, बायटाबाई माळी, लताबाई कांबळे, लक्ष्मीबाई बर्डे, चंद्राबाई कुवर, फुलाबाई जगताप आदींसह असंख्य महीला,पुरुष कार्यकर्ते आदि उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
(ब्यूरो चिफ - नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



Wednesday, December 27, 2023

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:

शैक्षणिक वर्ष सन २०२३- २४  साठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती  योजनेचा लाभ घेण्यासाठी  विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज  करण्याचे आवाहन सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 
जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग तसेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी योजनांचे नवीन अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरील https://mahadbt.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ ११ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु करण्यात आलेले आहे.
 इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत.ऑनलाईन अर्ज भरल्याची प्रत महाविद्यालयामध्ये सादर करावी असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

=================================
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
------------------
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------

दिव्यांगांनी योजनेच्या लाभासाठी ४ जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिली असुन जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगानी योजनेच्या लाभासाठी ४ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि‍ विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
 दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगानी https://evehicleform.mshfdc.co.in या लिंकद्वारे ४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०,०० वाजेपर्यंत अर्ज करावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
=============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल




अहमदनगर जिमाका वृत्तसेवा
पुणे येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे अहमदनगर-पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने ही वाहतुक सुरळीत रहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३३ (१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत ३१ डिसेंबर २०२३ ते २ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत अहमदनगर-पुणे बेलवंडी फाटा येथुन पुण्याकडे जाणारी तसेच अहमदनगरकडून सरळ पुणेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
अहमदनगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणारी वाहने बेलवंडी फाटा- देवदैठण - धावलगांव, पिंपरी कोळंडर-उक्कडगांव-बेलवंडी-
अहमदनगर दौंड महामार्गावरुन -लोणी व्यंकनाथ - मढे वडगांव- काष्टी-दौंड-सोलापुर पुणे मार्गे पुणेकडे जातील. अहमदनगरकड़ून सरळ पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक कायनेटीक चौक-केडगांव बायपास-अरणगांव बायपास- कोळगांव -लोणी व्यंकनाथ- मढे वडगांव-काष्टी-दौंड सोलापुर- पुणे मार्गे पुणेकडे जातील.
अहमदनगरकडून पुणेमार्गे मुंबई, नवी मुंबई,ठाणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक कल्याण बायपास- आळेफाटा-ओतुर- माळशेज घाट मार्गे जातील. बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
हा आदेश शासकीय वाहने, पेरणे ता. हवेली येथे जय स्तंभास मानवंदाना व अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या नागरीकांची वाहने,ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व आवश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
=============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================