राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, January 20, 2024

*सुभाष यादव यांची राष्ट्रवादी काँग्रेस* *तालुका सरचिटणीसपदी निवड*


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील सुभाष नारायणराव यादव यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या श्रीरामपूर तालुका सरचिटणीसपदी श्रीरामपूर
 तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे यांनी नियुक्ती केली आहे.
या निवडीचे पत्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव
 अविनाश आदिक यांच्या हस्ते व चेअरमन किशोर पाटील,सुनील थोरात, महेश ताके,कैलास बोर्डे, नेहरू नाना बकाल,बाळासाहेब गवारे नितीन गवारे,रोहित यादव आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.
या निवडीबद्दल सुभाष यादव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111*
-----------------------------------------------
=================================

*अहमदनगर येथे देण्यात येणाऱ्या भोजनासाठी, उंदिरंगाव - मराठा बांधवांकडून ४१०००/- ची मदत*


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या १ लाख सहकारी बांधवांना अहमदनगर येथे श्रीरामपूरकर जेवण देणार आहेत. यासाठी श्रीरामपूर तालुक्यात जोरात तयारी सुरू आहे.याच कार्याला हातभार लावण्यासाठी उंदिरंगाव येथे दिनांक १२ जानेवारी २०२४ ला श्री स्वामी समर्थ केंद्रात मराठा बांधवाची बैठक झाली. त्यात रोख रक्कम जमा करण्याचा निर्णय झाला. ठरल्याप्रमाणे ७ दिवसात ज्याला जी रक्कम देण्याची इच्छा असेल ती वर्गणी गोळा करण्यात आली.

सदर वर्गणी गोळा करण्यात बाळासाहेब घोडे,प्रकाश ताके, दिलीप भालदंड,सतीश नाईक, नवनाथ गायके,सुनील ताके, सुनील भालदंड यांनी मोलाची भूमिका बजावली.

जमा झालेली सर्व रक्कम *₹ ४१,०००/-* व त्या रकमेचा हिशोब आज मराठा समाज ऑफिस श्रीरामपूर येथे पोहच करण्यात आला आहे.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


पत्रकारांनी विवेक जागृत ठेवण्याचे काम करावे - आमदार लहू कानडे


*अशोक गाडेकर यांना स्व.अशोक*
*तुपे पत्रकारिता पुरस्कार प्रदान*

- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
आज देशामध्ये समाजाचे विघटन करण्याचे काम जोमात सुरू आहे. यासाठी पत्रकारांनी जागृत राहून विवेक जागविण्याचे काम करणे आवश्यक आहे. लोकशाहीचा चौथा खांब समजली जाणारी पत्रकारिता आज आतून पोखरली गेली आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना निशाणा बनविले जात आहे. एनडीटीव्ही, लोकशाही टीव्ही ही त्याची उदाहरणे आहेत. श्रीरामपूरच्या विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.

 आमदार कानडे यांच्या यशोधन कार्यालयामध्ये लोकहक्क फाउंडेशनतर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी लोकहक्क फाउंडेशनतर्फे दिला जाणारा स्व. अशोक तुपे पत्रकारिता पुरस्कार श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै. सार्वमतचे वृत्तसंपादक ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर यांना देण्यात आला. पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, फेटा व पुस्तक अशा स्वरूपाचा हा पुरस्कार आमदार लहु कानडे, दिलीप तुपे, विलास तुपे, निखील तुपे, सचिन तुपे यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गाडेकर यांना देण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व पत्रकारांचा फेटा, शाल व पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय छल्लारे, माजी नगरसेवक मुख्तार शाह, कलीम कुरेशी, रज्जाक पठाण, जेष्ठ पत्रकार रमेश कोठारी, सुनील कुलकर्णी, अतुल खरात आदी उपस्थित होते.

 आमदार कानडे यांनी पत्रकारितेचा इतिहास सांगताना १८३२ साली सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र, त्याचबरोबर नगरमधून निघणारे १९७ वर्षांपूर्वीचे ज्ञानोदय हे साप्ताहिक व नेवासा तालुक्यातून निघणारे दिनमित्र वृत्तपत्र हे पत्रकारिताचे खरे आरसे होते, असे सांगून १९८२ साली मी सर्वप्रथम पुस्तक लिहिले. आमच्यातील साहित्यिक विद्रोही होते. आमची भाषा ही आमची बोलीभाषा होती. साहित्यातून विवेक जागृत ठेवण्याचे काम आमचे लोकांनी केले, हेच काम पुढे पत्रकारांनी सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. स्व. अशोक तुपे यांचा सर्व विषयांचा गाढा अभ्यास होता. विशेषत: शेती व पाट पाणी हा त्यांच्या आवडीचा विषय होता. चर्चेच्या ओघात तास न तास आम्ही बोलत होतो. मी काँग्रेस पक्षामध्ये जावे, असा सल्ला तुपे यांचा होता असे सांगून त्यांनी स्व. अशोक तुपे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

लोकहक्क फाउंडेशनतर्फे जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी पुरस्कार देण्याचे आपण गेल्या वर्षीपासून सुरु केले. मागील वर्षी लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मोहनीराज लहाडे, अहमदनगर यांना पुरस्कार दिला. यावर्षी सर्वानुमते अशोक गाडेकर यांची निवड करण्यात आली. पुढील काळामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील पत्रकारांना देखील गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी पत्रकारांची समिती स्थापन करणार आहोत. परंतु त्यासाठी सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन आपले प्रतिनिधी या समितीसाठी द्यावेत. पत्रकारांच्या अनेक संघटना झाल्या आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, संजय छल्लारे यांनी शुभेच्छा दिल्या. सत्कारास उत्तर देताना श्री. गाडेकर यांनी स्व. अशोक तुपे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा उल्लेख करत त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले असे सांगून पत्रकार म्हणून काम करताना समाजाला दिशा देण्याचे काम आम्ही सातत्याने करीत असतो. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतात, असे सांगितले. प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक यांनी केले. सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले.

=================================
पुरस्काराची रक्कम ज्येष्ठ नागरिक संघाला
=================================

पत्रकारिता पुरस्काराची मिळालेली ५ हजार रुपयांची रक्कम श्री. गाडेकर यांनी श्रीरामपूर तालुका पत्रकार संघाला सुपूर्द केली. पत्रकार संघातर्फे सामाजिक कार्यास हातभार लावला जाणार असून ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहाचे वायरिंग करून देण्याचे काम पत्रकार संघाने यापूर्वी मान्य केले आहे, पुरस्काराची रक्कम या कामासाठी पत्रकार संघाकडे देत असल्याचे सांगून खजिनदार अनिल पांडे यांच्याकडे सुपूर्द केली.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम, श्रीरामपूर*
===============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

जिल्ह्यात २ फेब्रुवारी पर्यंत* *प्रतिबंधात्मक आदेश लागू

- शौकतभाई शेख - / वार्ता -

अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३१ (१) व ३७ (३) अन्वये २० जानेवारी २०२४ ते २ फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.

शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.

शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे
 आवश्यक आहे, तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम,
 धार्मिक मिरवणूका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणूका
 हे कार्यक्रम, सभा घेण्यास अथवा मिरवणूका काढण्यास
 ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक
पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागु राहणार नसल्याचे
आदेशात नमूद करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111*
-----------------------------------------------
=================================





Friday, January 19, 2024

शिरसगांवला वेळोवेळी पूर्ण सहकार्य राहील - पो.निरीक्षक नितीन देशमुख


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
पोलीस निरीक्षक देशमुख यांची शिरसगांव तंटामुक्ती
बैठकीस उपस्थिती, ग्रामपंचायतकडून श्री.देशमुख यांचा
 सत्कार

- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव येथे नुकतीच महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची पहिलीच बैठक नव्याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच अशोकराव पवार व उपाध्यक्षपदी अशोकराव गवारे यांची निवड झाली.पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचा शिरसगांव ग्रामपंचायतवतीने सत्कार करण्यात आला.देशमुख यांच्या हस्ते तंटामुक्ती समिती

 सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गणेशराव मुदगुले यांनी मागील आढावा सांगितला.व गाव तंटामुक्त करून पारितोषिक
 मिळविलेले आहे.यापुढे जास्तीत जास्त काही वाद निर्माण झाल्यास ते श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला न जाता गावातच मिटविले जातील अशी ग्वाही दिली.या

 कामी पोलीस विभागाने सहकार्य करावे असे सुचविले.
सत्काराला उत्तर देताना पो.नि. नितीन देशमुख म्हणाले
 की, ग्रामस्थांनी मला निमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे

आभार.व शिरसगांवला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी गणेशराव मुदगुले,माजी तहसीलदार गुलाबराव पादीर, गटविकास अधिकारी शामराव पूरनाळे,सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, ग्रामसेवक पी डी दर्शने,सर्व ग्रा.प.सदस्य,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
==============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*🌷✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

शिर्डीत भाजपा उद्योग आघाडी प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
लोकसभा निवडणूकीत संपूर्ण जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ; त्या विजयाचा शंकनाद शिर्डीत फुंकला - लक्ष्मण साहुजी
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

राजेंद्र बनकर / शिर्डी
भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीची प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीची बैठक शिर्डी येथील हॉटेल साई गोल्ड इन याठिकाणी भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मण साहुजी यांच्या
 अध्यक्षतेखाली तसेच भाजपाच्या प्रमुख पदाधिऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकडकर , कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे , सरचिटणीस नितीन प्रभु देसाई , इंद्रजित राव , अमोल सतस , गिरीधर मंञी यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पक्षीय आढावा बैठक घेऊन नुतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपञ देण्यात आले तथा त्यांचा सत्कारही करण्यात आला.
भाजप उद्योग आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भिमराज भालेराव , उत्कर्ष रवदंले यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिर्डीतील बैठकीस प्रदेश व जिल्ह्याभरातील कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी भाजप प्रवक्ते लक्ष्मण साहुजी यांनी

 सांगितले की अगदी कमी कालावधीत भाजपने
विश्वकर्मा योजने अंतर्गत उत्कृष्ट कार्य केले असुन भाजप
 उद्योग आघाडीत मोठ्या प्रमाणात कार्येकर्ते सहभागी
होत आहेत.
यात सामान्य व्यक्तींपासुन ते उद्योजक हे पक्षाच्या ध्येय
धोरणावर काम करत असुन भविष्यात उद्योग
व्यवसायात आपण महत्त्वाच्या योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. तर शिर्डी सारख्या तिर्थक्षेञात हा कार्यक्रम घेऊन श्री साईबाबांचे आशीर्वाद घेऊन आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजप उद्योग आघाडी ही जोमाने कामाला लागेल तसेच उद्योग आणि राजकारण याचा मेळ आगामी काळात दिसून येईल सोबतच शिर्डीतुन आता भाजप संपूर्ण निवडणूकीत विजय मिळवेल यासाठी भाजपच्या सर्व आघाड्या कामाला लागल्या असुन प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उद्योग आघाडीची बैठक घेऊन आगामी लोकसभा निवडणूकेला सामोरे जाताना महाराष्ट्रातील संपूर्ण जागा लढवण्याच उद्दिष्ट ठरविले असुन त्याचा शंकनाद शिर्डीतुन फुंकला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजेंद्र बनकर - शिर्डी*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्यावतीने हेल्मेट रॅली व रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ


 *हेल्मेट व स्वयंशिस्त हाच एकमेव*
*पर्याय - न्यायाधिश श्री.एन.के खराडे*

- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
उप*उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्यावतीने हेल्मेट रॅली व रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ*
 प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला यावेळी न्यायाधीश श्रीरामपूर श्री.एन.के.खराडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करत उपस्थित अधिकारी यांना शुभेच्छा व्यक्त करून शासनाच्या विविध नियमाचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन केले तसेच वाहन चालक यांनी नेत्र तपासणी करावी तसेच प्रवासापूर्वी आपल्या वाहनाची तांत्रिक स्थिती म्हणजे वाहनांचे टायर प्रेशर, टायर कंडिशन, कुलंट, इंजिन ऑईल, पुरेसे इंधन असल्याची खात्री करावी तसेच वाहनाचे इंडिकेटर व हॉर्न सुस्थितीत असल्याचे खातरजमा करावी. वाहनाची समोरची व मागची काच स्वच्छ ठेवावी, वाहनात अग्निरोधक यंत्र, प्रथमोपचार पेटी असल्याची खात्री करावी तसेच संकट काळात बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन दरवाजा कार्यरत असल्याची खात्री करावी व मद्य प्राशन करून वाहन चालवु नये, लेनची शिस्त पाळावी, वेगावर नियंत्रण ठेवावे,सिटबेल्टचा वापर करावा,थकवा आला असल्यास वाहन चालवु नये तसेच वाहन चालकांनी मोबाईलचा वापर टाळावा अशा सूचना श्रीरामपूर न्यायाधीश श्री. खराडे यांनी यावेळी दिल्या.

प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.गणेश डगळे आणि सर्व मोटार वाहन निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री पी.जी.पाटील,योगेश मोरे, श्री अमर शेवाळे, तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक - प्रज्ञा अभंग, सचिन सानप, सागर नन्नावरे, हेमंत निकुंभ, अमोल सरकटे, रोशन चव्हाण, अतुल गावडे, सागर पुंड, लिना परदेशी, निकिता पानसरे, निकिता
 खंडीझोड,राणी सोनवणे, शितल तळपे,अंकुश भेंडे, सुधाकर साळवे, सुनील शेवरे, नरेंद्र इंजापुरी,गणेश गांगुर्डे ,विशाल पाटील, वाहन डिलर आदी कार्यालयातील कर्मचारी यांनी हेल्मेट परिधान करून रॅलीत सहभाग नोंदवीला.

यावेळी मा. न्यायाधीश श्रीरामपूर श्री एन. के. खराडे यांनी हेल्मेट परिधान करून सहभाग नोंदवत १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत शासकीय अधिकारी पदाधिकारी यांनी नियमाचे पालन करत जनजागृती करावी जेणेकरून जर संभव्य अपघात घडल्यास एखाद्याचे प्राण वाचतील, दुचाकी चालकांनी रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेट व स्वयंशिस्त हाच एकमेव पर्याय असल्याचे ही ते म्हणाले.
आभार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.गणेश डगळे यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================