राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, January 26, 2024

उंदीरगाव येथे पशु वैद्यकीय केंद्राची गरज


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
दि.२६ जानेवारी रोजी तालुक्यातील उंदिरगांव येथे दुपारी २ वाजता ग्रामसभा पार पडली.सर्वप्रथम ग्रामसेवक श्री. डौले यांनी ग्रामसभा इतिवृत्तांत वाचन केले,त्यानंतर सागर गिऱ्हे या ग्रामस्थाने गावामध्ये वेळेवर पाणी येत नाही,तसेच उंदिरगाव पंचक्रोशीला जोडणारे उंदिरगांव - खैरी, उंदिरगाव -गोंडेगांव, उंदिरगाव - खानापुर या रस्त्यांचा प्रस्ताव जिल्हा परीषद तसेच आमदार खासदार यांना त्वरित पाठवावे तसेच शासनाकडुन पशुपालकांना मिळणारे अनुदान आणि विविध योजनांसाठी इअर टॅगींग तसेच पशुधन कार्ड साठी आपल्या गावामध्ये विलंब होत असल्याची तक्रार केली,
यासोबतच आपल्या उंदीरगावामध्ये नवीन पशुवैद्यकीय उपकेंद्र व्हावे व महीलांसाठी कमीत कमी ४ ठिकाणी बाथरुम तसेच टॉयलेट ची व्यवस्था व्हावी, इतर गावांमध्ये अद्ययावत लायब्ररीसाठी भरीव निधी उपलब्ध होतो, मग आपल्या गावाला का नाही ?, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अशी खंत व्यक्त केली.
त्याचप्रमाणे दिवसेंदिवस गावात वाढलेल्या चो-या बघता,
 याआधीच केलेली सीसीटीव्ही तसेच स्ट्रीट लाईट का
 बसवले नाही असा प्रश्नही उपस्थित केला. नियमीत
 पाणीपट्टी भरणा-या ग्रामस्थांना आरओचे पाणी मोफत
 मिळण्याची व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी देखील यांनी करत ग्रामपंचायत पदाधिका-यांना धारेवर धरले.
या सर्व मागण्यांना ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पंडीत तसेच तेथे उपस्थित ग्रामस्थांनी पुर्णपणे पाठींबा दिला.
त्यानंतर डाॅ. राजगुरु यांनी वैद्यकीय योजनांबाबत मोलाच
मार्गदर्शन केले.या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतीभाताई गोलवड या होत्या.,या ग्रामसभेला मार्केट
कमिटीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे तसेच संचालक
विरेश गलांडे,माजी उपसरपंच रमेश गायके तसेचबाळासाहेब निपुंगे सदस्य स्वप्नील पंडीत, गिरीष परदेशी, उज्वला शेळके, प्रकाश ताके,रामचंद्र आव्हाड,सुनिलताके, मुन्नाभाई इनामदार,विरेश बोधक,अविनाश काळे,आदित्य बारहाते,आप्पा डोखे,हाजुभाई सय्यद तसेच इतर ग्रामस्थ तसेच महीला भगीनी उपस्थित होत्या.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
===================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Thursday, January 25, 2024

नवयुवकांनी मतदार म्हणून नोंदणी करत मतदान प्रक्रियेत अधिक संख्येने सहभागी व्हावे



ऑनलाईन सुविधेचा वापर करत युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

*जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय*
 *मतदार दिवस उत्साहात साजरा*

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा
जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नवयुवकांनी मतदार म्हणून नोंदणी करत मतदान प्रक्रियेत अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १४ व्या राष्ट्रीय
 मतदार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. सालीमठ बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर

 जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील, उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, दिव्यांग मतदार अलका, तहसीलदार संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले, देशात साजरा होत
 असलेल्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्याच्या मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प आपण सर्व मिळून यानिमित्ताने करूयात. मतदार यादीत समानता असली पाहिजे यासाठी जिल्ह्यातील सर्व घटकांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. मतदारांची संख्या वाढविण्यासाठी बी. एल. ओ. पासून ते वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी जागरूकपणे काम केल्यामुळे मतदारांची नोंदणी वाढली आहे. या प्रक्रियेत शिक्षक,विविध विभागांचे कर्मचारी, सर्व माध्यमांचे प्रतिनिधी यांचा सहभाग महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 मतदान जागृती मोहिमेत १ लाख २५ हजारापेक्षा अधिक नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात मतदान नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी व्यक्त केला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवमतदारांना मतदान कार्डचे
 वाटपही करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,

 सहायक मतदार नोंदणी अधिकारी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे तर मतदार जागृतीच्या उत्कृष्ट कामाबद्दल तहसीलदार संजय शिंदे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील यांनी केले.
यावेळी नवमतदारांनी आपल्या मनोगतातून सर्वांनी मतदान करण्याचा निर्धार व्यक्त करत मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मतदान जागृतीसाठी विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्त्यांनी पथनाट्यही सादर केले. शालेय विद्यार्थ्यांच्या ढोल व लेझीम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी नवमतदारांना प्रतिज्ञाही देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. अमोल बागुल यांनी केले तर आभार निवडणूक शाखेचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, प्राध्यापक यांच्यासह शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* *शालेय विद्यार्थ्यांची रॅली संपन्न


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आनंद माध्यमिक विद्यालयापासुन सुरुवात झालेल्या या रॅलीस उपजिल्हाधिकारी निवडणूक राहुल पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात केली.


यावेळी उप‍ विभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार संजय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आनंद माध्यमिक विद्यालयापासुन सुरुवात झालेली ही
 रॅली पारिजात चौक- स्वामी समर्थ मंदिर येथुन निघून

 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विसर्जित करण्यात आली. मतदार जागृतीसाठी विद्यार्थ्यांच्या हातातील
 फलक व घोषणांनी संपुर्ण परिसर दणाणुन गेला होता.
 हे फलक व घोषणा सर्वांचे लक्ष आकर्षित करुन घेत
 होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
===============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


Wednesday, January 24, 2024

हिंद सेवा मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी यांची निवड

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्यातील शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या समाजाला जाणाऱ्या हिंद सेवा मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी यांची नुकतीच हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने निवड करण्यात आली.

 नगर येथे सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतीच हिंद सेवा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक त्यांच्या अध्यक्षतेखाली तर कार्याध्यक्ष अनंतराव फडणीस मानद सचिव संजय जोशी यांच्या प्रमुख उपस्थित झाली.

  श्री गुलाटी यांनी श्रीरामपूर नगर परिषदेत नगरसेवक ते उपनगराध्यक्ष सह अनेक समितीवर गेल्या अनेक वर्षापासून काम पाहत राजकारणासह समाजकारणात देखील श्री गुलाटी यांनी जय मातादी मित्र मंडळ च्या माध्यमातून दरवर्षी शहरात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. त्या काळात अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. जय मातादी मित्र मंडळ मार्फत रक्तदान शिबिर गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तकाचे वाटप तेवढेच नव्हे तर जय मातादी मित्र मंडळ मार्फत दरवर्षी वैष्णोदेवी यात्रेचे आयोजन करून हजारो भाविकांचे वैष्णोदेवी दर्शन घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो तसेच अहमदनगर जिल्हा केमिस्ट व डिग्रिस्त असोसिएशनच्या माध्यमातून जिल्ह्यात वेगवेगळे आरोग्य शिबिर देखील शहरासह अनेक ग्रामीण भागात घेत असतात सहकारात देखील जय मातादी नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गरजवंतांना छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायला आर्थिक कर्ज पुरवठा करून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अशा अनेक समाज कामात गुलाटी यांचं काम असल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्व समजणाऱ्या हिंद सेवा मंडळाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.

 या निवडीच्या वेळी सुमतीलाल कोठारी, अजित बोरा,पारस कोठारी,संजय छल्लारे,अशोक उपाध्ये,दत्तात्रय साबळे ,भरत कुंकलोळ, राजेश अलग, अनिल देशपांडे, रणजीत श्रीगोड, बबन मुठे, डॉ दिलीप शिरसाट,मोहन कुकरेजा,राजेंद्र जोशी ,मोहन कथुरिया ,सुनील बोलके ,सुशील गांधी, अशोक गाडेकर, बाळासाहेब भांड,दीपक कुराडे, योगेश देशमुख ,चंद्रकांत संगम,डॉ. रमेश झरकर ,अनिल भनगडे ,अरुण धर्माधिकारी,विजय सेवक ,चेतन भुतडा, शशिकांत भुतडा ,देविदास चव्हाण ,डॉ,जोत्सना तांबे, सौ वैशाली जोशी सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.या निवडीचं गुलाटी यांचं सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे.

=================================
-----------------------------------------------
:- सह, संपादक - जितेश बतरा श्रीरामपूर - संकलन वार्ता - ✍️✅🇮🇳 +919890720961
-----------------------------------------------
=================================



समाजवादी च्या जिल्हाध्यक्षपदी जोएफ जमादार यांची नियुक्ती

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जे.जे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जोएफ जमादार यांची समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार आबु आझमी यांच्या आदेशान्वये

समाजवादी पक्षाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 श्री.जमादार पुर्वी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत असताना त्यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविले तथा उपेक्षित आणि दुर्लक्षितांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवत त्यांना उचित न्याय मिळवून देणेकामी सातत्याने संघर्ष केला असल्याने

त्यांच्या अशा या उत्कृष्ट कार्याची दखल घेवून पक्षाने त्यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे.

यावेळी नियुक्ती पत्र देताना समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महासचिव परवेज़ सिद्दीकी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव रऊफ शेख,महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रताप होगाड़े, युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष फहद अहमद, माजी नगरसेवक शान ए हिंद,महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा श्रीमती साजेदा निहालअहमद (मालेगांव), धुळे शहराध्यक्ष गुड्डू काकर, धुळे येथील माजी नगरसेवक डॉ. सरफराज अन्सारी, माजी नगरसेवक अमीन पटेल,जमील मन्सूरी आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.जमादार यांच्या या नियुक्ती बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

पक्षाचे आपल्यावर टाकलेला विश्वास आणी जबाबदारी यास पुर्णपणे सार्थ करण्याचा प्रयत्न करणार असुन पक्ष वाढीसाठी आहोरात परिश्रम घेवून कार्यकर्त्यांची मोठी फळी जिल्ह्यात उभी करुन जनसामान्यांचे ज्वलंत प्रश्न आणी त्यांच्या न्याय हक्कासाठींचा लढा हा अधिक जोमाने पुढे नेणार आहे सोबतच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, महानगर पालिका, ग्रामपंचायत अशा सर्वच निवडणुकीत समाजवादी पक्ष पुर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार असल्याचे यावेळी जोएफ जमादार यांनी सांगितले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
===================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Tuesday, January 23, 2024

प्रत्येकामध्ये वाचन संस्कृती रुजवत आपली भाषा व विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावेत - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ


- अहमदनगर -  जिमाका -/ वृत्तसेवा -
आजच्या आधुनिकतेच्या युगात जागतिकीकरण अत्यंत वेगाने होत आहे. इंटरनेटच्या माध्यमातुन संपुर्ण जग अगदी हातामध्ये आले असले तरी ऊर्जा, शक्ती, विचार देण्याची ताकद पुस्तकांमध्येच आहे. प्रत्येकामध्ये वाचन संस्कृती रुजवत आपली भाषा व विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम या पंधरवड्यातून व्हावे,अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.

व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, तहसिलदार शिल्पा पाटील, शिक्षणाधिकारी श्री. कडूस, डॉ. संजय कळमकर, डॉ.संजय गोरडे, गणेश मरकड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, दैनंदिन जीवनामध्ये आपण मराठी भाषेचा वापर करत असतानासुद्धा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पंधरवडा साजरा करावा लागत आहे. या विषयावर गांभिर्याने विचार होणे गरजेचे आहे.जीवनाला दिशा देण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. येणाऱ्या काळात भाषा संवर्धनाची जबाबदारी पुढच्या पिढीवर असल्याने पुढच्या पिढीमध्ये वाचनसंस्कृती रूजविण्याची गरज असल्याचेही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यावेळी म्हणाले.

 पुस्तके प्रत्येक घरात तसेच मुलांपर्यंत पोहोचली पाहिजेत. यासाठी मोबाईल लायब्ररीसारखा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज असुन प्रत्येक शाळा, महाविद्यालयात वाचन कक्ष सुरु करण्यात यावेत. विरंगुळ्याच्या ठिकाणी पुस्तके पोहोचली पाहिजेत. सर्व आव्हाने पेलत मराठी भाषेचे संवर्धन, जतन व विकास होण्यासाठी केवळ पंधरवडा न साजरा करता ही एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी व्यक्त केली.

उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ म्हणाल्या की, मराठी भाषा संवर्धनासाठी वाचनाचा छंद जोपासणे गरजेचे आहे. साहित्यातूनच मराठी भाषा जोपासली जावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

साहित्यिक डॉ. संजय गोरडे म्हणाले की, आपले जीवन दु:खमुक्त केवळ ज्ञानानेच होऊ शकते. आपल्याला ज्ञान देऊन समृद्ध करण्याची ताकद केवळ ग्रंथांमध्ये आहे. जीवनातील विरोधाभास दूर करण्याचे सामर्थ्य ग्रंथांमध्ये आहे. जीवनाला एक योग्य दिशा देऊन जीवन आनंदी बनविण्यासाठी प्रत्येकाने ग्रंथांना शरण जात वाचनाची सवय अंगिकारण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

साहित्यिक डॉ. संजय कळमकर म्हणाले की, मोबाईलच्या अतिवापरामुळे पुस्तके वाचण्याची सवय लोप पावत चालली आहे. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथवाचनाची सवय प्रत्येकाने अंगिकारण्याची गरज असुन सामर्थ्यावान आयुष्यासाठी प्रत्येकाने ग्रंथांशी मैत्री करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध पुस्तकांचा समावेश असलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनही या ठिकाणी उभारण्यात आले होते. हे प्रदर्शन या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधुन घेत होते.
कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येन उपस्थिती होती.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

नेताजी सुभाष चंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा युवकांवर प्रभाव - ससाणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा' असा नारा देणारे नेताजी सुभाष चंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील असामान्य व प्रतिभा शाली नेते होते. तर शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नेताजी सुभाष चंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते.

ससाणे पुढे म्हणाले की भारतीय राष्ट्रवादाचे मुख्य साधन असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुभाष चंद्र बोस यांच्या देशभक्तीची नेहमीच प्रशंसा केली. ते क्रांतीकारकांचे स्फूर्ती स्थान होते. सुभाष चंद्र बोस यांच्या देशभक्तीने अनेक भारतीयांच्या मनावर कायमची छाप पाडली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नावर भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यांच्या असामान्य वकृत्वामुळे महाराष्ट्राच्या जनतेत त्यांच्याविषयी नेहमीच आदर होता.आपल्या असामान्य कर्तुत्वाने त्यांनी मराठी माणसांच्या मनात घर केले. याप्रसंगी नेताजी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, माजी नगरसेवक दिलीप नागरे, के.सी. शेळके, आशिष धनवटे, मर्चंट चे संचालक निलेश नागले, प्रवीण नवले,रावसाहेब आल्हाट, सुरेश ठुबे, अशोक जगधने, डॉ राजेंद्र लोंढे, सुनील साबळे, युवराज फंड, सनी मंडलिक, रितेश चव्हाणके, रियाजखान पठाण, भगवान जाधव, युनुस पटेल, लक्ष्मण शिंदे, गणेश काते,संजय गोसावी, योगेश गायकवाड, अजय धाकतोडे, विशाल साळवे, सुरेश बनसोडे, राजेश जोंधळे, श्री पवार, सागर दुपाटी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
(ब्यूरो चिफ नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================