राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, January 28, 2024

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेत आनंद बाजार मोठ्या उत्साहात संपन्न


 - श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेत सालाबादप्रमाणे मुलांच्या कलागुणांचा विकास व्हावा तसेच शैक्षणिक अध्ययना बरोबर व्यावसायिक,अध्यात्मिक, साहित्यिक ज्ञान अवगत व्हावे यासाठी शाळेच्या माध्यमातून सतत वर्षभ विविध उपक्रम राबविण्यात येतात,आनंद बाजाराचे आयोजन यामुळे विद्यार्थ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने काही विद्यार्थी घरगुती भाजीपाला तसेच शालेय साहित्य, मिठाई, कपडे, चप्पल, बूट अशा विविध स्वरूपात विक्री करण्यासाठी स्टॉल लावतात. यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय वृद्धी तसेच बौद्धिक विकास याचा लाभ होण्यास मदत होते यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी प्रमुख पाहुण्या मनीषाताई आगाशे व पूजाताई नगरकर तसेच आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे नैसर्गिक शेती तज्ञ साबदे काका व किशोर अण्णा थोरात यांनी विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन केले व स्वतःच्या शेतामध्ये पिकविलेला सेंद्रिय भाजीपाला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवला तसेच या कार्यक्रमाला बॉबी बकाल, देवाभाई चौधरी, भरत भाटिया, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कसार, मंजुषा कसार,ज्ञानेश्वरी तुंगार व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आनंद बाजारचे सूत्रसंचालन सारिका कोते व रेखा पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका भाग्यश्री आघाडे यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Saturday, January 27, 2024

मोहमदिया एज्युकेशन सोसायटीत ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा


- अहमदनगर -  प्रतिनिधि -/ वार्ता -
 येथील मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स् अॅण्ड सायन्स् फॉर गर्ल्स, मासुमिया डी.एल.एड्. कॉलेज (उर्दु) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वाबळे कॉलनी, मुकुंदनगर, अहमदनगर येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
प्रा. डॉ. शेख अब्दुस सलाम सर यांनी प्रजासत्ताक दिना बद्दल बोलतांना “धार्मिक एकात्मता व अखंडता” व भारतीय
घटनेबद्दल आपले सखोल व सविस्तर विचार व्यक्त केले. कार्यक्रमास अरुणा आसिफ अली सामाजिक व शैक्षणिक महिला मंडळाच्या अध्यक्षा शेख फरीदा भाभी तसेच मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मिर्झा नवेद गयासबेग, शेख शरफुद्दीन जैनोद्दीन व इतर सभासद तसेच मुख्याध्यापक नौशाद सय्यद व सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका फरहाना सय्यद व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक वृंद, मासुमिया डी.एल.एड्. कॉलेज (उर्दू) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यायाचे सर्व प्राध्यापक वृंद इत्यादी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थीनींनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले.
सुत्रसंचालन बहार सय्यद यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन फरीदा जहागिरदार यांनी केले व शेवटी तलमीज सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अबीदखान, अहमदनगर*
===============
*सहयोगी*
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Friday, January 26, 2024

श्रीरामपूर बाजार समितीचा १२ कोटी २४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर -सभापती सुधीर नवले


आजवरच्या इतिहासात संस्थेला उच्चांकी उत्पन्न व नफा-

 श्रीरामपूर -  प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १२ कोटी २४ लाख ५१ हजार ६८१ चा मुळ अर्थसंकल्प पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर केला असुन संस्थेला आजवरच्या वाटचालीत विक्रमी उत्पन्न व नफा मिळाला असल्याची माहिती सभापती सुधीर पा. नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे पा .यांनी दिली आहे

श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या कामकाजा विषयी माहीती देताना सभापती सुधीर नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी पुढे सांगितले की, संस्थेची दि.३० एप्रिल २०२३ रोजी निवडणूक होऊन दि.१३ मे २०२३ मा.आ.भानुदास मुरकुटे व युवा नेते करण दादा ससाणे यांच्या नेतृत्वाखाली नवीन संचालक मंडळ कार्यरत झाले आहे. संस्थेला डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ४३ लाख ७२ हजार ६६० रुपयांचे उत्पन्न मिळाले असुन ७१ लाख ७० हजार ५८२ रुपयांचा नफा झाला आहे.
या बजेटमध्ये मुख्य बाजार आवारात ८ कोटी १३ लाख व बेलापूर व टाकळीभान उपबाजार आवारातील १ कोटी ९५ लाखांची नियोजित बांधकामे समाविष्ट आहेत. तसेच संस्थेमार्फत एक नवीन उपबाजार, टाकळीभान येथे पेट्रोल पंप उभारणे, जनावरांच्या बाजार वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न करणे, फळे व भाजीपाला विभागात शितगृह उभारणी, नवीन डाळिंब मार्केट सुरु करणे आदी कामे करण्याचा मानस आहे. संस्थेला आजपर्यंत झालेल्या अर्थसंकल्पीय बजेटपुर्वीच्या डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ४३ लाख ७२ हजारांचे विक्रमी उत्पन्न मिळाले असुन ७१ लाख ७० हजारांचा नफा मिळाला आहे, आजवरच्या वाटचालीत हे उत्पन्न आणि नफा उच्चांकी असल्याचे सभापती नवले यांनी सांगितले. संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व काटकसरी पद्धतीने सुरु असल्याची माहिती प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.

तसेच संस्थेच्या बँकेत तीन कोटी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी एक कोटी अशा एकुण चार कोटींच्या मुदत ठेवी आहेत. पणन संचालक यांच्याकडे चार कोटींची कामे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचेही सभापती नवले व प्रभारी सचिव वाबळे यांनी सांगितले.


=================================
*पत्रकार देवीदास देसाई -बेलापूर*
====================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

तहसील कार्यालयाच्या नुतन इमारतीमधुन शासनाच्या धोरणांची, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील


अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:
नेवासा येथे उभारण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीमधून शासनाच्या धोरणांची, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याबरोबरच
 सर्वसामान्यांची कामे वेळेत मार्गी लागून त्यांची अपेक्षापूर्ती व्हावी, अशी अपेक्षा राज्याचे महसूल,
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे
 पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.


नेवासा येथे तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरझ अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, नितीन पाटील, दीपक पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Lपालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगिण विकास होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन अनेकविध योजना राबवत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हा मूलमंत्र घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा वेगाने विकास होत असल्याचेही ते म्हणाले.

शिर्डी व अहमदनगर येथे औद्योगिक वसाहतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या काळात या वसाहतीमध्ये मोठं मोठे उद्योग येऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. नजीकच्या काळात अहमदनगर येथे भव्य अशा महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून या मेळाव्यासाठी ४०० ते ५०० कंपन्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यातून जिल्ह्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या नेवासा येथे ज्ञानेश्वर मंदिर व परिसराचा विकास करण्याचा संकल्प केला असुन या ठिकाणी ज्ञानेश्वर सृष्टी निर्माणाचा आराखडा तयार करण्याच्या प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. या विकास कामांसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले.

कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे अपघात योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश, कृषी विभागामार्फत लाभार्त्याना ट्रॅक्टरचे वितरण, उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभाचे पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच इमारतीसाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांचा पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
===================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



राजळे महाविद्यालयात माजी सैनिकांचा सन्मान


वजीर शेख/प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गेल्या १९ वर्षांपासून सातत्याने दादा पाटील राजळे शिक्षण संस्थेतील दादा पाटील राजळे कला व विज्ञान महावि‌द्यालयात साजी सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो .

यापूर्वी पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी,जवखेडे-खालसा, जवखेडे दुमाला, कासारवाडी, ढवळेवाडी, चितळी, पाडळी, कोपरे, कामतशिंगवे, निवडूंगे, मांडवे, माळीबाभुळगाव, धामणगांवदेवी, पाथडी-शहर, शिरापूर, सुसरे, साकेगाव,

 पागोरीपिपळगाव, कान्होबावाडी, सातवड, दगडवाडी, भोसे आणि वैजुबाभूळगाव, लोहसर इत्यादि गावातील एकूण ३४८ माजी सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करून वि‌द्याथ्यांऀच्या मनात देशसेवा आणि देशप्रे

निर्मितीबद्दलचे भाव रुजविण्याचे प्रयत्न करण्यात आले.
तसेच शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये शुक्रवार दिनाक

२६ जानेवारी २०२४ रोजी खांडगाव आणि जोहारवाडी तालुका: पाथडीऀ येथील २० माजी सैनिकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. महाविद्यालय प्रांगणात सैनिकांच्या आगमन झाल्यानंतर प्रथमतः शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय दादा पाटील राजळे तथा भाऊ यांच्या समाधी स्थळाचे सर्वांनी दर्शन घेतले. यानंतर राष्ट्रीय झेंड्याला सलामी देऊन जनगणमन व 'झेंडा उंचा रहे हमारा' या राष्ट्रगीतांचे गायन झाले.
 या सत्कार सोहळ्याप्रसगी जोहारवाडी येथील माजी सैनिक म्हणून श्री ब्रह्मदेव जगन्नाथ सावंत, श्री गोरक्ष इंद्रजीत सावंत, श्री म्हातारदेव बाजीराव सावंत, श्री भास्कर किसन सावंत, श्री रामराव सोमनाथ चव्हाण, श्री भगवान गणपत शेरतपे, स्वर्गीय पुंजा धोंडीबा सावंत यांचे प्रतिनिधी श्री दादासाहेब पुंजा सावंत, स्वर्गीय नवनाथ इंद्रजीत सावंत यांचे प्रतिनिधी श्री विजय नवनाथ सावंत उपस्थित होते. आणि याचप्रसंगी खांडगाव येथील माजी सैनिक म्हणून श्री बबन नामदेव ससे, श्री भाऊसाहेब बन्सी जाधव, श्री छत्रपती कारभारी वांढेकर, श्री भाऊसाहेब मोहन वांढेकर, श्री काशिनाथ नामदेव चव्हाण, श्री संभाजी लक्ष्मण पवार, स्वर्गीय विलास दामोदर शेरकर यांच्या प्रतिनिधी गंगा भागीरथी चंद्रकला विलास दामोदर, श्री रामकिसन विठ्ठल साळवे, श्री सावित्राबा धोंडीबा वांढेकर, श्री रसिक कुंडलिक दानवे यांच्या प्रतिनिधी सौ. संगीता रसिक दानवे, श्री देवराव बळवंत भंडारे, श्री भाऊसाहेब गुजाबा जगदाळे, तसेच फ्लिपकार्टचे एरिया मॅनेजर श्री दाणवे राहुल रसिक उपस्थित होते.

   सत्कार प्रसंगी या सर्वांना विद्यार्थिनींकडून रांगोळी काढून, गंधाक्षता करून त्यांना बॅडज लावून मा. मुख्याध्यापक श्री रामदास यशवंत म्हस्के सर कासार पिंपळगाव; मा. श्री डॉक्टर प्रदीप देशमुख प्राचार्य, आप्पासाहेब राजळे फार्मसी कॉलेज आणि प्राचार्य डॉक्टर राजधर जयवंतराव टेमकर दादापाटील राजळे महावि‌द्यालय, प्राचार्य श्री सुनील पानखडे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्रनिकेतन विद्यालय आदिनाथनगर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्प व महावि‌द्यालयाचे नियत कालिक देऊन माजी सैनिकांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना अल्पोपहार व चहापान करण्यात आले. श्री ब्रह्मदेव जगन्नाथ सावंत आणि म्हातारदेव बाजीराव सावंत यांनी आपल्या मनोगतात युद्धातील काही प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले . आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यक्रमातून देशसेवेचे व्रत स्वीकारावे असे आवाहन केले. यानंतर अध्यक्षीय भाषणात माननीय रामदास मस्के सर यांनी माजी सैनिकांचे आपल्या प्रति ऋण व्यक्त केले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना अग्निवीर मधून निवड होण्याकरिता व्यायाम व सरावाची गरज असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांसोबत फोटो सेशन झाले.

याप्रसंगी मा. श्री वजीर शेख (पत्रकार दैनिक महाभारत व हिंदूसम्राट तसेच झी-लाईव्ह, महाराष्ट्र २४ मराठी न्यूज, तुफान क्रांती, वैराग्यमूर्ती), प्राध्यापक व सेवक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सदर सत्कार सोहळ्याचे समन्वयक म्हणून डॉ. सुभाष जगन्नाथ देशमुख (अर्थशास्त्र पदवी व पदवीव्युत्तर विभाग आणि वाणिज्य शाखाप्रमुख) यांनी पाहिले.

सदर कार्यक्रमाची प्रेरणा माननीय आमदार मोनिकाताई राजळे तसेच शिक्षण संस्थेचे संचालक माननीय श्री राहुल राजळे तसेच शिक्षण संस्थेचे सचिव जे. आर. महाजन यांच्याकडून मिळाली.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अशोक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे पथनाट्य सादरीकरण


 श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नेहरू युवा संघटन व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शांतता दिन साजरा करण्यात आला. तसेच अशोकनगर परीसरात प्रभात फेरी काढून घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजी चौक येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती याविषयी पथनाट्य सादर केले आणि समाजातील व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ.सुनीताताई गायकवाड उपस्थित होत्या. त्यांनीही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे आणि गावातील लोकांचे व्यसनमुक्ती साठी प्रबोधन केले. तसेच महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी यांनीही व्यसनमुक्ती याविषयी युवकांना मार्गदर्शन केले.

  या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा संगीता खंडीझोड तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका तसेच महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
*पत्रकार राजु मिर्जा*
============
ब्यूरो चिफ: नाशिक विभाग
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

प्रजासत्ताक दिन व स्मारकाच्या प्रथम वर्धापन दिन निमित्ताने माजी सैनिकांच्या वतीने मानवंदना


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
त्रिदल सैनिक सेवा संघ व तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्यावतीने शहीद स्मारकास ज्येष्ठ माजी सैनिक मेजर वसंतराव कराळे यांच्या हस्ते झंडा वंदन करण्यात येणार होते परंतु त्यांची तब्येत बरी नसल्याने ज्येष्ठ माजी सैनिक माजी नायब तहसीलदार राजेंद्र कांदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.याप्रसंगी शहीद स्मारक ठेवण्यासाठी माजी सैनिकांना भरीव मदत करणारे प्रकाशअण्णा चित्ते, प्रसिद्ध उद्योगपती प्रतापराव भोसले, मिलिंदकुमार साळवे, ओमप्रकाश नारंग, देविदास चव्हाण,माजी नगरसेवक महंता यादव, यांनी शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त केले. संघटनेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे मेजर कृष्णा सरदार, संग्राम यादव, बाळासाहेब बनकर, रवींद्र कुलकर्णी,संजय बनकर, छायाताई मोटे,मिनानाथ गुलदगड, रामदास वाणी, अनिल लगड, रोहिदास काळे,मेजर खंडागळे, संदिप यादव भगिरथ पवार, जयश्रीताई थोरात, तसेच आजी - माजी सैनिक संघटनेचे बाळासाहेब उंडे, राजेंद्र शिंदे, घनश्याम निसळ,अनिल सिन्नरकर इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच रावबहादूर नारायणराव बोरावके ( आर.बी.एन.बी.) महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
==============
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*🌹✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================