राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, February 3, 2024

जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा**व कोषागार दिन उत्साहात साजरा

*अधिकारी, कर्मचाऱ्यांनी*
 *उत्स्फुर्तपणे केले रक्तदान*

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा व कोषागारे दिन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
संचालनालयातील विविध घटकांना एकत्र आणुन बंधुत्वाची भावना वाढीस लागण्याबरोबरच कोषागार कार्यालयाच्या प्रगतीला चालना मिळावी या उद्देशाने येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे नियंत्रक सदाशिव पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन धस, विशाल पवार, स्थानिक निधी लेखा परिषदेचे सहायक संचालक बाबासाहेब घोरपडे जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव भोसले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी मनोगतात कोषागाराचे प्रशासनातील महत्व सांगत लेखाविषयक काम पहाणाऱ्या प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी लेखाविषयक काम करताना आपल्या कामात अचूकता ठेवावी, यासाठी सर्व वित्तीय नियमांचा अभ्यास केला पाहिजे, असे सांगितले. कोषागारातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबतही अभिनंदन केले. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
यावेळी जिल्हा कोषागार कार्यालय व जिल्हा कोषागार कर्मचारी संघटना यांच्यावतीने भव्य अशा रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबीरामध्ये सहभाग नोंदवत उत्स्फुर्तपणे रक्तदानही केले.
कार्यक्रमास लेखा व कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
===========
*सहयोगी*
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------=================================


नवीदिल्ली येथे इपीएस ९५पेन्शनधारकांचे आंदोलन सुरु


श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
इपीएस ९५ पेन्शनधारकांचा पेन्शनवाढीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला नसल्याने तीन दिवसांपासून नवी दिल्ली जंतर मंतर येथे राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली शृंखला अनशन सुरु असून त्यात उमाकांत सिंग अध्यक्ष लखनौ,सौ.सरीता नारखेडे संघटक महिला आघाडी, पी.एन.पाटील राष्ट्रीय सल्लागार, कमांडर अशोकराव राऊत राष्ट्रीय अध्यक्ष, रमाकांत नरगुंड समन्वयक, सुभाषराव पोखरकर संघटक पश्चिम भारत, सुरेश डंगवाल संघटक उत्तर भारत. दिल्ली येथील आंदोलन राज्य वार पेन्शनर सहभागी झाले असून आज उत्तर प्रदेशातील ४०० चे वर पेन्शनर सहभागी झाले होते. गुरुवारी जाहीर झालेल्या बजेट मध्ये देशाभरातील ७० लाख पेन्शनधारकांचा प्रश्न मार्गी लागून काहीतरी घोषणा होईल अशी आशा होती. बजेट मध्ये उल्लेख झाला नसल्याने लाखो पेन्शनर नाराज झाले. लोकसभा निवडणूक पूर्वी निर्णय न झाल्यास सत्ताधारी पक्षांस मतदान करणार नाही असे दिसून येत आहे.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
==================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


Tuesday, January 30, 2024

विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नांतून पूर्ण होणार - राज्यपाल रमेश बैस


*पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,राजेंद्र बारवाले आणि विलास शिंदे यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभामध्ये डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी प्रदान*

*महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा ३७ वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात संपन्न*

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
सन 2047 चा विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नातून व या विद्यापीठातून पदवी घेतलेले कृषि पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्यानेच साकार करतील, असा विश्वास राज्यपाल तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला.

महात्मा फुले कृषि विद्यापीठात 37 व्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी स्नातकांना राज्यपाल रमेश बैस हे दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ट्रस्ट फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल सायन्सेस (टास) चे अध्यक्ष, भारत सरकारच्या कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे माजी सचिव तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मभूषण डॉ. आर.एस. परोदा, कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषचेदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. प्रदिप इंगोले, अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशीव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलिप पवार आणि विद्या शाखेचे

 उपकुलसचिव श्रीमती स्वाती निकम उपस्थित होते.
राज्यपाल रमेश बैस म्हणाल की, कृषि हा आपल्या

 देशाचा मुख्य आधार असुन 58 टक्के पेक्षा जास्त लोक कृषिक्षेत्राशी निगडीत आहेत. या कृषिक्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी कृषि विद्यापीठांची भूमिका महत्वाची असणार आहे. कृषि विद्यापीठातून केवळ पदवी घेतलेले पदवीधर विद्यार्थी नसुन तुम्ही नवपरिवर्तनाचे अग्रदुत आहात. महाराष्ट्राला कृषिची समृध्द अशी परंपरा लाभलेली असून ही परंपरा सर्मपक भावनेने जपण्यासाठी तुम्हाला संधी मिळालेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे जीवन पुर्णपणे शेतीवर अवलंबून आहे अशा लोकांचे जीवन समृध्द बनविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहनही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले.

    राज्याचे कृषि मंत्री तथा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती धनंजय मुंडे यांचा संदेश कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी वाचून दाखवला. त्यांच्या संदेशात कृषि मंत्री म्हणाले कृषि क्षेत्रात डिजीटल तंत्रज्ञानामुळे अधिक प्रगती होत आहे. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. सध्या कृषि क्षेत्र हे बदलत्या हवामानाला सामोरे जात आहे. या बदलत्या हवामानाला सामोरे जातांना शाश्वत शेतीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. मानद डॉक्टर पदवी मिळालेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले, विलास शिंदे व पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदनही केले.

डॉ. आर.एस. परोदा म्हणाले की, सन 2030 सालापर्यंत आपल्या देशात एकही गरीब नसणे व कोणीही उपाशी राहणार नाही हे सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे. त्याचबरोबर वातावरणातील बदलाला सामोरे जाणे, पाणी व जमीन या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास थांबविणे, सामाजिक व आर्थिक विषमता दुर करणे ही आपल्या समोरील मोठी आव्हाने आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी पायाभुत सुविधांचा विकास, नविन तंत्रज्ञान, पारदर्शक योजना व संस्थापक यंत्रणा या चार मुद्द्यांवर काम करावे लागणार आहे. भविष्यातील शेती ही डिजीटल तंत्रज्ञानावर आधारीत असणार आहे. विद्यापीठ आपल्या संशोधनामध्ये ड्रोन, आय.ओ.टी. व सेंसर्सवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करीत असून यातील संशोधनामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सुलभ होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.राज्यपाल तथा कृषि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या वतीने कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते राज्याचे महसल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले व विलास शिंदे यांनी कृषि क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले.

  यावेळी कुलगुरु डॉ. पाटील यांनी मानपत्रांचे वाच केले. 73 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 300 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 6 हजार 522 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 6 हजार 895 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पदवीदान समारंभात सन 2022-23 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेली कु. पुजा नवले, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली कु. ऐश्वर्या कदम, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेली कु. गौरी चव्हाण यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमप्रसंगी कृषिदर्शनी-2024, पौष्टिक तृणधान्य माहिती पुस्तीका, मफुकृवि आयडॉल्स व मफुकृवि दिनदर्शिका प्रकाशनांचे मान्यवरांच्या शुभहस्ते विमोचन करण्यात आले.कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. सुभाष पुरी, डॉ. राजाराम देशमुख, डॉ. तुकाराम मोरे, डॉ. के.पी. विश्वनाथा, डॉ. एम.सी. वार्ष्णेय, डॉ. शंकरराव मगर, डॉ. अशोक ढवण, डॉ. किसनराव
लवांडे, डॉ. संजय सावंत, डॉ. विलास भाले, श्री चंद्रशेखर कदम, माजी संचालक डॉ. किरण कोकाटे, डॉ. हरी मोरे, विद्या परिषद सदस्य, पत्रकार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग
प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विद्यार्थीनी व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई व डॉ. भगवान देशमुख यांनी केले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
========================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

पशुधनास ऑनलाईन टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीचे काम अभियान स्वरुपात राबवा - महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा
पशुधनास ऑनलाईन टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीचे काम अभियान स्वरुपात राबविण्याचे निर्देश राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथुन दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महसुल मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते.
महसुल मंत्री श्री विखे पाटील म्हणाले की, दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. परंतु या अनुदानासाठी पात्र पशुधनाच्या कानात टॅगिंग करुन भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी आवश्यक असल्याने या कामास गती देत अभियान स्वरुपात हे काम पुर्ण करण्यात यावे. शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या दुध अुनदानापासुन एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देशही महसुल मंत्री श्री विखे पाटील यांनी याावेळी दिले.

पशुधनास टॅगिंग व नोंदणीस शेतकरी, पशुपालकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत 21 हजार 325 पशुधन नोंदणी, 5 हजार 824 पशुपालक नोंदणी, 13 हजार 115 पशुपालक हस्तांतरण नोंदणी 1 हजार 772 पशुधनाच्या नोंदीत बदल, 585 कानातील टॅग बदल नोंदी, 1 हजार 782 पशुपालकांच्या नावातील बदल तसेच अतिरिक्त 50 हजार टॅग नव्याने उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती मंत्रीमहोदयांना दिली असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनिल तुंबारे यांनी कळविले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


मोक्षा चोपडा यांचा दीक्षा समारोह श्रीरामपुरात होणे मोठे भाग्य- ससाणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
मोक्षा चोपडा यांचा भगवती दीक्षा समारोह श्रीरामपूर मध्ये होणे मोठे भाग्याचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. श्रीरामपूर येथील जैन समाजातील प्रसिद्ध व्यापारी नेमीचंदजी माणकचंदजी चोपडा यांची नात व उद्योजक प्रशांत नेमीचंदजी चोपडा यांची कन्या मोक्षा चोपडा यांचा जैन भगवती दीक्षा समारोह श्रीरामपूर येथील थत्ते मैदान रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता संपन्न होणार आहे.

 श्रीरामपूर मधील जैन संघास ४० वर्षानंतर मोक्षा चोपडा यांच्या रूपाने जैन भगवती दीक्षा करण्याचे भाग्य लाभले आहे. श्रीरामपूर ची भूमी प्रभू श्रीराम, राष्ट्रसंत पु.श्री. आनंद ऋषीजी, कर्नाटक गजकेसरी गुरुदेव पु.श्री. गणेश मलजी महाराज साहब व अनेक संत साध्वीजी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. मोक्षा चोपडा यांच्या दीक्षा महोत्सवासाठी श्रीरामपूर नगरीमध्ये प. पू. प्रतिभा कंवर जी म. सा. यांचे आगमन झालेले आहे. याप्रसंगी मोक्षा चोपडा यांचा सत्कार माजी

 नगराध्यक्ष राजश्रीताई ससाणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मा. नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, मा नगरसेवक रमेश शेठ कोठारी,दिलीप नागरे, अशिष धनवटे,रितेश रोटे, सुहास परदेशी, प्रवीण नवले, मनसुख चोरडिया, रमेश गुंदेचा, नंदू कोठारी, जावेद शेख, सनी मंडलिक, युनुस पटेल, अजय धाकतोडे, गोपाल भोसले, विशाल साळवे, देवेन पिडीयार, आकाश जावळे, श्रेयस रोटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


Monday, January 29, 2024

लोकशाही सक्षम होण्यासाठी मतदार नोंदणी आवश्यक- प्रांतधिकारी किरण सावंत - पाटील


 - श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
भारतीय लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदार नोंदणी होणे गरजेचे आहे,कोणताही घटक दुर्लक्षित राहता कामा नये यांकरिता अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांनी दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करून दिव्यांग मतदार नोंदणीसाठी मोलाचे योगदान दिले, दिव्यांग व्यक्ती करिता त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.

मतदार नोंदणी केल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा अधिकार आपण वापरला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत - पाटील यांनी केले.

मतदार नोंदणी अधिकारी २२० श्रीरामपूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ संघ श्रीरामपूर,प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, राष्ट्रीय छात्र सेना,राष्ट्रीय सेवा योजना आणि सी.डी.जैन काॅलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा येथील सी.डी.जैन काॅलेज ऑफ कॉमर्स यांच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.
दिव्यांग मतदार जनजागृती अभियान राबवून दिव्यांग मतदार नोंदणीसाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्रीरामपूरच्या आसान दिव्यांग संघटनेला निवडणूक मित्र पुरस्कार संघटनेचे संस्थापक संजय साळवे व सचिव वर्षा गायकवाड यांना प्रांताधिकारी किरण सावंत पाटील,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,सी डी जैन काॅलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर,ॲड.प्रसन्ना बिंगी यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी. डी. जैन काॅलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पिंगळे यांनी केले तर आभार सौ. पाटील यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
=====================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Sunday, January 28, 2024

वाहन चालविताना आपल्यासह इतरांच्याही सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी - महेश देवकाते


*रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक नियम जन जागृतीकरीता पेण शहरात मोटार सायकल रॅली*

पेण प्रतिनिधी:
केंद्र सरकारच्या रस्ते सुरक्षा मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला पेण येथील बायपास रोड येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
ही मोटरसायकल रॅली पेणमधून काढण्यात आली होती. यामध्ये विविध खासगी, शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारीवर्ग तसेच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हेल्मेट घालून सहभाग घेतला होता. या वेळी पेण आरटीओ कार्यालयाच्या वतीने मोटरसायकल तसेच वाहन चालकांना वाहतुकीचे सर्व नियम पाळावे, असे सांगण्यात आले. तसेच या वेळी हेल्मेटचा वापर करणे, सिट बेल्ट लावणे, उजवी- डावी बाजू पाहणे, वेगावर नियंत्रण ठेवणे या सर्व गोष्टींचे पालन करणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. यावेळी बोलताना आरटीओ अधिकारी महेश देवकाते म्‍हणाले की, वाहनधारकांनी वाहन चालविताना आपल्यासह इतरांच्याही सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी. यामुळेच अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होतील. तसेच या अभियानाद्वारे विविध ठिकाणी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळूनच वाहने
 चालवावीत, असे त्यांनी सांगितले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, सहाय्यक अधिकारी माधव सूर्यवंशी, मोटार वाहन निरीक्षक शशिकांत तिरमे, अधिकारी अनिल बागवान, सुरेश तुरकणे, प्रशांत बच्छाव, सहायक वाहन निरीक्षक नंदन राऊत, दत्तात्रेय जगताप, अभिजित तेरी, जगनाडे, दिनेश शर्मा, समीर चव्हाण आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*