राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, February 8, 2024

श्रीरामपूर हद्दीतील न्याय मिळत नसल्याने टिळकनगर इंडस्ट्रीज विरोधात,दिनांक 08/02/2024 पासून आमरण उपोषण सुरवात


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - /वार्ता -
 श्रीरामपूर हद्दीतील प्रदुषणग्रस्थ भागात राहत असलेले शेतकऱ्यांचे आमरण उपोशन सुरवात 

 वरील विषयास अनुसरुन येते की, मौजे बेलापूर बु।। ता. श्रीरामपूर येथील प्रदुषणग्रस्थ भागात राहत असलेले शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सदरील टिळकनगर इंडस्ट्रीज मधून होत असलेल्या प्रदुषणामुळे विहीर-बोअर यांचे पाणी खराब झाले असून जमीन सन आंधाजे १९९७ सालापासून नापीक झालेल्या आहेत. दुषित पाण्यामुळे गुरे / जनावरे / शेळ्या आजारी पडुन मृत्युमुखी पडून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते तसेच सदर भागातील रहिवाशी देखील प्रदुषण व दुधीत पाण्यामुळे सत्तत आजारी होत असतात, लहान मुलांना तसेच वयोउद्ध माणसांना सतत शारीरीक समस्या निर्माण होत असतात. त्यांच्या आरोग्यात आपल्या कंपनीमुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता आम्हाला तात्काळ त्याची नुकसान भरपाई मिळावी तसेच अनेक वेळेस कागदी पत्री तक्रार दाखल करून ही शासन यंत्रणा डोळे झाक करीत आहे या अनुषंगाने उपोषणकरण्याचं वेळ पडली 

तसेच सदरचे प्रदुषणग्रस्थ भागामध्ये आपले संस्थेकडून कोणत्याही प्रकारची सुविधा पुरविण्यात येत नाही. तसेच प्रदुषणग्रस्थ भागात राहात असलेले शेतकरी यांना कोणत्याही कामासाठी आपले टिळकनगर इंडस्ट्रीजमध्ये कामावर प्राधान्याने कामावर घेतले जात नाही. याविषयी आपल्याला वारंवार तोडी/ लेखी विनंती करुनही कोणत्याही प्रकारचे सहकार्य प्रदुषणग्रस्थ भागात राहत असलेले शेतकरी यांना

प्राधान्याने त्या कामावर नियुक्त करुन घेण्यात यावे
अशी मागणी असून पुढील कारवाई न झाल्यास यापेक्षा ही त्री सवोरूपातिल आंदोलन करण्यात येईल 

पुढील आठ दिवसांत आपण याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्ही दि.०८/०२/२०२४ रोजी श्रीरामपूर येथे मेनरोडवर गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली . मग स्पष्टीकरण निवेदन मध्ये म्हटले होणाऱ्या सर्व बऱ्या वाईट परिणामास आपण जबाबदार राहाल याच असे अहवान केले 

=================================
-----------------------------------------------
:- विलास चांगदेव जाधव - संकलन- ✍️✅🇮🇳...
----------------------------------------------
=================================


जिल्ह्यात १६ फेब्रुवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू


अहमदनगर जिमाका वृतसेवा
जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये ३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.
शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.
शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेण्यास अथवा मिरवणूका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागु राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
=============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️🇮🇳✅
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


Tuesday, February 6, 2024

हरिगांव शाळेचा ५७ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा संपन्न

- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता

-हरिगांव शाळेचा ५७ वर्षांपूर्वीच्या*
*विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा संपन्न
तालुक्यातील हरिगांव येथील 
बेलापूर कंपनी हायस्कूल हरिगांवच्या १९६७ या वर्षीच्या एसएससी ग्रुप विद्यार्थ्यांनी तब्बल ५७ वर्षांनी हॉटेल ऋतुगंध पुणे येथील सभागृहात ४ फेब्रु.रोजी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. त्या जुन्या आठवणींना उजाळा देत हा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
बालपणी शाळेत रमणारे जिवलग मित्र, मैत्रिणी एव्हढ्या वर्षानंतर एखाद्या स्वप्नासारखे भेटतात. कोणाला सुना आलेल्या कोणी आजोबा - आजी झालेले,कोणी सासू सासरे अगदी ओळखू न येण्याइतके बदल झालेला असा हा अविस्मरणीय सोहळा रंगला. स्नेहमेळाव्याचे सूत्र संचालन ज्योती काळे यांनी केले व त्यांचे सहकारी यांनी सूत्रबद्ध नियोजन केले होते.सकाळी १० वाजल्यापासून त्यांची पाऊले येण्यास सुरुवात झाली.रंगदार आठवणी,अनुभव,मिळालेले प्रेम, एकमेकाबद्दलची आपुलकी, मैत्री आणि बरेच काही खुमासदार शैलीत अनेकांनी सांगितले. एकमेकांना मदत करणे हे सुद्धा या ग्रुपने केले.रावसाहेब आदिक, नीलकंठ गायकवाड,विजय गंधे, भागवत मुठे,सखाराम डिके,उत्तम राजगुडे, श्रीराम कुलकर्णी आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शुभांगी जोशी, अंजली कुलकर्णी आदीच्या कविता सादर केल्या.सुचेता कुलकर्णी यांच्या सुरेल गाण्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा स्वाद गप्पा मारता मारता घेतला.समारोप वेळी सर्वांनी चहा घेऊन आठवणींचा सुगंध साठवून ठेवण्यासाठी आपापल्या घरी परतले.या आठवणी बाबासाहेब चेडे यांनी छायाचित्रणाने टिपल्या. आभारप्रदर्शन श्रीराम कुलकर्णी यांनी केले.

=================================-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

कवी अय्युब पठाण लोहगांवकर यांचा, "कष्टाचा वाटा" बालकथासंग्रहाचे प्रकाशन करतांना कवी सुरेश सावंत, बाबा भांड यांच्यासह मान्यवर दिसत छायाचित्रात दिसत आहेत.


- छ्त्रपती - संभाजीनगर  - / प्रतिनिधी -
विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठाण आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा आणि संभाजीनगर येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने १ ले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनात प्रसिद्ध साहित्यिक अय्युब पठाण लोहगांवकर यांचा बाल मनावर संस्कार करणारा दर्जेदार बाल- किशोर- कुमारासाठी वाचनीय असलेला "कष्टाच्या वाटा" या बाल कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच नांदेड येथील प्रसिध्द बालकवी डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. 
यावेळी व्यासपीठावर संभाजीनगर म.सा. प. चे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, उपाध्याक्ष किरण सगर, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे,प्रसिद्ध बाल साहित्यिक बाबा भांड, प्रा.संतोष तांबे यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी संमेलनात सहभागी साहित्यिक, विविध शाळेचे विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Monday, February 5, 2024

केवळ आपल्या वॉर्डापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण मुकुंदनगर परिसरातील विविध विकास कामात अग्रेसर असणारे नगरसेवक समदखान


- अहमदनगर -  प्रतिनिधि -/ वार्ता -
अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरातील रस्ते, वीज,पाणी, गटारी आदि अशा मुलभूत नागरी समस्यांकडे कटाक्षाने लक्ष देत नगरसेवक समदखान यांनी वेळोवेळी लक्ष केंद्रित केल्याने
सदरील परिसरातील विविध विकास कामे ही अतिशय उत्कष्ट झाली असून या भागात गेल्या अनेक वर्षांपासून धड सोयीचे रस्ते नव्हते, पिण्याच्या पाण्याची पावसाळ्यातसुद्धा पाणी टंचाई भासत होती. रस्त्यांवरुन पायी चालणे देखील मोठे दुरापास्त झाले होते. सांडपाणी आणी केरकचरा नेहमीच रस्त्यावर दिसायचा यामुळे दुर्गंधी निर्माण होवून डास - मच्छरांचा उपद्रव्य वाढून नागरीकांना मोठा त्रास व्हायचा, परंतु नगरसेवक समदखान यांनी सदरील बाबी कटाक्षाने लक्ष केंद्रित केल्याने तथा या भागातील विकास कामांकडे जातीने लक्ष दिल्याने हे प्रश्न आज सुटले आहे. 
परिसरातील आणखी काही भागात रस्ते, गटार, पाणी आदि समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक समदखान नेहमी अग्रेसर आहेतच,तथा 
नगरसेवक समदखान हे सामाजिक, राजकीय, धार्मिक कामात नेहमी अग्रेसर असतात. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या गैरहजेरीत म्हणजेच गेली दोन वर्ष ते तुरुंगात असताना काही रस्ते मंजूर झाली होती.मात्र समदखान हजर नसल्याने काही महाभागांनी त्याचाच गैरफायदा घेत तो निधी इतत्र हलविण्याचा घाट घातला होता, परंतु ते पुन्हा परत आल्यावर सदरील कामी मंजूर झालेला निधी त्यांनी खेचून आणला व ज्या रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर होता, त्याच रस्त्यांसाठी तो निधी वापरण्यास भाग पाडून सदरील रस्त्यांची विकास कामे करण्यात आली.
मुकुंदनगरमध्ये केवळ आपल्या वॉर्डापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण परिसरातील सामाजिक, राजकीय व धार्मिक कामे करत असलेले नगरसेवक म्हणून समदखान यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. 
ते कधीच केवळ मतांसाठी कामे करीत नसून त्यांच्या काळात हा परिसर अतिशय सुंदर व स्वच्छ व्हावा अशी त्यांची इच्छा/अपेक्षा आहे व असते, त्यांच्या अशा या परोपकारी स्वभावामुळे त्यांना अनेक जण अनेक संस्थेवर नेहमी विराजमान करीत असतात. ते स्वतः कधीही कोणत्याही पदासाठी उत्सुक नसतात,परंतु त्यांना मुकुंदनगर परिसरातील जनताच पुढे करीत असतात. त्यांच्या कामाची पद्धत अतिशय चांगली असल्याने जनतेचे त्यांना नेता म्हणून मान्य केले आहे. कारण ते सलग तिसर्‍यांदा नगरसेवक झाले आहे. ते नेहमी गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी तसेच शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत. आजही ते स्वतः रस्त्यांची कामे सुरु असताना समक्ष दिवसंरात्र बसून काम करुन घेत आहे. त्यांच्या एक मोठी खुबी आहे की त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातून देखील ते विकास कामात लावतात असे दिसून आले व आहे. 
ख्वाँज गरीब नवाज मस्जिद ते दर्गादयारा रोड, राजकोट चाळीतील रस्त्याचे काँक्रेटीकरण चालू असून स्वतः सकाळी व सायंकाळी प्रसिद्धीसाठी नव्हे तर खरोखरच रस्त्यावर पाणी मारण्यास हजर राहून स्वतःही मारतात हे त्या भागातील जनताच सांगेल असे खरे चित्र आहे. हाच रस्ता गेल्या दोन वर्षापासून खोदून पडलेला होता. या रस्त्यासाठी निधीही मंजूर झाला होता. परंतु ते एका प्रकरणात नाहक गुंतल्याने तुरुंगात होते. त्याचाच गैरफायदा घेवून काही महाभागांकडून सदरील वॉर्ड विकास कामांचा निधीही पळविण्यात आला होता. परंतु त्यांनी पुन्हा पाठपुरावा करुन तो निधी खेचून आणला व आज या रस्त्यांची कायमची दयनिय अवस्था दूर झाली आहे. ज्या भागात त्यांना मते पाहिजे आहे अशा भागातच नव्हे तर संपूर्ण परिसरातील रस्ते, वीज, पाणी, कचरा आदि प्रश्न सोडवित आहे. यामुळेच ते या परिसरात लोकप्रिय नगरसेवक समदखान म्हणून ओळले जात आहे. त्यांच्या कामांची हातोटी सर्वांपेक्षा खूप वेगळी आहे. समाजासाठी नेहमी झटत असतात, राजकारणासाठी सतत लढत असतात, धार्मिक कामात नेहमी अग्रेसर असणारे नगरसेवक समदखान हे टक्केवारीवर काम न करणारे नगरसेवक म्हणून त्यांची अनोखी ओळख निर्माण झालेली आहे. त्यांच्या या कामामुळे अनेकांनी अभिनंदन केले असून ते मिडीयातही प्रसिद्धीसाठी येत नाही. कधीही ते मिडीयासमोर मी केलेल्या कामाची वाव करीत नाही. किंवा श्रेयही घेत नाही. त्यांची एकच ख्याती आहे की, मुकुंदनगर परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा भाग कोणताही असो विकासाची कामे झाली पाहिजे हाच एकमेव ॲंजेडा असतो. सामाजिक, राजकीय कामात तर विरोधक असतातच; पण समदखान यांची कामे चांगली असल्याने जनतेने त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. नागरिकांच्या व गोरगरिबांच्या समस्या नेहमी सोडविण्यात ते अग्रेसर असतात. खॉजा गरीब नवाज मस्जिद समोरील राजकोट चाळ रस्त्यांचे काँक्रेटीकरण स्वतः उभे राहून करुन घेत असल्याने लवकर मुकुंदनगरवासियांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार आयोजीत करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

=================================
-----------------------------------------------
*जी.एन.शेख- अहमदनगर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर- *9561174111*
-----------------------------------------------
=================================


Saturday, February 3, 2024

जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा**व कोषागार दिन उत्साहात साजरा

*अधिकारी, कर्मचाऱ्यांनी*
 *उत्स्फुर्तपणे केले रक्तदान*

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा व कोषागारे दिन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
संचालनालयातील विविध घटकांना एकत्र आणुन बंधुत्वाची भावना वाढीस लागण्याबरोबरच कोषागार कार्यालयाच्या प्रगतीला चालना मिळावी या उद्देशाने येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे नियंत्रक सदाशिव पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन धस, विशाल पवार, स्थानिक निधी लेखा परिषदेचे सहायक संचालक बाबासाहेब घोरपडे जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव भोसले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी मनोगतात कोषागाराचे प्रशासनातील महत्व सांगत लेखाविषयक काम पहाणाऱ्या प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी लेखाविषयक काम करताना आपल्या कामात अचूकता ठेवावी, यासाठी सर्व वित्तीय नियमांचा अभ्यास केला पाहिजे, असे सांगितले. कोषागारातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबतही अभिनंदन केले. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
यावेळी जिल्हा कोषागार कार्यालय व जिल्हा कोषागार कर्मचारी संघटना यांच्यावतीने भव्य अशा रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबीरामध्ये सहभाग नोंदवत उत्स्फुर्तपणे रक्तदानही केले.
कार्यक्रमास लेखा व कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
===========
*सहयोगी*
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------=================================


नवीदिल्ली येथे इपीएस ९५पेन्शनधारकांचे आंदोलन सुरु


श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
इपीएस ९५ पेन्शनधारकांचा पेन्शनवाढीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला नसल्याने तीन दिवसांपासून नवी दिल्ली जंतर मंतर येथे राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली शृंखला अनशन सुरु असून त्यात उमाकांत सिंग अध्यक्ष लखनौ,सौ.सरीता नारखेडे संघटक महिला आघाडी, पी.एन.पाटील राष्ट्रीय सल्लागार, कमांडर अशोकराव राऊत राष्ट्रीय अध्यक्ष, रमाकांत नरगुंड समन्वयक, सुभाषराव पोखरकर संघटक पश्चिम भारत, सुरेश डंगवाल संघटक उत्तर भारत. दिल्ली येथील आंदोलन राज्य वार पेन्शनर सहभागी झाले असून आज उत्तर प्रदेशातील ४०० चे वर पेन्शनर सहभागी झाले होते. गुरुवारी जाहीर झालेल्या बजेट मध्ये देशाभरातील ७० लाख पेन्शनधारकांचा प्रश्न मार्गी लागून काहीतरी घोषणा होईल अशी आशा होती. बजेट मध्ये उल्लेख झाला नसल्याने लाखो पेन्शनर नाराज झाले. लोकसभा निवडणूक पूर्वी निर्णय न झाल्यास सत्ताधारी पक्षांस मतदान करणार नाही असे दिसून येत आहे.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
==================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================