राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, August 4, 2024

निळकंड मधुकर पाटील यांचा टाटा हिताची कंपनी विरोध आमरण उपोषण सुरु


 - अविनाश भोसले - पत्रकार - 
- संभाजी नगर - औरंगाबाद - / वार्ता -
नमस्कार मित्रानो मी निळकंठ मधुकर पाटील....राहणार गोंदुर गाव धुळे.... मी १३.०३.२०२४ ला टाटा हिताची चे एक्स २१५ एलसी पोकलांड घेतले असून ते फक्त 348 तासावर बंद झालं आहे ते आज रोजी 3महिन्या पासून बंद आहे...टाटा हिताची च्या हॉफिसे ला सांभजी नगर ला 4 वेड येऊन वेड्यात कडल आज शनिवार पासून आलो आहोत तर आमच्या कडे कुणीही लक्ष देत नाही आहे....तरी मे माझ्या भावाना मदतीची हाक मागत आहे...जर कुणी संभाजी नगर ला असेल तर प्लझ मदत करा मोबली नो ९६८९७३३४९५


अॅड. श्री चंद्रकांत मोहन येशीराव ऑफिस-नरिमन पारशीची चाळ रेल्वे स्टेशन रोड, धुळे. मो.नं.9422789642
दि. 12/07/2024

रजिस्टर नोटीस

1) proprietor/directors, Tata Hitachi Constuction Machinery Company Private Limited Registered Office: jubilee Building 45 Museum Road Bangalore 560 025

2) Manager, Autobahn Trucking Corporation PVT LTD industrial Area, Shendra Fire Station, Shendra MIDC Plot p-5, Sujakini Commercial Complex AURANGABAD-AURANGABAD 431007

3) Manager, Autobahn Trucking Corporation PVT LTD AutobahnA-Dhule Plot No.09 Mumbai-Agra national high- way Dhule-Dhule 424001

यांना आमचे अशिल श्री. निळकंठ मधुकर पाटिल राहणार-मु.पो. गोंदुर ता. जि. धुळे यांनी दिलेल्या लेखी व तोडि माहितीच्या आधारे व दाखवलेल्या कागदपत्रानुसार आणि प्रधान केलेल्या अधिकारावरुन आपणांस सदरच्या रजिस्टर नोटिस व्दारे कळविण्यात येते की,

1) आमचे अशिल श्री. निळकंठ मधुकर पाटिल हे उपरोक्त पत्त्यावर राहत असुन त्यांना शेतीपुरक व्यवसाय करावयाचा होता. म्हणून त्यांनी पोकलॅन्ड मशिन घेण्याचे ठरविले याबाबत शोध घेतला असता त्यांना हिताची कंपनीबद्दल माहीती मिळाली. यानंतर श्री. तुषार पाटिल-हिताची कंपनीचे सेल्स मॅनेजर यांनी भ्रमणध्वनीवरुन तक्रारदारांशी संपर्क साधला यावेळी त्यांनी हिताची कंपनीचे पोकलॅन्ड मशीन सर्वांत चांगले असून या कंपनीचे

सर्विस स्टेशन धुळ्यात आहे यामुळे तक्रारदारांना जलद व चांगली सेवा मिळेल असे सांगितले. तसेच तुम्हाला तात्काळ कर्ज प्रकरण करुन देऊ असे आश्वासन आमच्या अशिलांना दिल्यामुळे आमचे अशिल खुश झाले.

इतर कंपनीपेक्षा आमचे हिताची कंपनीचे मशीन चांगले आहे व उत्कृष्ट सेवा दिली जाते यानंतर श्री. तुषार

पाटिल हे आमचे अशिलांना धुळे येथे भेटण्यासाठी आले. यावेळी त्यांनी पुन्हा हिताची कंपनी पॉकलॅन्ड मशीन बाबत माहिती दिली व हेच मशीन घेण्याबाबत आग्रह केला यावेळी श्री. तुषार पाटिल यांनी सांगितले, माझ्या ओळखीचे व खात्रीचे पॉकलॅन्ड मशीनला अॅटेचमेन्ट करुन देणारे श्री. चेतन पाटिल आहेत, त्यांची अटेचमेन्ट चांगली असते व पॉकर्लन्द मशीनला सुट करते. ही सर्व माहिती सांगितल्यामुळे आमच्या अशिलांनी हिताची

कंपनी पॉकर्लन्ड मशीन घेण्याचे ठरविले. त्यानुसार सर्व कागदपत्रे श्री. तुषार पाटिल यांना दिले. कर्जाची संपूर्ण प्रक्रिया श्री. तुषार पाटिल यांनी करुन दिली यावेळी सांगितले की कंपनी पॉकलॅन्ड मशीन घरपोच पाठवून बेईल

Scanned with CamScanner

पण तुम्हाला अँटेचमेन्ट करावयाचे असल्यामुळे व मी तुम्हाला त्यातील योग्य व तज्ज्ञ व्यक्ती देत असल्यामुळे आम्ही तुमचे पॉकलँन्ड मशीन डायरेक्ट सोनगिर येथील श्री. चेतन पाटिल जे अटेचमेन्ट बाबत चे तज्ञ आहेत. यांच्या वर्कशॉपला पाठवुन देतो असे सांगितले. व ठरल्यानुसार दि. 23/2/24 रोजी आमचे अशिलाचे पॉकलॅन्ड मशीन अटेचमेन्टसाठी श्री. चेतन पाटिल यांच्याकडे पोहचवुन दिले. श्री. चेतन पाटिल पॉकलॅन्ड मध्ये अटेचमेन्ट करुन आमच्या ताब्यात दि. 13/3/24 रोजी त्यावेळी हिताची कंपनीचे सर्विस इंजिनियर श्री.आर.पी चौधरी हे सुध्दा उपस्थित होते. यावेळी श्री. आर. पी चौधरी यांनी पॉकलॅन्ड मशीन व अटेचमेंट नियमाप्रमाणे योग्य असल्यामुळे श्री.आर.पी चौधरी सर्विस इंजिनियर यांनी वॅरंटी प्रमाणपत्र भरून आम्हास दिले. याचवेळी त्यांनी लॉगबुक देखील भरून दिले. या दोन्ही कागदपत्रांवर श्री. आर. पी चौधरी यांची सही आहे

मशीन विकत घेण्यापुर्वी हिताची कंपनी सर्विस मॅनेजर श्री. तुषार पाटिल यांनी आमच्या अशिलांना

सांगितले की हिताची कंपनी पॉकलॅन्ड मशीन । वर्ष वॉरंटी असेल तसेच टोटल ऑपरेटिंग तास हे 2000 तास

असतील. तसेच दि 13/3/24 श्री.आर.पी चौधरी यांनी extend warranty प्रमाणपत्र सुध्दा आम्हास दिले.

यानुसार आम्ही घेतलेले ex215LC model extended warrnty-2 वर्ष व 5500 तासांची होती व आहे सदर मशीनची किंमत रू. 72,00,000/- (बहात्तर लाख रू मात्र होती)

यानंतर आमचे अशिल यांनी विविध ठिकाणी पॉकलॅन्ड मशीन व्दारे काम सुरू केले. दि. 12/4/24 रोजी आमच्या अशिलाचे मशीन पहिल्या शंभर तासातच बंद पडले होते. पॉकलॅन्ड मशीनच्या बकेट सिलेंडरचा वर्किंग पॉब्लेम सुरू झाला म्हणुन आमच्या अशिलांनी हिताची कंपनी सर्विस स्टेशन मॅनेजर श्री. वेद्य यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क साधला. श्री. वेद्य यांनी श्री. आर.पी चौधरी सर्विस इंजिनियर यांना धुळे येथे पाठविले श्री. चौधरी यांनी मशीनची तपासणी केली सिलेंड फेल आहे असे सांगितले नविन सिलेंडर टाकावे लागेल असे सांगितले. आमच्या अशिलांनी हो म्हटले दि. 13/4/24 ला त्यांनी नविन सिलेंडर टाकुन दिले. मशीन सुरु करुन दाखविले यानंतर आमच्या अशिलांचे मशीन दि.8/5/24 रोजी पहिल्या शंभर तासातच बंद पडले होते. त्यानंतर आमच्या अशिलांचे मशीन पुन्हा 248 तासांनी वर्कीग बंद झाले. पुन्हा आमच्या अशिलांनी श्री. वैद्य अधिकृत सर्विस सेंटर हिताची कंपनी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी पुन्हा सर्विस इंजिनियर श्री. आर. पी चौधरी यांना तपासणी दि. 12/5/24 रोजी पाठविले श्री. चौधरी यांनी मशीन तपासले. मात्र मशीन मधला दोष लक्षात आला नसल्यामुळे श्री. चौधरी त्यांच्या सोबत इतर इंजिनियर यांनी सतत सतत आठ दिवस तक्रारदारांचे मशीनची तपासणी केली व दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर मशीन दुरुस्त झाले नाही. म्हणुन श्री. चौधरी यांनी सांगितले की आम्ही वरिष्ठांशी बोलून मुंबई येथील तज्ञ व्यक्तीची टिम मशीन दुरुस्तीसाठी बोलावुन घेत आहोत. त्यानुसार दोन दिवसानंतर मुंबईहुन श्री. पवन इंजिनियर व इतर टिम हजर झाली. त्यांनी मशीन तपासले व मशीन दुरुस्त करुन दिले. यावेळी इंजि. पवन यांनी सांगितले की तुमच्या मशीन मध्ये बकेट सिलेंडर internal failure मुळे मशीन मध्ये लोखंडाचा किस असु शकतो यामुळे संपुर्ण हायड्रोलिक मशीन प्रणाली संपुर्ण साफ-सफाई करण्याचे सांगितले व त्याप्रमाणे आमच्या अशिलांनी मशीनचे संपुर्ण ऑईल बदलुन व मशीन मध्ये असलेले सर्व प्रकारचे फिल्टर पुर्णपणे बदलविण्यास सांगितले. व त्यानुसार कंपनीने औरंगाबादवरुन तज्ञ लोकांची टीम पाठवली व त्यांनी आमच्या अशिलाचे संपुर्ण मशीनचे ऑईल व फिल्टर बदलले यावेळी त्यांनी आमच्या अशिलास सांगितले की आता या पुढे मशीन मध्ये कुठल्याही प्रकारचा problem येणार नाही.

यानंतर मशीन पुन्हा 8/6/24 रोजी 355 तासावर बंद झाले असता तक्रारदारांनी पुन्हा अधिकृत सर्विस सेंटरचे श्री. मंगेश वैद्य यांच्याकडे तक्रार केली, यावेळी पुन्हा. तज्ञ व्यक्तीची टीम पाठविण्यात आली. या टिमने धुळे येथे येवुन मशीनची तपासणी केली असता, दोन बुम सिलेंडर व कंट्रोल खराब झाल्याचे सांगितले, या सर्व वस्तु नविन टाकाव्या लागतील यासाठी जो खर्च येईल तो आमच्या अशिलांना करावा लागेल हे सांगितले. यानंतर कंपनीने तक्रारदारांना रु. 12,32,524/- (बारा लाख बत्तीस हजार पांचशे चोवीस रू मात्र) कोटेशन पाठविले व

रकमेची मागणी केली

कॅमस्कॅनरने स्कॅन केले

त्यावेळेस आमच्या अशिलांनी संबधितांना सांगितले की आमचे मशीन हे वॉरंटी पिरियड मध्ये आहे. तरी आपण पैसे का पेड करावेत, अशी विचारणा केली असता संबधितांनी उडवाउडवीची उत्तरे देवुन आमच्या अशिलाचे मशीन दुरुस्त करुन दिले नाही. त्यामुळे आमच्या अशिलांचे मशीन सुमारे पसतीस ते चाळीस दिवसापासुन बंद आहे. त्यामुळे आमच्या अशिलांचे आर्थिक नुकसान होत आहे. आपल्या या कृतीमुळे तक्रारदारांचे सुमारे रू.

15,00,000 (पंधरा लाख रु मात्र) नुकसान झाले आहे.

नियम व कायद्याप्रमाणे आमच्या अशिलांनी पोकलॅन्ड मशीन घेतल्या नंतर तात्काळ जी.पी. एस सिस्टीम

सुरु करणे गरजेचे व बंधनकारक होते. आमच्या अशिलाच्या मोबाईलमध्ये जी.पी.एस सिस्टीम इंन्स्टाल करुन देण्याची आपली सर्वांची जबाबदारी होती व आहे. आमच्या अशिलाचा आमच्या अशिलाच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करुन दिलेली नाही. सदर आपली कृती सदोष सेवा व अनुचित व्यापारि प्रथेचा अवलंब मोडते. आपल्या कृतीमुळे तक्रारदारांना प्रचंड मानसिक त्रास, शारिरिक त्रास, व आर्थिक नुकसानासी सामोरे जावे लागले आहे.

आमच्या अशिलांचे मशीन दि.8/6/24 रोजी पासुन शेतकरी श्री. संजय देवरे राहणार-बोरीस ता. जि.धुळे येथे शेतामध्ये बंद पडलेले आहे. यामुळे शेतकरी श्री. देवरे यांना पेरणी करता आलेली नाही. त्यामुळे शेतकरी देवरे हे आमच्या अशिलाकडे नुकसान भरपाईची मागणी करीत आहे. यासही सर्वथा आपण सर्व वैयक्तीक व संयुक्तिक रित्या जबाबदार आहात. कृपया याची नोंद घ्यावी.

आमच्या अशिलांना आपण जे पोकलॅन्ड मशीन विकलेले आहे. ते घेतल्यापासुन अनेक वेळा नादुरुस्त झालेले आहे. ते वारंवार दुरुस्त करावे लागले आहे. सदर बाब पाहता आपण आमच्या अशिलास विकलेल्या मशीनमध्ये उत्पादित दोष असल्याचे आमचे ठाम मत झाले आहे. आमचे अशिलांचे मशीन सध्यस्थितीत बंद पडलेले आहे. आपण

उत्पादित दोष असल्याचे आमचे ठाम मत झाले आहे. आमचे अशिलांचे मशीन सध्यस्थितीत बंद पडलेले आहे. आपण दुरुस्तीसाठी व काही वस्तु नविन टाकण्यासाठी रु. 12,32,524/- (बारा लाख बत्तीस हजार पाचशे चोवीस रू मात्र) कोटेशन आमच्या अशिलांना पाठविलेले आहे. सदर कोटेशन पाहून आमच्या अशिलांना मानसिक धक्का बसलेला आहे. आमच्या अशिलाचे मशीन आपण सांगितल्यानुसार व आपण दिलेल्या कागदपत्रानुसार वॅरंटी पिरीयड मध्ये होते व आहे. असे असताना आपल्या उपरोक्त रक्कमेची मागणी ही बेकायदेशीर आहे व आमच्या अशिलांच्या कायदेशीर हक्कांचे उल्लघन करणारी आहे.


सबब म्हणुन आमच्या अशिलांना आपणांस कायदेशीर नोटिस देणे भाग झालेले आहे. सदरची कायदेशीर नोटिस आपणांस रजिस्टर पोस्टाव्दारे व ई-मेल व्दारे पाठविण्यात येत आहे. सदरची नोटिस मिळताच पंधरा दिवसाच्या आत आपण आमच्या अशिलांना उत्पादित दोष असलेले मशीन बदलुन द्यावे किंवा मशीनची किंमत व्याजासह अदा करावी. आमच्या अशिलाचे झालेले आर्थिक नुकसान तसेच मानसिक, शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आमचे अशिल आपल्या विरुध्द दिवाणी व फौजदारी स्वरुपाची कारवाही करतील व त्याच्या होणाऱ्या खर्चाची व परिणामाची संपुर्ण जबाबदारी आपली असेल याची नोंद घ्यावी.

सदर नोटिस चा खर्च रु. 15,000/- (पंधरा हजार रु मात्र) देण्यास आपणच जबाबदार आहात याची नोंद घ्यावी सदर नोटिस ची मुळप्रत आपणांस पाठवुन स्थळप्रत आमचे दप्तरी पुढिल कारवाहीस्तव ठेवली असे. कळावे येणे प्रमाणे नोटिस असे,

धुळे दिनांक 12/07/2024 श्री. निलकंठ मधुकर पाटील नोटीस देणार
अॅड. चंद्रकांत मोहन येशीराव
नोटीस देणार तर्फे अॅडव्होकेट
चंद्रकांत मोहन येशीराव
अधिवक्ता
रेल्वे स्टेशन, धुळे.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================








योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वावलंबी बनावे


मिलिंदकुमार साळवे यांचे प्रतिपादन ; महिलांना प्रमाणपत्र वाटप

 - श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत महिलांच्या उन्नतीसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत स्वावलंबी बनावे, अशी अपेक्षा सल्ला मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी व्यक्त केली.
श्रीरामपूर पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. सहायक गटविकास अधिकारी उस्मान शेख अध्यक्षस्थानी होते. बचत गटांतर्गत काम करणाऱ्या महिलांसाठी शेळीपालन प्रशिक्षण वर्गाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ३५ महिलांना यावेळी सहायक गटविकास अधिकारी शेख, साळवे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. डॉ. महेश्वर गुंड यांनी हे प्रशिक्षण दिले. महिला बचत गटांचे प्रभाग समन्वयक किरण शेरे, अशोक रासकटला यांची प्रमुख उपस्थिती होती. बचत गटांच्या प्रशिक्षण सल्लागार शालिनी ससाणे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी मिलिंदकुमार साळवे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विविध घटकातील महिलांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवित आहेत. फक्त अनुदानाचा लाभ न मिळविता योजनांच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगार सुरू करून समाजात ताठ मानेने स्वतःच्या पायावर उभे राहत स्वावलंबी बनून इतर महिला भगिनींसमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. 
प्रमाणपत्र प्राप्त महिलांना पंचायत समितीच्या वतीने नरेगा योजनेंतर्गत जॉबकार्ड दिले जाणार आहेत, असे पंचायत समितीच्या रोहयो विभागाचे अधिकारी किशोर साळवे यांनी सांगितले. तसेच गाय, शेळीपालन व्यवसाय व त्यासाठी आवश्यक गोठा यासाठी अनुदान, कर्ज मिळवून देण्यासाठी मदत व मार्गदर्शन करण्यात येणार आहे,असे शालिनी ससाणे व शेरे यांनी सांगितले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================






Friday, August 2, 2024

मख़दुम सोसायटी,रहेमत सुलतान फाउंडेशन व मराठा सेवा संघ तर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप


मुलांनी पालकांना व्यसनापासून
 रोखावे- युनूस तांबटकर 

- अहमदनगर - प्रतिनिधी - / वार्ता -
युवा पिढी दिवसां दिवस तंबाखू गुटखा मावा धुम्रपानाच्या मोठ्या प्रमाणात आहारी जात आहे. व या व्यसनामुळे पिढी जीवनाला मुकत आहे. त्यांचे कुटुंबे उघडी पडत आहे. तरी युवक व्यसन सोडत नाही असे निदर्शनास येत आहे. तरी त्यांच्या मुलांनी घरामध्ये आपल्या पालकांना व्यसनापासून रोखण्याचे धाडस करून त्यांना आग्रह करून व्यसनापासून रोखावे असे आवाहन रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष व व्यसनमुक्तीचे प्रवक्ते युनुसभाई तांबटकर यांनी केले.
मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, रहेमत सुलतान फाउंडेशन व मराठा सेवा संघाच्यावतीने व संजय झिंजे, आर्किटेक्ट अर्शद शेख, निलेश महाजन, सुनील रोजमॅन, अभिजीत गायकवाड, प्रफुल्ल सोनवणे, नरेश पेवाल आदी दानशुरांच्या सहकार्याने छावणी परिषदेच्या महात्मा गांधी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, मुबीना बाजी, सुमैय्या सय्यद आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना युनुस भाई म्हणाले की व्यसनाने संपूर्ण जगाला आपल्या विळाख्यात घेतलेले आहे. त्यामध्ये भारतात तर जास्तच व्यसनतेचे प्रमाण वाढत चालले आहे. व त्याचे परिणाम दिर्घ काळापर्यंत भोगावे लागत आहे. तरी या व्यसनाचे नाद कसे संपवता येईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मूबीना बाजी यांनी केले. तर सुमैय्या सय्यद यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक यावेळी मोठी निर्णायक ठरणार !


शहरासह तालुकाभर मोठी चर्चा
 विश्वनाथ निर्वाण हेच भारी भरणार !!

*श्रीरामपूर विधानसभेसाठी* 
*इच्छूक उमेदवार परिचय !*

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/वार्ता -
राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे उभ्या ठाकल्या असल्याने काही राजकीय पक्षाच्या पक्षश्रेष्टींनी उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.यामध्ये २२० श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ (अ.जा.) राखीव असल्याने अनेक इच्छुक उमेदवार आपले नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. मात्र श्रीरामपूरकर नवीन उमेदवाराच्या शोधात की पुन्हा तोच उमेदवार निवडून देणार याबाबच शहरासह संपूर्ण तालुक्यातील चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
 श्रीरामपुर विधानसभा मतदार संघात २०२४ च्या या श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीवर अनेकांनी दावे सांगितले आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने विद्यमान आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, हेमंत ओगले, मिलींदकूमार साळवे, सदा लोखंडे, विश्वनाथ निर्वाण यांनी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नही चालु केले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने श्री. विश्वनाथ निर्वाण हे उच्चशिक्षित तथा महावितरण मध्ये वर्ग १ चे अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या पत्नी पोलिस अधिक्षक कार्यालयात कार्यालयीन अधिक्षक आहेत. मुलगी आरटीओ या पदावर आहे.यासोबतच सर्व जातीधर्म व विविध पंथांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबध आणि सामाजिक कार्य देखील मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनी श्रीरामपूर विधानसभेची उमेदवारी करावी म्हणून कार्येक्षेत्रातील मोठ्या संख्येने सुज्ञ मतदारही आग्रही आहेत. याबरोबरच 
सामाजिक कार्यात त्यांचा सातत्याने मोठा पुढाकार असल्याने आजवर विविध सामाजाभिमुख उपक्रम त्यांनी राबवले आहे तथा राबवित आहे,अनेक तरुणांना त्यांनी विविध खात्यात नोकरी लावण्याकामी मोठी महत्वाची भुमिका बजावलेली आहे. तसेच त्यांनी आपले श्रीमती गंगुबाई निर्वाण सामजिक सेवा प्रतिष्ठान सुरु करुन या माध्यमातून मुलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण, महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे, शिक्षणाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी प्रयत्न करणे, उद्योग, व्यापार, शेतकरी, विद्यार्थी यांना देश, विदेश घडामोडींची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी informatin technology, internet, computer पार्क सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तथा राज्य आणी केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना लोकापर्यंत नेल्या आहे, रक्तदान शिबिर, व्यसनमुक्तीचा प्रसार, विवाह समुपदेशन ,ग्रामीण भागातील शेकऱ्यांना सेंद्रीय शेती, गांडूळ खत निर्मिती करणे, जलसंधारण,पाणी, वीज,पाणी आडवा पाणी जिरवा,या योजनांची माहिती घरोघर दिली आहे. श्रीरामपुर कर नवीन उमेदवाराच्या शोधात असल्याने श्री. विश्वनाथ निर्वाण यांना ८६ गावातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.ते मुळात शेतकऱ्याचे सुपूत्र असल्याने त्यांना गरिबीची जाण आहे. करीता येत्या श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीत भावी आमदार म्हणून विश्वनाथ निर्वाण हेच योग्य उमेदवार ठरतील अशी श्रीरामपूर शहरासह तालुक्यात व राहुरी तालुक्यातील, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ संघात येत असलेल्या प्रत्येक गावांच्या जनमाणसातून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे असल्याचे दिसून येते आहे.करीता श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक यावेळी मोठी निर्णायक ठरणार आणी विश्वनाथ निर्वाण हेच भारी भरणार असल्याचे चित्र आज तरी दिसून येत आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


Thursday, August 1, 2024

समता कार्यालयात रविवारी नवोदित संपादकांसाठी मिटिंगचे आयोजन !


- अजिजभाई शेख -  राहाता - / वार्ता -
स्वाभिमानी संपादक सेवा संघ प्रणित स्वाभिमानी प्रसार माध्यम समुहातील नवोदित संपादकांसाठी श्रीरामपूर येथील वॉर्ड क्रं १, कॉलेज रोडवरील समता कार्यालयात रविवार दि.४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदित संपादकांसाठी मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे.
या मिटिंगमधील मुद्दे पुढील प्रमाणे आहेत,
१) सध्या प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून वर्तमानपत्र प्रोसेस मध्ये करण्यात आलेले बदल तथा नवीन प्रोसेस ची माहिती.
२) वर्तमानपत्र वार्षिक विवरण,आणी वार्षिक विवरण न भरल्याबद्दल आकारण्यात आलेला दंड.,
३) वर्तमानपत्र डीटीपी व छपाई यासोबतच ई- पेपर्स, न्यूज पोर्टल्स, युट्यूब चॅनल्स आदि नवीन व सर्व्हिसेस या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
तसेच ज्या कोणी नवोदित संपादकास स्वाभिमानी प्रसार माध्यम समुहात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांस समावून घेतले जाणार आहे.तसेच कोणा इच्छुकास पत्रकारिता क्षेत्राची आवड असल्यास तथा त्यांनाही आपल्या स्वतः चे प्रसार माध्यम सुरु करावेसे वाटत असल्यास याबाबत त्यांंना योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
करीता अधिकाधिक नवोदित संपादकांनी या महत्त्वाच्या मिटिंगमध्ये आवर्जून उपस्थित रहावे असे स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
टीप :- ✍️✅🇮🇳...

सदरील मिटिंगमध्ये येणार असल्यास समता कार्यालयाच्या 9403199396 या क्रमांकावर पुर्वकल्पना देणे आवश्यक आहे.

वसतिगृहयुक्त शिक्षण हेच कर्मवीरांचे शैक्षणिक मानसशास्त्र - प्रा.डॉ.अभिमान निमसे


सातारा 
शेकडो वर्षे विद्येला मुकलेल्या आणि सामाजिक गुलामगिरीच्या आणि जातिभेदाच्या कर्दमात खोल रुतलेल्या बहुजन समाजाला माणुसकीचे हक्क पाप्त करून देण्याच्या उद्देशाने ४ ऑक्टोबर १९१९ सली कर्मवीर आण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीर आण्णा बहुजन समाजामध्ये स्वावलंबी शिक्षणाचा प्रसार करण्याकरिता महाराष्ट्भर वणवण हिंडले.त्यांनी जीवापाड श्रम केले.डोक्यावर टोपी नाही, पायात वाहणा नाही, हातात फक्त काठी, अशा तऱ्हेने आण्णानी समाजात शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला.आणि छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा हे रयत शिक्षण संस्थेचे माहे जून १९४७ मध्ये स्थापन झालेले पहिले महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त पहिले कॉलेज म्हणून छत्रपती शिवाजी कॉलेजविषयी काही आण्णांचे प्रसंग प्रस्तुत लेखात चित्रित करण्याचा मी अल्पसा प्रयत्न केलेला आहे.
“घामाने डबडबलेले शरीर” हाच आण्णांच्या मते व्यक्तीचा सर्वोच्च अलंकार होता.कर्मवीरांना विद्यार्थ्यांनी घाम गाळून घेतलेली स्वावलंबी विद्याच आवडत होती.स्वावलंबन हे त्यांचे शैक्षणिक तत्वज्ञानच होते. विद्यार्थ्यांना विद्यासंपन्न करून भारतात आदर्श समाजसेवक तयार करावयाचे होते.आई-वडिलांनीच मुलाला तांब्याभर पाणी द्यावे लागणे म्हणजे शिक्षणाचा पराभव आहे, हे शिक्षण नसून विष आहे. हे विष बाहेर फेकून दिले पाहिजे.निरोगी मनाचे निरोगी शरीराचे तरुण या छत्रपती शिवाजी कॉलेजमधून निर्माण झाले पाहिजेत ही आण्णांची भूमिका होती. माझ्या छत्रपती शिवाजी कॉलेजचा मुलगा स्वावलंबनाने B.A., B.Ed., M.A. झाल्यानंतर त्याने दुर्गम,लहान खेड्यातील-डोंगरातील शाळेवर काम करण्याची तयारी ठिवली पाहिजे.तसेच त्याने ओसाड रानात काम करण्याची तयारी ठेवून त्यांनी शिकले पाहिजे, त्याने निष्ठेने पवित्र्याने काम केले पाहिजे. ‘श्रम योजनेत काम करून आणि वसतिगृहात राहून’ उच्च शिक्षण पूर्ण करणारी मुलेच उद्या भावी भारताचा शैक्षणिक चेहरा मोहरा बदलू शकणार आहेत यावर आण्णांचा ठाम विश्वास होता.आणि म्हणूनच कर्मवीर आण्णांनी सर्वप्रथम बोर्डिंग काढली, वसतिगृह काढली. खऱ्या अर्थाने वसतिगृहयुक्त शिक्षण हेच कर्मवीरांचे शैक्षणिक मानसशास्त्र होते हे त्यांच्या अनेक प्रसंगावरून लक्षात येते.
हुशार, होतकरू व श्रमणारी, कष्ट करणारी मुले खेड्यांमधून आणून वसतिगृहात ठेवून आण्णांनी त्यावर संस्कार केले. कारण अशा विद्यार्थ्यांना बोर्डिंग मध्ये ज्यादा शिकवणी लावायची गरज नाही. त्यांना जात, गोत, धर्म, पंथ या भेदांना मूठ माती देण्याची प्रत्यक्ष कृती करण्याचे शिक्षण आपोआपच वस्तीगृहातून दिले जाते. स्वावलंबी व स्वाभिमानी शिक्षणाबाबत त्यांना आवड उत्पन्न करायची. एकत्र स्वयंपाक करावयाचा, एकत्र जेवायचे, एकत्र राहायचे, सहभोजन, सहजीवन, सहशिक्षण हा अभिनव क्रांतिकारी प्रयोग अखिल भारतात अण्णांनीच प्रथम केला. घामाच्या धारामधून मोत्यांचा चारा पिकविला. फलटणच्या महाराजांच्या सातारा कॅम्प मधील छोटेखानी बंगला अण्णांनी १९४० मध्ये मिळवला होता. तेथे राजर्षी शाहू महाराज यांचे जिवंत स्मारक म्हणून महाराजा सयाजीराव फ्री अँड रेसिडेन्सी हायस्कूल अण्णांनी १९४० मध्ये सुरू केले होते. पुढे १९४७ मध्ये याच बंगल्यात छत्रपती शिवाजी कॉलेज फ्री अँड रेसिडेन्सी सुरू करण्यात आले.
कर्मवीर भाऊराव पाटील एकदा गावातून चालले होते. समोरून श्री. बाळासाहेब देसाई, त्यावेळचे डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डचे प्रेसिडेंट चालत आले. दोघांची भेट झाली. आण्णा म्हणाले,काय बाळासाहेब, बोलायला गाठ पडली बघा. मी मनात जे योजीत होतो तेच घडले बघा. चला ✍️५ त्यांची सरकारकडे मागणी असे. जमिनीतील मातीत तुम्ही हात व मनगटे घासा, ती तुमची काळी आई आहे. तिची तुम्ही सेवा करा. म्हणजे ती माता तुम्हास भरपूर मोबदला देईल. 
अण्णांच्या मृत्यूपूर्वी अवघे तीन तासच आण्णांचा ड्रायव्हर उद्धव त्यांना भेटला होता. त्याला अण्णा म्हणाले- “उद्धव, आता जून मध्ये शिवाजी कॉलेजला खेडोपाड्यातील गोरगरीबांची खूप मुले उच्च शिक्षण घेण्यासाठी येतील. अद्याप आपणास होस्टेलची इमारत नाही, कल्याणी बर्याक्स सोडू नको म्हणून पी.जी. सरांना सांग व सदर बझारमध्ये मध्ये तुझ्या घराजवळ जे बंगले आहेत, त्यापैकी एक मोठा बंगला बघून ठेव. आपल्या कॉलेजच्या होस्टेलसाठी तो लागेल. ध्यानात ठेव. जा आता.” उद्धव तिथून नऊ वाजता निघाला. एसटीतून सातारला एक वाजता उतरला तर त्याला बातमी कळली की, आण्णा गेले. त्याला खरेच वाटेना. या प्रसंगावरून असे दिसते की, आण्णांना मृत्युसमयी सुद्धा मुलांच्या राहण्याबद्दल वसतिगृह असावे याची त्यांना अतीव काळजी असलेली या प्रसंगातून आपणास दिसून येते. शेवटच्या घटके पर्यंत आण्णा संस्थेची काळजी करत होते. 
 वस्तीगृहामध्ये मानवतेची थोर शिकवण दिली जाते व हे शिक्षण विद्यार्थ्यांनी कष्टाच्या घामाने मिळवले पाहिजे, स्वावलंबनाने मिळवले पाहिजे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, श्रमाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण, श्रम हीच पूजा. Laboraer est Orare -Work is workship. हे तर आमच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे ब्रीद वाक्यच आहे. या कर्मवीरांच्या घोषणा मागे फार मोठे शैक्षणिक तत्त्वज्ञान व मानसशास्त्र उभे होते आणि आहे. अमेरिकेतील निग्रो समाजामध्ये बुकर टी वॉशिंग्टन या निग्रो शिक्षणतज्ञाने निग्रो लोकांसाठी कार्य केले व भारतातील बहुजन समाजाची शैक्षणिक व सांस्कृतिक दैन्यावस्था याच्यासाठी अण्णांनी कार्य केले. जे कार्य बुकर टी यांनी ज्ञातीबांधवांकरिता केले तेच कार्य कर्मवीर भाऊराव यांनी भारतातील शेतकरी, शेतकरी, कामगार, जनतेतील विद्यार्थ्यांसाठी केले म्हणूनच “From Booker T. to Bhaurao P. असे या प्रयोगाचे नामाभिधान करण्यात येते. 
वसतिगृह जीवनावर भर, जातीय ऐक्य, स्वावलंबन, स्वाभिमान, श्रमप्रतिष्ठा, श्रम, पावित्र्य, भूमातेशी प्रत्यक्ष संबंध, मानवतावाद, विश्वबंधुत्व, स्वातंत्र्यचिंतन व स्वातंत्र्यासाठी प्रयत्न, त्यागी, साधेपणा, जनतेशी एकरूपता हे गुण विद्यार्थ्यांमध्ये या स्वावलंबनातून आणि वसतिगृहयुक्त शिक्षणातूनच येतात. वसतिगृहयुक्त शिक्षणावर कर्मवीरांची फार मोठी श्रद्धा होती. १९०७ पासून त्यांनी गरीब होतकरू मुलांना वस्तीगृहामध्ये नेऊन ठेवण्यास सुरुवात केली होती. पहिला विद्यार्थी श्री ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप, दुधगाव येथे १९०९ साली, काले येथे १९१९ साली, नेरले येथे १९२०-२१ साली -अशी वसतिगृहे त्यांनी काढली व सातारला तर १९२४ मध्ये स्वतःच्या राहत्या घरीच एका हरिजन मुलास घेऊन वसतिगृह सुरू केले. जात, बौद्ध, धर्म, पंथ, भेद नष्ट करण्यास वसतिगृहाइतके दुसरे प्रभावी साधन होऊच शकत नाही. एकाच खेडेगावातील जातिवंत घरंदाज पाटील घराण्यातील मुलगा, जैन, साळी, माळी, महार, मांग, ढोर इत्यादी मुले एकत्र येतात, स्वयंपाक करतात. श्रम करतात. स्वकष्टाने शिक्षण घेतात हा प्रयोगच मुळात राष्ट्रसंवर्धन मूलगामी व क्रांतिकारक मूल्यांनी भरलेला असा होता. आणि म्हणूनच वस्तीग्रहयुक्त शिक्षण आजच्या काळातील आणि पुढील काळातील विद्यार्थ्यांना देणे अत्यंत गरजेचे आहे. 
 या देशात शारीरिक श्रम करणाऱ्यांची उपेक्षा झाल्यामुळेच आपली अधोगती झाली आहे हे ओळखून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी श्रम करणे म्हणजेच पूजा करणे हा मंत्र कर्मवीरांनी प्रत्यक्षात उतरवला. श्रमाच्या मोबदल्या शिक्षण देण्याचे हे जे पर्व आण्णांनी निर्माण केले त्यातूनच बहुजन समाजाला मुक्ती मिळणार आहे व माणूस म्हणून स्वाभिमानी जीवन जगता येणार आहे. यातूनच एकजिनसी समाज निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रबांधणीच्या कार्यात प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाटा असेल.श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय, स्वातंत्र्य ही भाऊरावांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाची चतु:सुत्री होती. यावर संस्थेची सर्व मदार आहे. पोशाखी व पुस्तकी शिक्षणापेक्षा वरील प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्याला दिले गेले तर भारताचा अभ्युदय लवकर होईल असे ते म्हणत.
स्वावलंबी शिक्षणाचे भव्य व दिव्य तत्त्वज्ञान रयत संस्कृतीमध्ये, रयत शिक्षण संस्थेत आढळते. त्याची सुरुवातच छत्रपती शिवाजी कॉलेजमधून झाली आहे. कर्मवीरांच्या शिक्षणशास्त्राचा विचार करताना सर्व गोष्टी आपण ध्यानात घेतल्या पाहिजेत. लोळागोळा झालेल्या बहुजन समाजाला संजीवनी देणे म्हणजे त्याला शिक्षणाचा तिसरा डोळा देणेच आहे. कमवा आणि शिका योजनेतून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे म्हणजेच जात, गोत, धर्म, पंथ, भेद यांना पद्धतशीरपणे मूठ माती देऊन सर्वांनी गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहावयाचे. एकत्र स्वयंपाक करावयाचा. एकत्रित जेवायचे. राष्ट्र प्रेमाची प्रार्थना म्हणायची, एकत्र धनिणीच्या बागेत शरीर श्रम करून शेती करायची हा संपूर्ण जगाला दिलेला अनोखा प्रयोग आपण रयत जनतेनेच जोपासला पाहिजे. हा शिक्षणप्रसार करायचा असेल तर या गोरगरीब जनतेमधील हुशार व तत्पर मुले निवडली पाहिजेत व त्यांना वसतिगृहामध्ये आणून शिक्षण दिले पाहिजे. 
१९४५ साली ‘छत्रपती शिवाजी दि ग्रेट कॉलेज’ ची कर्मवीरांनी मुंबईत घोषणा केली. त्यावेळी ते केईएम हॉस्पिटलमध्ये रक्तदाबाच्या विकाराने आजारी पडले होते. ‘रात्रंदिन आम्हां रयत शिक्षण चिंतनाचा प्रसंग’ याप्रमाणे त्यांना ह विचार स्फुरला. पण हे कॉलेज इतर कॉलेज प्रमाणे नसावे ही त्यांची मनीषा व आग्रह होता. फी देऊन शिकणाऱ्या मुलांना इतर कॉलेजचे दरवाजे उघडे आहेत. माझ्या ‘शिवाजी कॉलेजमध्ये’ मात्र निढळाचा घाम गाळून जो शिक्षण घेण्यास तयार असेल त्यांनीच यावे. आई बापांच्या पैशावर शिकणाऱ्याना येथे प्रवेश नाही. सर्वांनी वसतिगृहातच राहिले पाहिजे कारण माझे हे कॉलेज पूर्ण Free and Residential राहील निर्धार व्यक्त केला. अशा प्रकारे १७ मुलांचे हे छत्रपती शिवाजी फ्री अँड रेसिडेन्सी कॉलेज जून १९४७ मध्ये सुरू करण्यात आले. फलटणच्या श्रीमंत मालोजीराव नाईक निंबळकरांनी आपला ‘फलटण लॉज’ बंगलाच कर्मवीराना १९४०साली महाराजा सयाजीराव फ्री अँड रेसिडेन्सी हायस्कूल करता बक्षीस दिला होता. तिथेच सदर कॉलेज सुरू केले व हायस्कूल कॅम्पमधील भाड्याच्या इमारतीत हलवण्यात आले. कर्मवीरांचे शैक्षणिक प्रयोगामध्ये वसतिगृहीतील जीवनावर त्यांचा फार काटाक्ष असे. पूर्वीच्या उपनिषदकालीन गुरुकुलांची आश्रमांची त्यांच्या मनामध्ये पकड होती. 
भाऊराव म्हणायचे, छत्रपती शिवाजी कॉलेज आज फ्री अँड रेसिडेन्सी कॉलेज आहे ते मला भविष्यात फ्री अँड रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी करावयाचे आहे.कर्मवीरांचे हेच स्वप्न खरे ठरले आहे. कारण आज छत्रपती शिवाजी कॉलेज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारचे घटक महाविद्यालय आहे. याचा आम्हा सर्वाना सार्थ अभिमान आहे. “श्रमाच्या मोबदल्यात उच्च शिक्षण मोफत” अशी जाहिरात १९४७ सालापासून पुढे जेव्हा जेव्हा वर्तमानपत्रात झळकू लागली तेव्हा या योजनेची खरे क्रांतिकारी रूप जनतेसमोर आले. शिक्षण मोफत देऊ पण विद्यार्थ्यांनी फुकटचं खाऊ नये कारण फुकटचं खाणारांना ते मिंदे बनवते. असा माणूस भविष्यकाळात धडाडीने काही करू शकत नाही असा अण्णांचा आणखी एक सिद्धांत होता. आणि याच योजनेतून शिकणारी मुले पुढे स्वाभिमानी, स्वावलंबी होतील आणि भविष्यात खरे रयत सेवक तेच असतील. प्रामाणिक व निष्ठावंत रयत सेवक निर्माण करणारी भारतातील एकमेव संस्था म्हणजे कर्मवीरांनी हा पुढे आणलेला स्वावलंबी शिक्षणाचा महान प्रयोग होय. 
छत्रपती शिवाजी कॉलेज जगावेगळे free and Residential college चार वर्षे चालवले म्हणून मुंबई सरकारने अशा अभिनव, क्रांतिकारक प्रयोग करणाऱ्या कॉलेजला आमच्या नियमात बसत नाही म्हणून सरकारने अनुदान देण्याचे बंद केले. तरीही कर्मवीरांनी कधीही तक्रार केली नाही. पुढे रयत शिक्षण संस्थेच्या लाखो कार्यकर्त्यांनी शैक्षणिक अनुदान दिले आणि रयत शिक्षण संस्था नेटाने उभा राहिली. 
खेड्यातील मुलांचे शिक्षण खेड्यासारख्या वातावरणातच झाली पाहिजे. शेतकरी शेतात घाम गाळतो त्याप्रमाणे त्याच्या मुलांनी शिक्षण संपादन करण्यासाठी काम करून घाम गाळायला पाहिजे असे भाऊराव म्हणत. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कमवा व शिका योजनेचे हेच तर आजही खास वैशिष्ट्ये असलेलेल दिसून येते. ‘स्वालंबन’ भाऊरावांचे शिक्षण क्षेत्रातला मध्यबिंदू होता. स्वावलंबना बरोबरच ऐक्यही दुसरी उद्दिष्ट होते. वस्तीगृहातील मुले स्वयंपाक करीत, भांडी घाशीत , खडी फोडीत, शेतात राबत असत. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये ऐक्य निर्माण होते. ऐक्य आणि स्वावलंबन याच्यासारखा प्रयोग जगात दुसरा आणखीन कोणता चांगला?
जातिभेदाला मूठमाती देऊन त्यांनी स्थापिलेल्या रयत शिक्षण संस्थेची नोंद इतिहासाला घ्यावी लागेल, कर्मवीर आण्णा देहाने गेले असले तरी रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने ते जिवंत आहेत व पुढेही जिवंत राहतील. कर्मवीर आण्णा हे एक व्यक्ती नसून एक संस्था होते. आपण सर्वांनी आण्णांचे कार्य पुढे नेण्यानेच त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार आहे. अशा या थोर शिक्षण महर्षीचा देशातील सर्व थरातील लोकांनी गौरव केला.जनतेने त्यांना कर्मवीर केले.पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लिट.पदवी सन्मानपूर्वक इस्पितळात जाऊन अर्पण केली व भारत सरकारने पद्मभूषण हा किताब दिला.जनता, विद्वान आणि राज्यशासन यातर्फे सन्माननीय होण्याचे भाग्य कर्मवीरांना लाभले. छत्रपती शिवजी कॉलेजच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण संकल्प करूयात की, पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य व विचार पुढे नेऊ.
लेखन :-

^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^
=================================
*प्रा.डॉ. अभिमान निमसे*
सहाय्यक प्राध्यापक, भूगोलशास्त्र विभाग छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा...✍️✅🇮🇳

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल सौ.शुभांगी जगताप,राऊत यांचा,डॉ.सुधा कांकरीया यांचे कडून सन्मान


- अहमदनगर - प्रतिनिधी - /वार्ता -
अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित, स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या आद्य प्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीच्या अभ्यासक डॉ. सुधा प्रकाश कांकरिया यांनी सौ. शुभांगी सुनीत राऊत यांना ' कन्यारत्न प्राप्त झाले म्हणून ' प्रशस्तीपत्र देऊन नुकताच सन्मान केला आहे .
   सौ. शुभांगी जगताप - राऊत ह्या केडगांव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपाध्यापिका व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मीनाताई अनिल जगताप यांच्या सुकन्या आहेत तर श्रीरामपूर येथील निवृत्त प्राध्यापक रामचंद्र ताराबाई सुंदरदास राऊत यांच्या स्नुषा (सून) आहेत .
   श्री. सुनीत राऊत आणि आताच्या सौ. शुभांगी जगताप - राऊत यांच्या विवाह प्रसंगी डॉ. सुधा कांकरिया यांनी उपस्थित राहून वधू - वरांना शुभ आशीर्वाद दिले होते, आणि सर्व उपस्थितांना ' स्त्री जन्माचे स्वागत करा ' असा शुभ संदेश दिला होता. त्याचप्रमाणे लग्नात सात फेरे झाल्या नंतर स्त्री जन्माच्या स्वागताचा आठवा फेराही घेतला होता.
   सौ. शुभांगी जगताप - राऊत यांना कन्यारत्न झाल्याचे समजल्यावर डॉ. कांकरिया यांनी सौ. शुभांगी जगताप - राऊत यांच्या अ.नगर येथील निवासस्थानी जाऊन त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. आपण ' स्त्री जन्माचे स्वागत करा ' या चळवळीत सहभागी झालात आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा असे त्यांनी सौ. शुभांगी राऊत यांना दिलेल्या प्रशस्तीपत्रामध्ये म्हटले आहे.
   प्रशस्तीपत्रामध्ये ' लेका एवढीच लेकही भारी , हाच संदेश घरोघरी, आपण सगळे एकत्र येऊ या , स्त्री जन्माचे स्वागत करू या . . . ' या काव्य पंक्ती बरोबरच डॉ . सुधा कांकरिया रचित 'शपथ ' ही काव्य रचनाही प्रकाशित करण्यात आली आहे.
   या प्रसंगी बोलताना प्रा. रामचंद्र राऊत म्हणाले की, आम्हा सर्व परिवाराचे स्वप्न होतं की आमच्या घरामध्ये मुलगी जन्माला यावी आणि परमेश्वराच्या कृपेने आमचे स्वप्न साकार झाले आहे. आमच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी ही नात आली आणि खरोखर आमचं संपूर्ण घर प्रसन्न , प्रफुल्लीत झालं, हर्ष व प्रसन्न चित्तानं भरून गेलं असेही ते म्हणाले.
   प्रा. राऊत पुढे म्हणाले की, आमच्या चिरंजिवांनी व सुनबाईंनी लग्नाच्या वेळी डॉ. सुधा कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली जो आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागतासाठी घेतला त्याबद्दल राऊत व जगताप कुटुंबाला खूप आनंद वाटतो .कारण आज समाजात पाहिलं तर समाजाची घडी विस्कटलेली दिसत आहे. आज अनेक वर लग्नासाठी तयार आहेत पण त्यांना वधू मिळत नाही. त्याचे कारणच आहे की स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण समाजात वाढत चालले आहे आणि ते थांबविण्यासाठी म्हणून विवाह संस्कारा सोबतच स्त्री जन्माच्या स्वागताचा हा संस्कार आठव्या फेरा द्वारा घेतला गेला याचा आम्हाला निश्चितच आनंद होतो आहे . त्याबद्दल आम्ही डॉ. सुधा कांकरिया यांचे अभिनंदन करतो.
   समाजातील प्रत्येकाने अशा प्रकारचा स्त्री जन्माचा स्वागताचा संस्कार स्वतःपासून सुरू करावा म्हणजे समाजात सकारात्मक परिवर्तन होईल असेही प्रा . रामचंद्र राऊत म्हणाले .
   या प्रसंगी सर्वश्री संतोष जगताप , सुनिल जगताप , संगीत राऊत, सुनीत राऊत , मयूर जगताप, सौ. रामेश्वरी लाटे , सौ . रेश्मा राऊत , श्रीमती रुक्मिणी जाधव , श्रीमती कमलाबाई जगताप, श्रीमती मीनाताई जगताप, सौ. राजश्री राऊत आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================