राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, September 24, 2024

राज्यस्तरीय ABACUS परिक्षेत कु.अवनी सलालकर प्रथम


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
निशा ABACUS या संस्थेने सोलापूर येथे राज्यस्तरीय परीक्षेचे आयोजन केले होते,
अवनी सलालकर हिने चौथ्या टप्प्यातील पहिल्या पेपरमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर दुसरा पेपरमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. तिच्या यशाबद्दल एस. के.सोमैया प्राथमिक विद्यामंदिर श्रीरामपूर शाळेच्या संचालिका तथा रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मिनाताई जगधने शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनालीताई पैठणे वर्ग शिक्षिका श्रीमती मेघा पवार श्रीमती अनिता चेडे श्री.भालदंड सर आदिंनी अभिनंदन केले 
     सौ.संचिता नरोटे यांनी मार्गदर्शन केले. 
अवनी सलालकर हिच्या यशाबद्दल महंत बापू कुलकर्णी,नवनाथ अकोलकर, शिवराज तिटमे, ज्ञानेश्वर पटारे, चंद्रकांत कराळे माधवराव तिटमे, श्रीकांत किर्तीशाही आदिंनी अभिनंदन केले.

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

वडाळागांव मध्ये ईद- ए- मिलाद निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


- नाशिक - प्रतिनिधी -/ वार्ता -
आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराचे रोगनिदान तपासणी करीत नसल्यामुळे अनेक वाईट प्रसंग अनेक मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो, दुर्दैवाने जीव ही गमवावा लागतो, आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. याबाबत जागृती व्हावी याउद्देशाने के.बी .एच. विद्यालय, वडाळा येथे फैज़ल रज़ा शेख व करिअर काउंसलर व मोटिवेशनल स्पीकर असिफ शेख यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मेंदू, मनके विकार, अस्थिरोग, हृदयरोग, मधुमेह छातीच्या विकारांबाबत निदान व उपचार करण्यात आले. रक्तदाब, मधुमेह, ईसीजी ह्या चाचण्या मोफत करण्यात आल्या. सादर शिबिरात हृदयरोग तज्ञ डॉ. शीतलकुमार हिरन, डॉ. अनुज नेहते, डॉ.अतुल सिंघल, डॉ.दीपक आहेर यांनी परिसरातील शेकडो रुग्णांची मोफत तपासणी करून पुढील उपचार संबंधी योग्य सल्ला दिला. कॅरिअर काउंसलर आसिफ शेख यांनी मार्गदर्शन करताना आरोग्य हिच संपदा असून आरोग्याची चांगली काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. 
          यावेळी के. बी. एच. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय म्हसकर, पो.नि. सुनील अंकोलीकर, सहा. पो. उ. नि. संतोष फुंदे, सामाजिक कार्यकर्ते रशीद लाला मदारी, डॉ.असलम पठाण, डॉ. तारिक कुरैशी, इम्रान शेख, पवार सर, निसार हाजी, मुश्ताक हाजी, हाजी उमर रज़वी, मुश्ताक लालू, रफियोद्दीन शेख, फरीद शेख, मोहसीन शाह, पत्रकार इसहाक कुरैशी, पत्रकार तबरेज शेख, इश्तियाक शेख आदी उपस्थित होते. सदर आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेवटी फैज़ल रज़ा शेख यांनी आभार मानले.

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार माजिद खान - नाशिक 

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

युनिव्हर्सल ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मोफत दंत तपासणी व उपचार शिबिर संपन्न


महागाईच्या काळात मोफत शिबिरांची अत्यंत आवश्यकता - महबूब शेख

- अहमदनगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना आज प्रत्येक बाबी हे महागड्या होत आहे. त्याचप्रमाणे आजारांचे उपचार ही दिवसां दिवस महाग होत आहे. त्यासाठी मध्यमवर्गीयांसाठी मोफत शिबिरांची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यूनिवर्सल एज्युकेशन ट्रस्टचे व्हाईस चेअरमन महबूब शेख यांनी केले.
गणेश उत्सवानिमित्त युनिवर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या डेंटल केअर अँड इन्पांट सेंटरच्या वतीने संजय नगर येथील स्नेहालय बालभवन येथे मोफत दंत तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे व्हाईस चेअरमन मेहबूब शेख, डॉ सावंत पालवे, डॉ सायली शिंदे, मास्टर मुश्ताक, दीपा शिंदे, अंबादास पोटे, ऋतिक लोखंडे, दिपाली, अंजली, चंद्रकला व रेखाताई आदी उपस्थित होते. 
      शिबिरात मोठ्या प्रमाणात मूलं व लोकांनी दातांची तपासणी करून मार्गदर्शन घेतले. पुढे बोलताना महबूब शेख म्हणाले की, सध्याच्या काळात सण उत्सव साजरे करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना सर्वांनी ते साजरे करताना आपली जबाबदारी समजून सर्व रोगांसाठी शिबिर आयोजित केले पाहिजे असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा शिंदे यांनी केले तर आभार मास्टर मुस्ताक यांनी मांनले.

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीदखान, अहमदनगर 

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११

संजय बनसोडे यांचीप्राचार्य पदी नियुक्ती


श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी संत फ्रान्सिस एज्युकेशन संस्था औरंगाबाद संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने सेंट मेरी विद्यालय वाहेगांव (ता.गंगापूर) येथे प्राचार्य पदावर तालुक्यातील हरिगांव (ता.श्रीरामपूर ) येथील संजय बाबुराव बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्या बद्दल हरेगाव व प्रगती नगरसह,अरुण बनसोडे, नीरज बनसोडे, किशोर मकासरे व मित्र मंडळ आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११

महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात कर्मवीर जयंती उत्साहात साजरी


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला प्राचार्य अंगद काकडे, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, उपप्राचार्य अलका आहेर, प्र. पर्यवेक्षक संजय ठाकरे व प्र. पर्यवेक्षक सुभाष भुसाळ यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तनुजा भालेराव हिने कर्मवीरांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रवरानगर संकुल ते लोहगाव कमानीपर्यंत कर्मवीरांच्या देखाव्यांसह मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कन्या विभागाच्या वतीने कलशधारी विद्यार्थिनी व लेझीम पथक, विद्यार्थी वसतिगृहातील झांज पथक, गुरुकुल आश्रमातील विद्यार्थ्यांचे वारकरी पथक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या टिपरी पथकाने संकुल ते तांबेनगर व नेहरूनगर येथे आपल्या विविध कलांचे केलेले प्रात्यक्षिक मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी परिसरातील महिलांनी आणि ग्रामस्थांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचे ठिकठिकाणी औक्षण करून अभिवादन केले. मिरवणूक मार्गावर महिलांनी सड्यासह रांगोळ्या काढल्या होत्या. ही मिरवणूक यशस्वी संपन्न होण्यासाठी संकुलातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर  ९१९५६११७४१११

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यात तृतीय विद्यालयास मिळणार एकलाख रुपयांचे पारितोषिक


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये तालुक्यात तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले असून विद्यालयास एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. श्रीरामपूर तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी गठित करण्यात आलेल्या शासकीय समितीमार्फत सर्व सहभागी शाळांचे मूल्यमापन करण्यात आले. यात श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला. विद्यालयात पायाभूत सुविधा, गुणवत्तेबरोबर भौतिक सुविधा, शासकीय समित्या, शासकीय शिष्यवृत्ती योजना, साक्षरता अभियान, स्वच्छता, डिजिटल वर्ग खोल्या , परसबाग ,खेळाचे मैदान या व अशा विविध विभागांचे काटेकोरपणे मूल्यमापन करण्यात आले.
        रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य प्रकाश पा. निकम, उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे, उत्तर विभागीय अधिकारी बाबासाहेब बोडखे,सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे व बाबासाहेब नाईकवाडी, उत्तर विभाग गुणवत्ता कक्ष प्रमुख काकासाहेब वाळुंजकर, आ. लहू कानडे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजीवन दिवे, विस्तार अधिकारी मंगल गायकवाड, केंद्रप्रमुख संजीवनी अंबिलवादे, प्राचार्य प्रवीण बडधे, प्राचार्य सुहास निंबाळकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुधीर पा. कसार ,राजेंद्र पा.पवार, उद्धवराव पा.पवार तसेच वडाळा महादेव गावातील ग्रामस्थ यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेव माळी तसेच ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कसार ,शितल निंभोरे , स्वेजल रसाळ, उषा नाईक, भास्कर सदगीर , संतोष नेहुल,अविनाश लाटे प्रज्ञा कसार ,दिपाली बच्छाव , जिजाबाई थोरात, जयश्री जगताप ,सुनिता बोरावके, प्रशांत बांडे, अशोक पवार , संदीप जाधव,भास्कर शिंगटे इ. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
 पत्रकार राजेंद्र देसाई वडाळा महादेव
*संकलन*💐🇮🇳✅...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ जास्तीत जास्त धनगर समाजातील प्रवर्गाने घ्यावा; माजी आ. भानुदास मुरकुटे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - प्रतिनिधी 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरिता प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील लाभार्थीसाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावा, असे आवाहन लोकसेवा विकास आघाडीचे समन्वयक गणेश छल्लारे यांनी केले आहे.
या योजनेचा फॉर्म भरण्याचा शुभारंभ अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते श्रीरामपूर येथील अशोक कारखाना कार्यालय येथे संपन्न झाला. या ठिकाणी सदर योजनेचा ऑनलाईन फॉर्म २६ सप्टेंबर पर्यंत मोफत भरून दिले जाणार आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढ्या १ मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान, मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान, हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी ५० टक्के अनुदान, पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणारं आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मेनरोड श्रीरामपूर कारखाना कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शुभारंभ प्रसंगी अशोक कारखान्याचे संचालक यशवंत बनकर, बबनराव आसने, बाळासाहेब आसने आदींसह योजनेचे लाभार्थी बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब सोलट, योगेश शिंदे आदी लाभार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११