राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, October 6, 2024

श्रीरामपूर चा शारदोत्सव


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर शहरात शारदोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत असून शहरातील विविध मंडळांनी मनमोहक असे विविध देखावे सादर केले आहेत.

त्यातील १) श्रीरामपूर येथे जिजामाता चौकातील मंडळाने साकारलेल्या हनुमानाचे द्रोणागिरी पर्वतासह उड्डाण हा देखावा सादर केला आहे, २) मेन रोड येथील जय श्रीराम प्रतिष्ठान श्रीरामपूर यांनी श्रीकृष्ण देखावा सादर केला आहे, ३) संगमनेर रोड नॉर्दन बँक शारदोउत्सव मित्र मंडळ यांनी कारंजाचा देखावा सादर केला आहे, ४) बालिका शाळेजवळ शिव सर्कल युवा प्रतिष्ठान यांनी आदी योगी महादेव हा देखावा सादर केला आहे, ५) सरस्वती कॉलनी रोड येथील राजे छत्रपती मित्र मंडळ यांनी स्वामी समर्थ हा देखावा सादर केला आहे, ६) बेलापूर रोड येथील राजमुद्रा प्रतिष्ठान यांनी रावणाचे गर्वहरण हा देखावा सादर केला आहे. 



=================================
-----------------------------------------------
(सर्व छाया अमोल कदम - श्रीरामपूर )
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९२९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

चांद सुलताना हायस्कुलमध्ये महात्मा गांधी जयंती साजरी


महात्मा गांधीनी 'अहिंसा परमो धर्म' चा संदेश जगाला दिला - सैय्यद मतीन

- नगर - प्रतिनिधी - / वार्ता -
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी 'अहिंसा परमो धर्म' या तत्वाखाली देशवासियांना संघटित करून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. सत्य व अहिंसेच्या मार्गाने भारताला आत्मनिर्भर होण्याची दिशा दाखविली असे प्रतिपादन ए. टी. यु. चांद सुलताना हायस्कुलचे अध्यक्ष सय्यद हाजी अब्दुल मतीन अब्दुल रहीम यांनी केले.
ए.टी.यू. चाँद सुलताना ऍंग्लो उर्दू हायस्कुल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज अहमदनगर येथे गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सय्यद हाजी अब्दुल मतीन अब्दुल रहीम, उपाध्यक्ष सय्यद असगर अकबर, सचिव शेख तन्वीर चांद, सदस्य शेख गुलाम दस्तगीर अब्दुल गणी,शेख फय्याज राज मोहम्मद, मुख्याध्यापक शेख अतिक कादर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे सर्व पदाधिकारयांनी विध्यार्थायांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही यावेळी आपल्या वक्तृत्वातून महात्मा गांधी यांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या घटनांवर प्रकाश टाकला. शेवटी शादाब शेख यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*❤️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

धार्मिकता नितांत सुंदर गोष्ट - आ.लहु कानडे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद , लोयोला दिव्यवाणी व ऑल पास्टर फेलोशिप, श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर तालुक्यातील सर्व ख्रिश्चन धर्मगुरूंचा त्यांच्या सामाजिक योगदानासाठी, हृदय सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार लहुजी कानडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष हाजी अंजुमभाई शेख हे होते. सुरुवातीला,पास्टर सतीश अल्हाट यांनी प्रार्थना केली. प्रास्ताविक परिषदेचे विश्वस्त अविनाश काळे यांनी केले. परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी अध्यक्षांची ओळख करून दिली तसेच आमदार लहूजी कानडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा थोडक्यात व्यक्त केला. 
याप्रसंगी आ.लहुजी कानडे आणि प्रमुख पाहुणे हाजी अंजुमभाई शेख यांच्या हस्ते सर्व धर्मगुरूंना सन्मानित करण्यात आले. 
यामध्ये प्रथमतः ज्येष्ठ १० धर्मगुरूंना समाजभूषण पुरस्कार व ६0 धर्मगुरूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी परिषदेचे कार्यकर्ते, श्रीरामपूर तालुक्यातील धर्मगुरू धर्मभगिनी व समाजबांधव उपस्थित होते. लोयोला दिव्यवाणीचे व्यवस्थापक फा.अनिल चक्रनारायण यांनी धर्म सर्वसमावेशक असावा असे प्रतिपादन केले.आमदारांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, राजकारण हे प्रत्येक नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. देशाच्या कारभाऱ्यांनी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले त्याद्वारे स्वातंत्र्यानंतर भारतीय समाजाने कशी वाटचाल करावी यासाठी संविधानिक राष्ट्रवादही दिला. संविधानिक राष्ट्रवाद म्हणजे; भारतीय राज्यघटनेने भारतीयांना बहाल केलेले स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकशाही जीवन पद्धती होय! प्राचीन काळापासून धर्माचे स्थान सर्वतोपरी श्रेष्ठ राहिलेले आहे. भारतामध्ये हजारो वर्षांपासून सर्व धर्म व पंथ गुण्या गोविंदाने नांदत आहेत परंतु काही स्वार्थी लोकांनी सत्ता प्राप्त करण्यासाठी अलीकडच्या काळात धर्माला राजकारणात आणलेले आहे. ही फार खेदाची गोष्ट आहे. वास्तविकता धार्मिकता ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. परंतु धर्मांधतेचा काहींनी मार्ग पकडून धर्मा-धर्मामध्ये जाती-जातीमध्ये भेदभाव निर्माण करण्याचे पाप केले आहे. भारतीय समाजामध्ये फार प्राचीन काळापासून अस्पृश्यता होती.त्यायोगे अन्याय अत्याचार होता परंतु स्वातंत्र्य चळवळीतील सुज्ञ नेत्यांनी या सर्व अनिष्ट रूढी प्रथा बाजूला ठेवून सर्वांना आनंदाने आपापला विकास करून घेता येईल अशा प्रकारचा सर्वोच्च कायदा भारतीय राज्यघटना म्हणून स्वीकारला आणि देशाच्या प्रगतीला वेग आला.या देशामध्ये शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान ,उद्योग- व्यवसाय, शेती, महिला कल्याण या सर्वांमध्येच संविधानिक विचार मूल्याने काँग्रेसच्या राजवटीत अमुलाग्र क्रांती झाली. अर्थात शिक्षण, आरोग्य यामध्ये मिशनऱ्याचे योगदान फार महत्त्वपूर्ण आहे. गोरगरिबांची सर्वसमावेशक ही विचारधारा पारंपारिक, मध्ययुगीन विचार असणाऱ्या लोकांना विशेषता मनूवाद्यांना पसंत पडली नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा विकासचक्र उलटे फिरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच धर्मप्रसाराबरोबरच, समाजप्रबोधन आवश्यक झालेले आहे. समाज प्रबोधनातूनच या देशातील शोषित,पीडित गरीब शेतकरी, अल्पसंख्यांक, आदिवासी,दलित या सर्व कष्टकऱ्यांना आपला जीवन मार्ग प्राप्त होणार आहे असेही ते म्हणाले.
शेवटी आमदार लहू कानडे यांनी पुरस्कार प्राप्त धर्मगुरूंचे अभिनंदन केले. अंजूमभाई शेख यांनी या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली त्याबरोबरच त्यांनी ख्रिश्चन धर्मियांच्या आध्यात्मिक केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तर आमदार लहु कानडे यांनी त्या जागेवर सभागृह बांधून देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी आदिवासी समाजाचे नेते शिवाजीराव गांगुर्डे यांनी मूळचा आदिवासी असलेला समाज सर्व धर्मातील उच्च मूल्य स्वीकारतो म्हणून तेही आपले सोबतीच आहेत असे आवर्जून सांगितले. 
या कार्यक्रमाची सांगता प्रीती भोजनाने झाली.या कार्यक्रमास माजी नगरसेवक अशोक कानडे, उंबरगांव ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक भोसले, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नानासाहेब रेवाळे, दत्तनगरचे रवी अण्णा गायकवाड, आदिवासी एकलव्य संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे,चांगदेवभाऊ देवराय आणि लोयोला दिव्यवाणीचे व्यवस्थापक फादर अनिल चक्रनारायण,ऑल पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष पास्टर राजेश कर्डक ,उपाध्यक्ष पास्टर विजय खाजेकर, सेक्रेटरी पास्टर अलिशा अमोलिक, उपसेक्रेटरी पास्टर प्रवीण गायकवाड, खजिनदार पास्टर शैलेश अमोलिक, उपखजिनदार पास्टर दीपक शेळके,पास्टर अण्णासाहेब अमोलिक, पास्टर सतीश आल्हाट, पास्टर सुभाष खरात, पास्टर याकोब वडागळे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमासाठी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब तोरणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष दिवे, सुनील बोरगे, नितीन जाधव, संतोष गायकवाड, सुनील संसारे, सुंदर संसारे, संदीप हिवाळे त्यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी राजू साळवे जेम्स पंडित, अजय लोंढे, पास्टर विजय सरोदे प्रमोद शिंदे,संजय साळवे हे देखील उपस्थित होते. शेवटी चंद्रकांत त्रिभुवन यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

मुलांना ‘सदाचारी माणूस’ बनवूया ! - सौ.आरती दळवी


- सौ.आरती दळवी
जन्माला घालते ती आई आणि हाताला धरून शिकवते ती बाई. आज दोघींची अवस्था एक सारखीच आहे. पूर्वी आपल्या आई- वडिलांना घरात देवाप्रमाणे पुजले जायचे तेवढी शिस्त आणि दरारा होता. आई वडील जे काही बोलतील त्याला प्रत्युत्तर होत नव्हते त्यांचा शब्द हा अंतिम असायचा. त्याच बरोबर शाळेतील बाई, सर यांचा खूप मोठा सन्मान होत होता. शिक्षक रस्त्याने जरी निघाले तरी मुले लपून घरात पळून जायचे त्यांचा तेवढा धाक त्या मुलांवर असायचा.खरेच ! ज्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त दोन रंग आहेत एक काळा आणि दुसरा पांढरा आणि जो व्यक्ती एका हातात खडू आणि दुसऱ्या हातात छडी एवढ्या दोनच वस्तू वापरून जे दगड घडवून त्यात देवपण आणतात अशी व्यक्ती म्हणजे शिक्षक. आजची परिस्थिती बघता शिक्षक आणि शिक्षण पद्धती दोन्हीमध्ये खूप मोठा बदल झाला आहे .जग खूप पुढे निघाले आहे पण या २२ व्या शतकात आपल्या वेळीचां तो छडी वाला मास्तर संपुष्टात आला आहे...याचे दुष्परिणाम या आजच्या पिढीला समजतंच नाहीत. शिस्त आणि समज या दोन गोष्टी असल्याशिवाय विद्यार्थी घडत नाही. देवाला देवपण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपला विद्यार्थी घडवायचा असेल तर त्याला शिक्षकाने कठोर शासन करणे हे अत्यावश्यक आहे. आमचे शिक्षक हे एवढे कडक होते त्यांची फक्त नजर पडली तरी आमच्या अंगाचे पाणी पाणी व्हायचे. मग आज आपण आपल्या मुलांना संस्कार देताना वळण लावताना शिक्षकांना एवढी बंधन का घालतो याचा कधी विचार केलात का ? मुलांना शिक्षा करायची नाही,त्यांच्यावर ओरडायचे नाही,मारायचे नाही.. आजची पिढी या असल्या कारणाने आपणच बिघडवत चाललो आहोत. मुलांना शिस्त लागायची असेल तर त्यांना साम दाम दंड भेद या सगळ्या प्रकारांचा वापर करून त्यांच्यावर बंधन घालणं गरजेचं आहे तरच ते उद्याचे उज्ज्वल भविष्य ठरतील. आजच्या शिक्षकांना एवढी बंधने घालून ठेवलेत त्यामुळे ते स्वतः खूप हतबल आणि निराश आहेत. हातात आणि मनात असून ही ते या पिढीच्या मुलांना संस्कार करताना त्यांनी स्वतःला एक चौकटीत बंद करून ठेवले आहे. 
छडी लागे छमछम विद्या येई घमघम...... यातली छडीच काढून टाकली आहे मग आपण आजच्या शिक्षण पद्धतीला आणि शिक्षकांना नावे ठेवून तरी काय उपयोग? मुलांना शिस्त लागणार कशी? आपला मुलगा हा घरात कमी वर्गात जास्त वेळ असतो. आपण मुलांना वयाच्या अवघ्या पाच वर्षपर्यंत संपूर्ण जबाबदारी पार पाडतो. एकदा का मुलगा पाहिलीत गेला की आईचं निम्मं ओझ कमी होत. मग आपण पाच वर्षात आपल्या मुलावर एकदाही हात उचलला नाही कि त्याच्यावर रागावलो नाही. का शिस्त लावण्यासाठी त्याला काही शासन केले नाही. मग जेव्हा एक शिक्षक मुलाच्या हितासाठी काही शासन करत असेल तर लगेच त्या शिक्षकावर कारवाई केली जाते त्यांना डायरेक्ट सस्पेंड केलं जातं. गावातील चार प्रतिष्ठीत लोक येवून त्या शिक्षकांनाच सुनावलं जात ...काहीही शासन न करता आमच्या मुलांना शिकवा ....हे कितपत योग्य आहे?
मुळात मला हेच कळत नाही की आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे? आपल्या मुलांनी एक चांगला माणूस म्हणून घडण की एक बेशिस्त बेजबाबदार व्यक्ती?चांगला माणूस घडवायचा असेल तर त्याला छडीचा वापर करणे अत्यंत गरजेचं आहे. आजची परिस्थिती खूप भयंकर होत चालली आहे. आपण मुलासाठी कोणतेच निर्णय घेऊ शकत नाही मुलगा स्वतःच ठरवून मोकळा होतो की त्याला काय पाहिजे ते. काय चांगले, काय वाईट याची कसलीही पर्वा नसलेली ही आजची ९०% मुले अशीच भरतकटत चालली आहेत. त्यात त्यांचा स्वतःचा दोष म्हणता येत नाही खरतर आजची परिस्थितीच अशी आहे की मुलांना मुक्त स्वातंत्र्य आहे.हे अनिर्बंध स्वातंत्र्य स्वैराचार करायला उद्युक्त होतेय. मन मोकाट मोकाट,त्याले चार वाटा तशी गत झाली आहे आणि शिक्षक पालक वर्ग मात्र हात बांधून ठेवला आहे. आपण आपली मत मुलांवर लादू शकत नाही. खरेच मुलांना संस्कारित करण्याची जबाबदारी पेलावी कशी यावर मार्गदर्शनाची गरज आहे. खरंच अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी मुले आज आपल्या आई वडील आणि शिक्षक याचा सन्मान करतात आणि त्यांच्या मनात आपल्या या तीन व्यक्ती बद्दल मनापासून प्रेम असते. 
पूर्वीची शिक्षण पद्धती खूप साधी होती पण त्यात सन्मान होता. भीती युक्त आदर होता. प्रेम होत आणि आहे ते खूप गरजेचं होतं आणि आजची आहे . कुणाची तरी आदर युक्त भीती वाटणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्यामध्ये चांगला बदल होऊ शकणार नाही. आणि ती भीती फक्त आपल्याला आपले तीन आधार स्तंभ म्हणजे आई वडील आणि शिक्षक यांचीच असली पाहिजेत तेव्हा खरा माणूस घडतो.जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त पैसा आणि ज्ञान या दोन गोष्टी महत्वाच्या नाहीत त्यासोबत शिस्त आणि भीती हे पण अत्यंत महत्वाची बाब आहे. माझ्याच वर्गातील अतिशय हुशार विद्यार्थी जो नेहमी वर्गात पहिला नंबर कधीच सोडायचा नाही,अगदी पहिली पासून दहावी पर्यंत त्याते खूप चांगला अभ्यास केला.पण त्याच्या मध्ये खूप मोठा इगो होता एवढा की त्याला वडील नसताना स्वतःची काबाड कष्ट करणारी आई आणि शाळेतील शिक्षक यांच्याविषयी काहीच आदर नव्हता. तो मुलगा पुढे व्यसनाधीन झाला. नको त्या गोष्टीच्या आहारी गेला. आज वयाच्या चाळिशीमध्ये पण त्याचे भविष्य काहीच नाही. असे का झाले?तर दुसरीकडे वैजनाथ परळी येथील एक ताई जिच्या आईला ९६.०५ % म्हणजे किती मार्क्स हे पण समजत नव्हते, अशी मुलगी तिला संस्कार करायला आणि चांगली परस्थिती बनवायला तिच्या आई वडिलांकडे तेवढी चांगली व्यवस्था नव्हती ते दोघे स्मशानात काम करीत होते. या मुलीला आपल्या अशिक्षित आई वडिलांचा सत्कार करताना आणि त्यांच्या विषयी बोलताना कणभर ही लाज वाटली नाही अशी मुले उपजायला भाग्य लागतं.माझा मानस पुत्र बालाजी पण असाच एक विदयार्थी आहे. जो दहावीत असतात भर परीक्षेच्या दिवसात अचानक त्याचे वडील गेले...एवढ्या बिकट परिस्थिती मध्ये त्याने संपूर्ण जबाबदारी सांभाळून आपल्या आईला सावरून स्वतःचा अभ्यास पूर्ण केला शाळेत पहिला नंबर काढला ... वयाच्या १६ व्या वर्षी घराची जबाबदारी सांभाळत सगळ्यांची मन जपणारा हा मुलगा. ज्याचे शिक्षक हेच त्याचे मित्र झाले..आईवर आणि शिक्षकांवर प्रेम करणारी ही अशी मुले खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. जबाबदारीची जाणीव झाली की मुलं आपोआप मोठी होतात ...शिक्षक आणि पालक हे आपल्यासाठी एक निसर्गाची खूप मोठी देणगी आहे आणि हे जर आजच्या पिढीला समजतं नसेल तर आपले भविष्य काय असेल हे काहीच सांगू शकत नाही. आपण आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे त्यांना चांगले आयुष्य जगता यावे म्हणून आपण आपल्या जीवाची पराकाष्ठा करून मुलांना घडवतो पण या सगळ्यात आपणच आपल्या मुलांना परावलंबी बनवत चाललो आहे ही बाब आपल्या लक्षात पण येत नाही.जेव्हा आपण लहान होतो घरात खायला अन्न नसायचे कपडे नसायचे तेव्हा आहे या परिस्थिती मध्ये आपण वाढलो मोठे झालो. तेव्हा आपल्याकडे कसलीच अपेक्षा नसायची. आहे त्या परिस्थिती मध्ये खूप समाधानी आणि आनंदी आयुष्य आपण जगत होतो. पण आजची मुले ही अतिशय तापट अग्रेसिव आणि स्वयंप्रेमी झाली आहेत.त्यांना जे पाहिजे आहे ते मिळालं नाही तर ते कोणत्याची थराला जाऊ शकतात आणि त्यांना या गोष्टीत कसलीच भीती वाटत नाही. याला जबाबदार हा आपल्या शिक्षण पद्धती मध्ये झालेला बदल आणि आपल्या पालकाची आपल्या मुलांविषयी असलेले निरर्थक प्रेम. 
पालकांनो ! खरंच आपण खूप मोठी चूक करतोय अस मला वाटते, तुम्ही स्वतःचा शैक्षणिक काळ आठवा. बघा तेव्हाची तुमची परिस्थिती काय होती म्हणून तुम्ही आज घडलात एक चांगला माणूस म्हणून जगत आहात. तसेच आपल्या मुलांना पण एक चांगला माणूस म्हणून घडवण्यासाठी त्यांना या सगळ्या परिस्थिती मधून जाउ द्या.त्यांना परिस्थितीची जाणिव होण खूप गरजेचं आहे.आपल्या घरात भाकरी कशी तयार होते, त्यासाठी आपले आई वडील काय करतात याचं भान यांना येऊ द्या .सगळ्या गोष्टी मागताक्षणी त्यांना देऊ नका. पुन्हा हीच सवय उद्या हीच मुले आपल्यावर हक्क अधिकार गाजवून नको त्या गोष्टीची अपेक्षा करत बसतात आणि आपण हतबल होऊन जातो. काहीच करू शकत नाही.आज जपान सारख्या प्रगत देशांत लहान लहान मुलांना टॉयलेट साफ करायला लावतात, वेळेची किंमत शिकवतात तिथे जर मुलगा शाळेत उशिरा गेला तर त्याने सलग आठ दिवस टॉयलेट साफ करायचे असे शासन केले जाते. आणि मुलांना मोठ्या व्यक्तींना वाकून नमस्कार करण्याचे संस्कार दिले जातात असे का करत असतील? जगातील सगळ्यात मोठी टेक्नॉलॉजी असलेल्या या देशातील मुलामध्ये लहानपणापासूनच मनातील गर्व इगो काढून टाकला जातो आणि मोठ्या माणसांचा आदर करण्याचे संस्कार केले जातात. त्यामुळे ही मुले खूप मोठे झाली तरी आपल्या मातीशी आणि आपल्या मातेशी खूप प्रामाणिक राहतात आणि सर्वांचा आदर करतात. आपण विदेशातील अनेक चांगल्या वाईट गोष्टीचे लगेच अनुकरण करतो मग या गोष्टीचे अनुकरण का करू शकत नाही. आपल्या पण मुलांना असे संस्कार जर मिळाले तर आपली मुले खूप समाधानी आयुष्य जगतील आणि एकमेकांचा आदर करणारी ही पिढी जर तयार झाली तर आत्ताच्या घटना घडायचं तर सोडा एक खूप मोठा आणि आदर्श देश म्हणून संपूर्ण जगात आपल्या भारताला सन्मानित केले जाईल. पण हे सगळं स्वप्नात नाही सत्यात उतरण गरजेचं आहे. शिक्षक म्हणजे पैसे फेकून विकत घेण्याची वस्तू नाही तिथे संस्कार पेरले जातात आणि त्यातूनच आपले भविष्य घडते.अशा कोणत्याच शिक्षकांना आपला विद्यार्थी खुनी, दरोडेखोर चोर व्हावा, मग्रूर माणूस व्हावा असे कधीच वाटू शकत नाही .आपला मुलगा जसा आपला प्राण असतो तसाच तो त्याच्या शिक्षकांच्या हृदयातील आरसा असतो. शिक्षक जेवढं प्रयत्नशील शाळा तेवढीच जास्त क्रियाशील होत जाते.अतिरिक्त फीस भरून मी माझ्या मुलीला वाईच्या एका नामांकित शाळेत पहिलेच ऍडमिशन घेतले होते आणि त्याच वेळी माझ्याच गावातील प्राथमिक शाळेचे सर माझ्या घरी तीच ऍडमिशन मिळविण्यासाठी आले होते पण सर्वांप्रमाणे मी सुध्दा मोठ्या उंची शाळेच्या प्रेमात असलेली मी तीच वाईची शाळा पसंत केली त्यानंतर दोन वर्षांनी मला कामानिमित्त गावात असलेल्या प्राथमिक शाळेत जाण्याचा योग आला. तिथली शिक्षण प्रणाली बघून बघितल्या नंतर मी केलेली घोडचूक माझ्या चांगलीच लक्षात आली आणि त्याच क्षणी मी निर्णय घेतला माझी मुलीचे पुढील शिक्षण मी याच शाळेत करीन.आणि तसे मी केले. कारण माझ्या गावातील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश रासकर सर हे खरंच एक ध्येयवेडे शिक्षक आहेत. शाळेसाठी आणि मुलासाठी कोणतीही गोष्ट करायला ते कायम तत्पर असतात्. वाई जवळ माझं एक छोटंसं खेडं आहे कडेगांव नावाचं. आमच्या गावात गोपाळ आणि गोसावी समाज मोठ्या संख्येने आहेत. आमचे हे मुख्याध्यापक या वस्तीतील मुलांना रोज स्वतःच्या गाडीतून शाळेत ने आण करीत असत. एवढंच नव्हे तर त्या मुलांची स्वच्छता,त्यांची कपडे याही गोष्टीची ते व्यवस्थित काळजी घेत असत. मोठ्या खाजगी शाळेत घातलेली मुले ही एक बोलकी पोपट होतील ही आणि ते आपल्याला ऐकायला पण खूप छान वाटत पण आपल्या मुलांना स्वतः लिहिलेलं वाचता येत का?याच निरीक्षण केलं जात का?
आपल्या देशातील एक नामांकित शाळा जिला आंतरराष्ट्रीय पुरस्कृत केले आहे ..एक शिक्षकांच्या स्वप्नातील शाळा ... श्री.वारेसरांची वाबळेवाडी जि. पुणे ची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.पाच सात मुलांनी चालू झालेली ही शाळा आज इथे ऍडमिशनला वेटींग आहे . मुलासाठी अत्यंत पोषक वातावरण सुंदर संकुल असून इथे खेळते वातावरण असून क्रियाशील मुले घडवली जातात अगदी शेती पासून ते अंतराळपर्यंत सर्वच स्तरातील प्रशिक्षण येथे घेतले जाते.हे संकुल तयार होण्यासाठी फक्त शिक्षकच नाही तर येथील ग्रामस्थांचा देखील खूप मोठा सहभाग लाभला आहे.एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशी भूमिका निभावली तर याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. म्हणूनच आपल्या मुलांना चांगले सदाचारी माणूसपण देऊयात !


=================================
-----------------------------------------------
*लेखन:*✍️✅🇮🇳...
सौ.आरती दळवी
रामनगर वर्ये, जि.सातारा
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

जयश्री उंडे व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रथमतर तांबे द्वितीय व बनसोड तृतीय क्रमांक


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे वतीने शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर येथील उपशिक्षिका श्रीम.उंडे जयश्री दिलीपराव यांनी इयत्ता नववी व दहावी वर्गासाठी हिंदी भाषा विषयात प्रथम क्रमांक पटकवीला आहे.
         द्वितीय क्रमांक भास्करराव गलाडे पा.विद्यालय अशोकनगर येथील उपशिक्षिका रमा तांबे यांनी मिळविला.तर इयत्ता तिसरी ते पाचवी गटात प्रियंका बनसोड हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
          श्रीम.जयश्री उंडे,रमा तांबे, प्रियंका बनसोड यांचे यशाचे शैक्षणिक,सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

माऊली वृद्धाश्रमाचे कार्य कौतुकास्पद - माजी आ. भाऊसाहेब कांबळे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील नेवासा रोड वरील माऊली वृद्धाश्रमाचे कार्य कौतुपास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केले.
 सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्त ज्योत - मशाल घेऊन येणाऱ्या पदयात्रेतील भाविक भक्त यांचे स्वागत माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी केले तसेच पदयात्रेतील भाविकांसाठी 
महाप्रसादाची व्यवस्था येथील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी करण्यात आली होती, प्रसंगी दिंडीतील प्रमुख कुणाल पंडित अजय लोणारी यांचा सन्मान श्री.कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 
यावेळी माऊली वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुभाष वाघुंडे, सौ. कल्पना वाघुंडे परिवाराच्या वतीने श्री.कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष डहाळे, दत्तात्रय खिलारी, शुभम नामेकर तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार राजेंद्र देसाई यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


Saturday, October 5, 2024

मोहंमदिया एज्यू.सोसायटीत महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी


- अहमदनगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांचे फार मोठे योगदान आहे. सत्य आणि अहिंसेचा संदेश जगाने अंगिकारला आहे. आजही अनेक जगात होणार्‍या क्रांती या महात्मा गांधी यांच्या सत्यग्रहावर आधारित असतात. तसेच लालबहादूर शास्त्री यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम केले आहे. अशा महान देशभक्त व्यक्तीमत्वांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे, असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह डॉ.प्रा. अब्दुस सलाम सर यांनी केले.
मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स् अ‍ॅण्ड सायन्स् फॉर गर्ल्स, मासुमिया डी.एल.एड्. कॉलेज (उर्दु माध्यम) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मुकुंदनगर, अहमदनगर येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ.शेख अब्दुस सलाम सर यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. प्रमुख पाहुणे म्हणुन सय्यद फरीदा भाभी, संस्थेचे उपसचिव शेख अ.अजीज अ.रहेमान, मुख्याध्यापक सय्यद नौशाद, संचालक नसीर अब्दुला , हसीब शेख, शेख शाहीन, शेख फरजाना, शेख सुलताना, शेख मुमताज, शेख यास्मिन व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम पटेल यांनी केले.तर आभार शेख हीना यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================